फ्लॉवर बटाटा नारळाच्या दुधातली भाजी

Submitted by सायो on 3 September, 2023 - 14:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्लॉवर, बटाटा, आलं- हि. मिरची- कोथिंबीर ठेचा, नारळाचं दूध, मीठ, साखर, वरुन घालायला कोथिंबीर, फोडणीकरता तेल, हिंग, हळद, जिरं, मोहरी, कढिपत्ता.

क्रमवार पाककृती: 

फ्लॉवरचे तुरे काढून पाण्यात घालून ठेवावेत, बटाटेही जरा मोठ्या फोडी करुन फ्लॉवरबरोबरच पाण्यात घालून ठेवाव्यात. हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर ह्याचा ठेचा करुन ठेवावा.
तेल गरम करुन त्यात जिरं, मोहरी घालून तडतडल्यावर हिंग, हळद घालून घ्यावी. वर कढिपत्ता घालावा. एकीकडे फ्लॉवर, बटाटा चाळणीवर निथळून घ्यावं आणि ते फोडणीत घालून परतावं. त्यावर ठेचा घालून परतून घ्यावा. मग त्यावर फ्लॉवर बटाटा बुडेपर्यंत नारळाचं दूध घालून झाकण घालून चांगलं मऊ शिजू द्यावं. (झाकण पूर्ण बंद करु नये. थोडी गॅप ठेवावी नाहीतर भाजी उतू जाते). शिजल्यावर मीठ, साखर, कोथिंबीर घालून पोळी/फुलक्याबरोबर खावी.

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरज नाही ममो. मी नेहमी नारळाच्या दुधातच शिजवते. खूप दाट नको असेल तर थोडं पाणी घालू शकता.

मस्त वाटतेय नादू ची ही भाजी. आता एकतर नारळ आणून दूध काढायचे सोपस्कार करायला लागतील किंवा आयतं दूध घ्यून यावं सरळ. यावेळी आणलेल्या हिरव्या मिरच्या जहाल तिखट आहेत, त्या वापरून सात्विक झणझणीत भाजी करून पाहायचा मोह होतो आहे खरा... Happy

छान वाटतेय पाकृ.
मला घरी नादू बनवले की एवढ्या कष्टाने बनवलेले दूध भाजीत घालायला जीवावर येते Lol . असं वाटतं तशीही भाजी खातोच की, याचे वेगळे काही करावे.
विकतचे आणले की मग घरी कोण कशात वापरते तिकडे त्याचे काही वाटत नाही. विकतचे आणुन ही भाजी करून पाहीन.

योकु+१
ग्राहक संघातून नारळ दूध पावडर आणली होती, तेच वापरून करण्यात येईल!