लेखन उपक्रम २ - झुळूक - मॅगी

Submitted by मॅगी on 27 September, 2023 - 03:38

बाकीचे अजून आले नव्हते, गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.

त्याच्या भांडखोर, बोलाचाल बंद शेजाऱ्यांची तन्वी. एकाच शाळेत ती दहावीत आणि तो पाचवीत.

दुपारी सहलीतली बाकी मुलं जेवायला गेल्यावर तो नदीकाठी सेल्फी काढत होता. अचानक पाय घसरून तो पाण्यात पडला. नाकातोंडात पाणी गेलंच होतं तेवढ्यात "ए बावळट ss" ओरडत कोणीतरी उडी मारुन त्याला बाहेर काढलं. डोळे उघडले तर समोर तन्वी! "आता सेल्फी काढायला गेलास ना, तर फोन फेकून देईन तुझा." रागाने म्हणून ती जेवायला निघून गेली.

गाडी आली. "तन्वीताई, सॉरी. आता नो सेल्फी" तो कान धरून किंचित हसला. तिने डोळे मिचकावले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या दोन वाक्यांना न्याय देणारी कथा
कथा म्हणूनही भांडण मिटेल बोलाचाल सुरु होईल असे दर्शवणारा आशादायी शेवट असणारी कथा आवडली.

गोड आहे कथा.
पाचवीत असताना पासून फोन?

फार गोड आहे कथा.
>>>>>"ए बावळट ss"
बाई गं फणस आहे नुसती. बाहेरुन काटेरी आतून गोड!!

खरच आहे - डोन्ट जज अ बुक बाय कव्हर.
अनेकदा अशी भांडकुदळ माणसंही सहजपणे अमूल्य मदत करुन जातात - हे अनुभवलेले आहे.

छान आहे कथा. जुनी चाळ असो वा आताची नवी सोसायटी, खूप कॉमन आहे हे की आईवडिलांची भांडणे आणि मुलांमध्ये तसा एकमेकांबद्दल राग नसणे, एकत्र खेळणे... त्यामुळे रिलेट झाले.

पाचवीत असताना पासून फोन? >>> हे देखील हल्ली कॉमन आहे. पण शाळेची सहल असेल तर ते अलाऊड नाही. कथेसाठी माफ करूया, किंवा शाळेची सहल नव्हती समजूया.