Walkie-Talkie (वॉकी-टॉकी) बाबत माहिती हवी आहे.

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 1 September, 2023 - 05:21

पोलिसांना वॉकी-टॉकी वापरतांना आपण नेहमी पाहतो परंतु मोठ्या हॉस्पिटल, हॉटेल, रहिवासी संकुलातील सुरक्षा रक्षकही बऱ्याचदा वॉकी-टॉकी वापरताना दिसतात. काही वेळेस चित्रपट / मालिकेच्या सेटवरील crew मेंबर, event management कंपनीचे कर्मचारीही वॉकी-टॉकी वापरताना दिसतात.

मलादेखील कार्यक्रमात माझ्या सहकाऱ्याशी त्वरित संपर्कासाठी वॉकी-टॉकी घ्यायचा विचार आहे. (एक प्रकारे event management च म्हणा!) परंतु त्याबाबतीत खालील माहिती हवी आहे:
१. वॉकी-टॉकी वापरण्यासाठी जे लायसन्स लागते ते कुठून मिळते?
२. Licence-free walkie talkie कोणते आणि कुठे मिळतील?
३. मी Flipkart वर Baofeng BF-888S हा वॉकी-टॉकी बघितला आहे, (रु. १४०० मध्ये २ नग) ज्याची frequency 400-470 MHz (UHF - Ultra High Frequency) आहे. Flipkart वर त्याला लायसन्स लागत नाही, असे म्हटले आहे ते खरे आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. वॉकी-टॉकी वापरण्यासाठी जे लायसन्स लागते ते कुठून मिळते?
२. Licence-free walkie talkie कोणते आणि कुठे मिळतील?
३. मी Flipkart वर Baofeng BF-888S हा वॉकी-टॉकी बघितला आहे, (रु. १४०० मध्ये २ नग) ज्याची frequency 400-470 MHz (UHF - Ultra High Frequency) आहे. Flipkart वर त्याला लायसन्स लागत नाही, असे म्हटले आहे ते खरे आहे का? -- खरे आहे . कमी अंतराकरता म्हणजे साधारण १ किमी, वापरल्या जाणार्‍या वॉकी टॉकि साठी लायसेन्स ची गरज नसते. अशा प्रकारात बरेच मॉडेल्स उपलब्ध आहेत. मोटोरोलासारख्या कंपन्या आणी Vertel सरखे इतर ब्रांडस मिळतात.

१-
HAM Radio कोर्स पूर्ण करून परीक्षा पास व्हावी लागते मग लायसन्स आणि आपला कोड मिळतो ( VU२ किंवा VU३)

२-
रेंज खुप कमी असते त्यामुळे प्रत्यक्ष आपत्काल स्थिती साठी फार उपयोगी नाही. लायसन्स होल्डर असल्यावर अगदी दोन देशांत सुद्धा कम्युनिकेशन करायला मिळेल.

३-
शॉर्ट डिस्टन्स जसे एखादी सोसायटी विंग पुरता ओके आहे. ही निव्वळ खेळणी असतात जी फ्लिपकार्टला पाहिली ती. बऱ्यापैकी चांगले घ्यायला १५हजारच्या आसपास मिळतील. किंमतीचे कारण लॉन्ग लास्टिंग बॅटरी आणि रेंज

एक प्रकारे event management च म्हणा!--- ह्यासाठी लायसन्स न मागणारी कमी बजेटवाली खेळणी चालतील

धन्यवाद भ्रमर आणि अज्ञानी!!!

रेंज खुप कमी असते त्यामुळे प्रत्यक्ष आपत्काल स्थिती साठी फार उपयोगी नाही...
आपत्कालीन स्थितीसाठी नकोच आहे,, जरी २-४ handsets घेतले तरी ते कार्यक्रमापुरते सहकाऱ्यांना वापरायला देणार आणि पुन्हा माझ्याच कपाटात राहणार!!! त्यामुळे रेंज म्हणाल तर मध्यम आकाराचे मैदान कव्हर झाले तरी पुष्कळ आहे.

किंमतीचे कारण लॉन्ग लास्टिंग बॅटरी आणि रेंज... बॅटरी ५-६ तास चालली तरी पुरेशी आहे!

मग Baofeng BF-888S (400-470 MHz) बाबतीत आपले काय मत? घेऊ ना???

मजेशीर धागा
वाचतोय प्रतिसाद
इथे काहीतरी नवीन माहिती मिळेल मला..

रेडिओ फ्रिक्वेन्सीज AM वेगळ्या .खूप दूरवर जातात.
लायसन न लागणाऱ्या फ्रिक्वेन्सीजची रेंज कमी असते. पोलीस/ट्राफिक पोलीस जे वापरतात त्याची रेंज दोन किमीवर असणार.
(दहा बँड शॉर्टवेव अधिक टीवी चानेल ओटीए एक व दोन असलेला चाइनिज रेडिओ दोनशे रुपयांत पूर्वी मिळायचा त्यावर एक किमीवरच्या ट्राफिक पोलिसांचे बोलणे टीवी बँडवर ऐकता येत असे. ) म्हणजे interference होऊ शकतो.

