क्वाएट- माझे नुकतेच प्रकाशित अनुवादित बेस्टसेलर

Submitted by रेव्यु on 16 November, 2023 - 23:09

सुसान केन या क्वाएट या पुस्तकाच्या लेखिका असून हे पुस्तक संडे टाइम्स आणि न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर आहे. या पुस्तकाचा तीसहून अधिक भाषांत अनुवाद झाला आहे. त्यांचे TED वरील व्याख्यान ऑन-लाइन उपलब्ध झाल्यापासून ते तीस लाखाहून अधिक दर्शकाकडून पाहिले गेले आहे.
सुझान केन यांच्या क्वायेट या पुस्तकाचा अनुवाद करण्याचा प्रस्ताव माझे अनेक वर्षाचे प्रकाशक कुटुंबिय साकेत प्रकाशन यांनी केला तेव्हा (2022) मी अमेरिकेत होतो. त्या वेळेस (आणि आज देखील) हे पुस्तक लोकप्रियतेच्या शिखरावर होते. मी या पुस्तकाच्या मूळ गाभ्याविषयी विविध लेख वाचले तसेच TED वर लेखिकेने या पुस्तकावरील व्याख्यान ऐकले.
अंतर्मुखी आणि बहिर्मुखी या बहुतांशी गैरसमज असणार्‍या व्यक्तीस्वभाव वैशिष्ट्यांवर हे पुस्तक लिहिलेले आहे. अनुवाद करताना या व्यक्तिमत्त्वांबद्दल वाचताना खूप शिकायला मिळाले.लेखिकेने सखोल अध्ययन करून वास्त्वविक आयुष्यातील उद्बोधक तसेच रोचक उदाहरणे दिली आहेत. परस्परविरोधी जोडपी आणि त्यांच्यात दडलेली अंतर्मुखी व बहिर्मुखी वैशिष्टे, बालपणात गप्पगप्प राहणारी प्रतिभासंपन्न मुले यांच्या बद्दल वाचताना कुतुहल जागृत होते.
हा अनुवाद एक प्रवास होता- मानवी मनाचा, वृत्तींचा, या वैशिष्ट्यांच्या अज्ञानामुळे सहन कराव्या लागणार्‍या कोंडमार्‍याचा....
आपल्या आयुष्याची खोलवर जडणघडण जितकी लिंग अथवा वंश यानुसार घडते, तितकीच ती व्यक्तीमत्वानुसारही घडते. आणि व्यक्तीमत्वाचा सर्वात महत्त्वाचा एकमात्र पैलू - एका शास्त्रज्ञाने ज्याला ‘‘स्वभावाचे उत्तर व दक्षिण ध्रुव’’ असं म्हटलं आहे- म्हणजे अंतर्मुख-बहिर्मुखतेच्या पटलावर असलेले आपले स्थान. आपली मित्रमैत्रिणींची निवड, आपण संभाषण कशा प्रकारे करतो, मतभेद कशा प्रकारे दूर करतो व प्रेम कशा प्रकारे व्यक्त करतो या (सर्वांवर) या स्थानाचा प्रभाव असतो. आपण जे करिअर निवडतो त्यावरही याचा परिणाम घडतो, आणि आपण त्यात यशस्वी होणार की नाही यावरही. आपण व्यायाम करण्याची, व्यभिचार करण्याची, विनाझोप उत्तमरित्या काम करण्याची, चुकांमधून शिकण्याची, शेअर बाजारात मोठा जुगार खेळण्याची, दीर्घकालीन सुखाचा विचार करुन क्षणिक सुखाला नकार देण्याची, उत्तम नेता बनण्याची व ‘‘अमूक घडले तर काय’’ याचे नियंत्रण सुद्धा या स्थानावरच ठरते. ते आपल्या मेंदूतील ‘पाथवेज’, ‘न्यूरोट्रान्स्मिटर्स’ आणि आपल्या चेतासंस्थेतील कानाकोपर्यांमध्ये प्रतिबिंबीत झालेले असते. आज अंतर्मुखता व बहिर्मुखता या दोन विषयांनी शेकडो शास्त्रज्ञांचे कुतूहल चेतवले (जागृत केले) असून, व्यक्तीमत्व-मानसशास्त्रामध्ये या विषयांवर सखोल संशोधन होत आहे.
या संशोधकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक रोमांचक शोध लावले आहेत, पण ते प्राचीन व दंतकथात्मक परंपरेचा भाग आहेत. कवी व तत्त्ववेत्ते कालगणना सुरु झाली तेव्हापासून अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या विषयावर विचार करत आहेत. व्यक्तीमत्त्वाचे हे दोन प्रकार बायबलमध्ये, तसेच ग्रीक व रोमन फिजिशियन्सच्या लेखनात आढळतात. काही क्रांतीकारी मानसशास्त्रज्ञांच्या मते, हे प्रकार त्याहीपेक्षा प्राचीन आहेत : प्राणीविश्वातही ‘‘अंतर्मुख’’ व ‘‘बहिर्मुख’’ असतात...घरात आढळणार्‍या फळमाशांपासून ते ‘पम्पकिनसीड’ (गप्पी) माशांपर्यंत...ते र्हिसक माकडांपर्यंत. मर्दानी (पुरूषत्व) व स्त्रीत्व, पूर्व व पश्चिम, उदारमतवादी व परंपरानिष्ठ अशा इतर परस्परपूरक जोड्यांप्रमाणेच व्यक्तीमत्वातील या दोन प्रकारांविना मानवजात ओळखताच येणार नाही आणि मोठ्या प्रमाणात लुप्त होईल .
हे घातक भाकित असले तरीही अंशतः खरे आहे.... विचाराधिष्ठित समाज निर्माण करायचा असेल तर शांत, चिंतनशील प्रवृत्तीच्या लोकांना महत्त्व दिलेच पाहिजे. केवळ सभाधीटता आणि भाषणचातुर्याचे परिणाम आपण पाहत आहोतच
पुस्तक अमॅझॉनव र उपलब्ध आहे
https://www.amazon.in/dp/9352204360/ref=cm_sw_r_apin_dp_2N5F2GFRK2MQTB7B...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन

विषय इंटरेस्टींग आहे. पुस्तक मिळवून वाचेन

अरे व्वा, रोचक आणि गुंतागुंतीचा विषय आहे. अभिनंदन. Happy वरचा परिचय आवडला.

माझ्याकडे ६ प्रती आहेत... फक्त कुरियरचा खर्च वहन केला आणि वाचल्यानंतर सुस्थितीत स्वखर्चाने कुरियर करून परत पाठवल्यास मी इच्छुकांना पाठवू शकतो.

अभिनंदन, मूळ इंग्रजी पुस्तक वाचले आहे.

अनुवादित पुस्तकांचे बिझनेस मॉडेल कसे चालते ते समजून घ्यायला आवडेल. ₹ २९९/- किमतीला विकल्या जाणाऱ्या पुस्तकात छपाईचा साधारण खर्च किती असतो, मग त्यानंतर प्रकाशकाला, अनुवाद करणाऱ्या आणि मूळ लेखकाला किती पैसे मिळणार? कष्टाच्या मानाने अगदीच तुटपुंजे असणार, असा अंदाज.