मग ज्योतिष्याचा उपयोग काय?

Submitted by केअशु on 10 September, 2023 - 09:35

काल एका मुलाने प्रश्न विचारला की जर नशिबात जे लिहिलेलं आहे ते होणारच असेल , न टळणारं असेल तर मग फलज्योतिष कशासाठी आहे? फक्त पुढे काय होणार हे सांगण्यासाठी ? बरं समजा पुढे जाऊन काय होणार आहे हे सांगितलं आणि ते आपण बदलू शकणार नाही आहोत किंवा आपली तेवढी कुवत नसेल किंवा ते अटळ असेल तर मग ज्योतिष्याने दिलेल्या या माहितीचा उपयोग काय ? नशिबात जे नकोसं लिहिलेलं आहे त्याला विरोध करण्याची मानवी क्षमता किती ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फलज्योतिष बघणे हे पण ज्यांच्या नशिबात लिहिलं आहे, त्यांच्यासाठी ते आहे

अनिश्चितता कधी कधी पेलवत नाही. अशा वेळी एक anchor म्हणून ज्योतिषशास्त्राकडे बघितले जाते. जे जे शाश्वत नाही आणि विज्ञानाकडे ज्या प्रश्नांची ठोस उत्तरे नाहीत ते ते प्रश्न घेऊन ज्योतिषाकडे जाणारे लोक जास्त दिसतील. जसे की लग्न जुळवणे, एखाद्या किचकट शास्त्रक्रियेतून रुग्ण जगेल की दगावले.
जर हवामान खात्याने अचूक पावसाचे अंदाज दिले असते तर गावांकडल्या जत्रांमधून पावसाचे कौल लावणारे लोक कमी झाले असते.

- तब्येतीच्या तक्रारी हे भविष्य २५ वर्षांपूर्वी पु ना ओक यांनी माझी कुंडली पाहून वर्तविले होते.
मी त्या भविष्याचा उपयोग करुन घेउन, व्यायाम-आहार-झोप यांची किमान नियमितता ठेवायला हवी होती. पण तसे झाले नाही आणि अनंत दुखणी मागे लागली.

तेव्हा उपयोग होउ शकतो पण तो जर केला तरच.
----------------------
प्रेडिक्टीव्ह सायन्स (सुडो) पेक्ष ज्योतिष हे मानसिक कल, आवडी निवडी, कार्मिक क्रिस्टलाइझ्ड पॅटर्न्स हे ओळखण्याकरता वापरावे असा अने क पाश्चात्य ज्योतिर्विदांचा मुद्दा आहे.

पुन्हा पुन्हा ज्योतिषाकडे जाणारे लोक प्रचिती आली म्हणून जाणारे असतात. त्यांना यात आपला काय आणि कसा फायदा आहे हे कळलेलं असतं. धर्मो रक्षति रक्षित:|
ज्याला यात काही अर्थ नाही असं वाटतं त्यांनी यात पडू नये. तसंच हिंदू धर्म, सनातन हे थोतांड आहे, किटाणू आहे , दुसरे धर्मच छान आहेत असं वाटणाऱ्या लोकांनीही ज्योतिष, मंदिर इथें अज्जिबात फिरकू नये. तेवढीच जरा इतर श्रद्धाळू लोकांना दर्शनासाठी लाईन कमी होईल आणि ज्योतिषांच्या apoointments लवकरच्या मिळतील.

@सामो
मी त्या भविष्याचा उपयोग करुन घेउन, व्यायाम-आहार-झोप यांची किमान नियमितता ठेवायला हवी होती. पण तसे झाले नाही आणि अनंत दुखणी मागे लागली.

म्हणजे ज्योतिषावर विश्वास ठेवणे आणि तो सांगतो ते अंमलात आणणे हे सुद्धा नशीबात असायला हवे. Happy

मी सुरवातीला फार पूर्वी भविष्य सांगायचो. लोकं सारखी माझ्याकडे यायची कारण मी सांगितलेलं भविष्य अचूक असायचं. ग्रह तारे यांच्या पलीकडे जाऊन मी आकाशगंगा आणि वेगाचा मेळ घालून हे सगळं साध्य केलं होतं. लोकं मला खूप पैसे द्यायचे पण मी घ्यायचो नाही. शेवटी लोकांनी नकळत एक मोठा बंगला बांधला आणि मी रात्री झोपलेला असताना मला उचलून त्या बंगल्यात ठेवला. तेव्हापासून मी भविष्य बघणं सोडून दिलं.

अचुक भविष्य सांगणारा भेटायला तर हवा.. असे अभ्यासु जाणकार खुप कमी असतात. कोणी काहीही सांगेल आणि आपण त्यावर विसंबुन राहायचे हे योग्य नाही, त्या मुलाला सांगा की भविष्य जाणायच्या भानगडीत न पडता तु स्वतः स्वतःचे भविष्य घडव.