१) सांगायचा मुद्दा असा की तुमची जागा जिथे ही उपकरणे वापरणार आहात ती किती,कोणती ,जागेचा एअरिआ किती ,मालकाच्या म्हणजे तुमच्याकडच्या कागदपत्रांसह ,आधार कार्डासह स्थानिक पोलीस स्टेशनला 'खाजगी आणि मर्यादित वापरासाठी' परवानगी अर्ज करा. त्या अर्जाच्या नकलेवर अर्ज मिळाल्याची तारीख,सही,नोंद घ्या. मग ते तुम्हाला सांगतील तसे करा. साधारण दोन महिन्यांत action, कार्यवाही सरकारी खात्याला करावी लागते.
हल्ली सुरक्षिततेचा मुद्दा वाढला आहे. नवनवीन नियम अटी आपल्याला माहीत नसतात.
'Local body permissions ' प्रत्येक गोष्टीस लागते. त्यातील ही पहिली पायरी.

२) वायरलेस कम्युनिकेशन परवानगी.
प्रसार भारतीकडे. पण तुम्ही स्थानिक रेडिओ केंद्रास अर्ज द्या. मुंबईत मालाड पश्चिम येथे. इकडे न जाता त्यांचा पत्ता मिळवून पोस्टाने अर्ज पाठवा.

३) हिंदी सिनेमा निर्मात्यांचा लोकेशन प्रापर्टी मेजर असतो त्यांपैकी कुणी ओळखीचे असल्यास चांगली माहिती मिळेल.

फार काळजीपूर्फारयाचा वापर करा!

भारतात, वायरलेस कम्युनिकेशनसाठी, कोणत्याही परवान्याशिवाय तुम्ही फक्त २६.९६५ ते २७.२७५ सिटिझन बँड (सीबी रेडियो) या फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये प्रसारित करू शकता.

सुधारीत २७ चॅनेल योजने नुसार सीबी रेडियो ची रेंज २७.२७५ आहे

हे लायसन्स-फ्री बँड असले तरी, फक्त मर्यादित पॉवरमध्ये (५ वॅट पेक्षा कमी) आणि फक्त WPC प्रमाणित ट्रान्ससीव्हर्स वापरण्याची परवानगी आहे.
या बँडला सिटीझन्स बँड किंवा सीबी रेडिओ म्हणतात हा सामन्य वापरास खुला असलेला एचएफ बँड आहे.
हे वापरतांना क्लियर साईट म्हणजे दिसत असेल त्या रेंज मध्ये तुम्ही बोलणे करू शकता. पण एखादी इमारत वगैरे मध्ये असेल तर कदचित आवाज जाणार नाही.

या शिवाय इतर बँड प्रसारणास/बोलण्यास वापरले तर सरळ जेल मध्ये रवानगी होऊ शकते!
तुम्हाला सापडलेल्या (बहुतेक चायनीज?) वॉकी टॉकीजमध्ये ट्रान्समिशन फ्रिक्वेन्सी भारतात परवाना-मुक्त नसावी!
(ऐकायला मात्र काही निर्बंध नसावेत)

अधिकमाहिती https://en.wikipedia.org/wiki/Citizens_band_radio_in_India

विकिवर दिलेला सिटिझन लायसन्स-फ्री बँड तक्ता येथे चिकटवत आहे.

इंडिया सीबी चॅनेल – अद्ययावत सीबी रेडिओ बँड योजना – २७ चॅनेल
वारंवारता [MHz] चॅनल क्रमांक
२६.९६५ चॅनल 01
२६.९७५ चॅनल 02
२६.९८५ चॅनल 03
२६.९९५ रेडिओ-नियंत्रित मॉडेल, सामान्य (आवाज संप्रेषणांना परवानगी नाही) - "चॅनल 3A"
२७.००५ चॅनल 04
२७.०१५ चॅनल 05
२७.०२५ चॅनल 06
२७.०३५ चॅनल 07
२७.०४५ रेडिओ-नियंत्रित मॉडेल, सामान्य (आवाज संप्रेषणांना परवानगी नाही) - "चॅनेल 7A"
२७.०५५ चॅनल 08
२७.०६५ चॅनल 09
२७.०७५ चॅनल 10
२७.०८५ चॅनल 11
२७.०९५ रेडिओ-नियंत्रित मॉडेल, सामान्य (आवाज संप्रेषणांना परवानगी नाही) - "चॅनेल 11A"
२७.१०५ चॅनल 12
२७.११५ चॅनल १३
२७.१२५ चॅनल 14
२७.१३५ चॅनल 15
२७.१४५ रेडिओ-नियंत्रित मॉडेल, सामान्य (आवाज संप्रेषणांना परवानगी नाही) - "चॅनल 15A"
२७.१५५ चॅनल 16
२७.१६५ चॅनल 17
२७.१७५ चॅनल 18
२७.१८५ चॅनल 19
२७.१९५ रेडिओ-नियंत्रित मॉडेल, सामान्य (आवाज संप्रेषणांना परवानगी नाही) - "चॅनल 19A"
२७.२०५ चॅनल 20
२७.२१५ चॅनल 21
२७.२२५ चॅनल 22
२७.२५५ चॅनल 23 – रेडिओ-नियंत्रित मॉडेल
२७.२३५ चॅनल 24
२७.२४५ चॅनल 25
२७.२६५ चॅनल 26
२७.२७५ चॅनल 27

आवाज संप्रेषणांना परवानगी नाही असे दिलेले चॅनल वापरू नका. गोत्यात याल. पोलिस आणि लष्कर हे फार सिरियसली घेते असे ऐकून आहे.

तसेच तुम्ही जे काही बोलणार आहात ते या चॅनल वर असणारे सर्व लोक ऐकणार आहेत हे सदैव लक्षात असू द्या.