भविष्यावर विश्वास ठेवणे न ठेवणे आपल्या हाती आहे. पण ते आधीच कळले तर योग्य ते उपचार करुन परिणाम नियंत्रित ठेवता येतात असे वाचले आहे. सामोने भविष्य माहित झाल्यावर निरोगी जीवन शैली अंगिकारली असती तर भविष्यावर मात केली असती, यालाच ज्योतिषी फ्री विल म्हणत असावेत. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर लिखित भविष्यही बदलता येते म्हणे.

>>>>>सामोने भविष्य माहित झाल्यावर निरोगी जीवन शैली अंगिकारली असती तर भविष्यावर मात केली असती, यालाच ज्योतिषी फ्री विल म्हणत असावेत. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर लिखित भविष्यही बदलता येते म्हणे.
अगदी बरोबर. पण घोडचूक तीच असते आपण हाफ हार्टेडली ज्योतिषाकडे जातो. ना धड विश्वास ठेवतो ना अविश्वास. ना घर का ना घाट का. मी त्यांनी सांगीतल्यापैकी फक्त - नवरा स्वाभिमानी व कर्तुत्ववान असेल हे सिलेक्टिव्ह वाचले. खरे तर त्यांचे तेही भविष्य खरे आहे. पण मुद्दा तो नाही. आपण सिलेक्टिव्ह ऐकतो.

मग ज्योतिषाचा उपयोग काय ?
>>>

कोणाला ? ज्योतिषाला खूप उपयोग आहे. उपजीविकेचे साधन मिळते.
इतरांना काय फायदा ? तर काहीही नाही.

फलज्योतिष बघावे लागते हे पण ज्यांच्या नशिबात लिहिलं आहे, त्यांच्यासाठी ते आहे

पोपटाला पेरू मिळे. हल्ली पोपट पाळण्यावर बंदी आली आणि पोपट सुटले.

हा धागा काढणे लेखकाच्या नशिबात होते.
त्यावर प्रतिसाद देणे आणि वर जसे दिले आहेत तसे देणे हे प्रतिसाददात्यांच्या नशिबात होते. अचूक भविष्य सांगणारा 'जाणकार' मिळणे हे नशिबात लिहिले असल्याशिवाय होणार नाही, चुकीचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाकडे जाणे नशिबात असेल ते कोणी टाळू शकत नाही आणि ज्योतिषाकडे न जाणे त्यावर विश्वास न ठेवणे हे नशिबात असेल तर तसेच होईल.
कुणाच्या नशिबात आधी फलज्योतिषावर विश्वास आणि नंतर त्यावरील विश्वास उडणे असे लिहिले असेल तर तसे होईल, आणि व्हाईस अ व्हर्सा.

फलजोतिष्य म्हणजे प्रॉबॅबिलिटीचे विज्ञान, स्टॅटिस्टिकल सायन्स असे म्हणणे काहींच्या नशिबात लिहिले असते त्यानुसार ते तसे बोलतात आणि फलज्योतिष म्हणजे थोतांड असे ज्यांच्या नशिबात लिहिले असते ते तसे बोलतात. अगदी न्यायमूर्ती रानडेसुद्धा यातुन सुटले नाहीत.

जाणकार ज्योतिष्याकडे जाऊन भविष्यातील धोके ओळखुन ते टाळण्याचा प्रयत्न केले असता ते पूर्ण अथवा थोड्या प्रमाणात टळणे ज्यांच्या नशिबी असेल त्यांचेच तसे टळतील ज्यांच्या नशिबात टळणे लिहिले नाही त्यांचे टळणार नाही.

प्रख्यात आणि 'जाणकार' ज्योतिष्याच्या नशिबातही काही लोकांचे सांगितलेले भविष्य खरे न निघणे लिहिले असते म्हणुन तसे होते.

ही पोस्ट वाचणे ज्यांच्या नशिबात आहे तेच वाचतील आणि त्यावर प्रतिक्रिया देणे ज्यांच्या नशीबात आहे तेच देतील, आणि अर्थात केव्हा काय आणि कोणत्या शब्दात प्रतिक्रिया द्यावी हे नशीबी लिहिले आहे त्याच प्रमाणे देतील.

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2026 - 11:08>>> मानव, तुमच्या प्रतिसादात 'नशीब' या शब्दाच्या नशीबी केवळ १४ वेळा येणेच होतं....'नशीब' शब्दाचे नशीब...दुसरे काय... Biggrin

अजून साला विश्वाच्या अंतापर्यंत हेच दळण किती दिवस दळत बसायचे आहे, वैताग कसा येत नाही?

कमाल आहे राव, गेले शंभर वर्षे तेच तेच सुरू आहे काही दुसरं नाहीच लोकांना बोलायला.

ग्रहस्थिती आपण कोणत्या ग्रहाच्या प्रभावाखाली आहे हे दाखवते. प्रत्येक ग्रहाला काही विशेष गुण आहेत. त्यांना ज्योतिष भाषेत कार्यकत्व म्हणतात. गुणांबरोबर काही अवगुण ही येतात. याचा उपयोग करून करिअर शोधता येते. यांच्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. काही सामान्य पुस्तके आहेत त्यात ही माहिती सापडते. म्हणजे असं झालं की माझा कल, माझी आवड माझा प्रभावी ग्रह एक किंवा दोन दाखवतो. मग त्या कार्यक्षेत्रात जायचे. अभ्यास, परिश्रम करायचेच आहेत.
अगदी वाईट ग्रह म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे तो शनि. मुख्य गुण चिकाटी. परिश्रम करून ध्येय साध्य करणे. व्यावसायिकपणा ठेवणे, दूरदृष्टी ठेवणे, पैशाचा विनियोग करणे, राजकारण ओळखणे, धूर्तपणा असणे, वेळोवेळी माघार घेणे आणि ध्येय साध्य करणे, धोरणी, अरेरावी किंवा बडबड न करणे. शेत जमिनाची मालकी असते. व्यवसाय चोख करणे. पैशाचे व्यवहार असणारी सर्व कार्यक्षेत्रे - बँका, इन्शुरन्स. बोर्ड ओफ डिरेक्टरी मेंबर असणे. जिथे जिथे पैशाचे निर्णय आहेत तिथे. इतिहास हा विषय. (पण हा ग्रह या गोष्टींमुळे भावनाशून्य ठरतो. दिर्घायुषी, कातडीचे रोग, चिवट दमा खोकला असणे.) कनिष्ठ पातळीच्या नोकऱ्या, शेतमजूरी.

थोडे जोड प्रभाव पाहू - शनि अधिक चंद्र - राजकारण किंवा समाजसेवा. कारण लोकांशी संपर्क आणि कष्ट आहेत.
शनि अधिक गुरू - समित्या मंडळाची कामे.
शनि अधिक बुध - बँक आणि इन्शुरन्स.,
शनि अधिक मंगळ - युद्ध क्षेत्र, हल्ला. किंवा खाणकाम, धातू.
शनि अधिक शुक्र - संपत्तीचा उपभोग. मोठे महाल, वाडे, मोक्याच्या जागा.
हे थोडक्यात झालं.
हे सर्व करताना आपण ज्योतिषाच्या आहारी जात नसतो तर आपल्या कामाबद्दल, कुवतीबद्दल आश्वस्त राहतो.
........
शुक्र - निष्ठा. छानछोकीने राहाणे, छंद करणे, कलासक्त. बाग बगिचा. कामाची जागा चांगली असणे.
______________
कारकत्व सांगणारी पुस्तके वाचा, अभ्यासा. पण ज्योतिषावर विसंबून काम, कष्ट, प्रयत्न करायचे सोडू नका.

आमच्या येथे गुगलकृपेने ज्योतिषशास्त्र आधुनिक करण्याचे प्रयत्न पुढच्या टप्प्यात आहेत.
पूर्वी संदर्भ म्हणून ग्रह तारे हेच विचारात घेता येत होते. पण आज गुगल अर्थ आणि मॅप्सच्या विद्यमाने त्याची आवश्यकता राहिलेली नाही.

आज कोऑर्डिनेटस आणि जीपीएस सिस्टीमचा उपयोग करून ज्योतिष सांगता येऊ शकते.
उदा चुनाभट्टी या स्थानाचे काही गुणधर्म आहेत. पण चुनाभट्टी या स्थानाच्या कोऑर्डिनेट्सना जर स्क्वे मिमी मधे विभाजित केले तर प्रत्येक कोर्डिनेटमधे हजारो ठिपके तयार होतात. या ठिपक्यांना अल्फान्युमरिक ओळख दिली तर स्थानमहात्म्य अचूक सांगता येऊ शकते. आज या प्रत्येक स्थानाशी निगडीत वाहनदशा यावर अभ्यास चालू आहे.

समजा चुनाभट्टी इथल्या अमन फिश सेंटर या ठिकाणाला 19.051652°N 72.869053°E (चुनाभट्टी रेल्वे स्टेशन) वरून जर 19.051652°N (Am117), 72.869053°E ( In234BC) असे सबकोर्डीनेट्स ठरवले तर या ठिकाणी सकाळी ६ वाजता एक बस त्याच्या दक्षिणेस एक रिक्षा, पश्चिमेस ट्रक आणि उत्तरेस मोटरसायकल असा संयोग झाल्यास बसमधे पुढच्या सीटवर डावीकडे बसलेल्या इसमास धनप्राप्ती होऊ शकते. तर रिक्षातल्या माणसाची बायको पळून जाऊ शकते.
हा अभ्यास आता डिजिटली चालू आहे. हा डेटाबेस तयार झाला कि अधिक अचूक सेवेत रुजू होऊ शकते. यासाठी आता ग्रह तार्‍याम्वर अवलंबून रहावे लागणार नाही.