पेंटर पित्याचे मुलीच्या आजारासाठी मदतीचे आवाहन

Submitted by सामना on 31 August, 2023 - 05:49

पेंटरचा व्यवसाय असलेल्या एका कामगाराचे मदतीचे आवाहन त्यांच्याच शब्दात.
milaap.jpgmilaap2.jpg

पेंटर सारखे काम असल्याने नियोजन करता येत नाही. हातावर पोट आहे. इन्श्युरन्स नाही.
तरीही त्यांनी लाखभर रूपये बचतीतून जमा केले. पण त्यांना लागणारी रक्कम प्रचंड आहे. ती मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मिलाप या फंडरेजरद्वारे मदतीसाठी आवाहन केले आहे.

मिलाप ची लिंक
https://milaap.org/fundraisers/support-gresha-milind-ingale
आपण सहकार्य करावे ही विनंती
संपर्क - मिलिद इंगळे - 9653377305

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोटी पण महत्वाची असते.

त्या मुलीच्या फोटोकडे पाहून हे आवाहन दिसल्याबरोबर इथे शेअर केलं आहे. तिच्या वडलांशी ओळख नाही. हॉस्पिटलचे नाव आणि फोन नंबर आहे. मिलापचा पत्ता फोन आहे.
इथे परवानगी घेण्याचे राहून गेले. नियमात बसत नसेल तर उडवून टाका.
आधी दोनदा अशी आवाहने पाहिलेली आहेत.

मिलाप मदतीच्या रकमेतून फीस कापून घेतेय. नॉमिनल आहे पण माहितीसाठी.
शनिवारी भेटायला जायचा बेत आहे.

मिलाप मदतीच्या रकमेतून फीस कापून घेतेय. नॉमिनल आहे पण माहितीसाठी.>> direct account no आहे का? त्यात मदत पाठवता येईल. म्हणजे मदत पण जास्त मिळे. आणि आम्हाला पाण स्क्रिन वर मिलापच्या अ‍ॅड दिसणार नाहीत

डायरेक्ट अकाउंट नंबर मधे गरजेपेक्षा जास्त मदत होऊ शकते. त्यामुळं अकाउंट नंबर मागितला नाही.
तरी थेट मदत करायची इच्छा असल्यास फोन नंबर दिला आहे.

The parents can approach Mumbai Oncocare they have a charity wing . See if they will do at less cost. Jeeyo pet scan at sarvodaya hospital also offers discount if you have a note from oncologist. Where is this patient getting treated? What is cancer type and stage? What is line of treatment.?

उत्तम बातमी आहे.

पण यात कंसातल्या बर्‍याच गोष्टी असतील. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली कि सर्वांनाच पाच लाखापर्यंत मदत मिळेल. सध्या माझा भाऊ अ‍ॅडमिट आहे. तो या स्कीमसाठी पात्र नाही असे हॉस्पिटलने कळवले. त्यामुळं नीट चौकशी आवश्यक आहे.

मदत पाठवली आहे.
ग्रेशाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.

मी सप्टेंबर 2021 पासून याच आजाराशी लढतेय. जानेवारी 2022 मध्ये ATG ट्रिटमेंट झाली आणि आतापर्यंत 90% रिकव्हर पण झालेय.
शंका घेण्याचा उद्देश नाही.
या आजाराच्या उपचारासाठी BMT आणि ATG असे दोन ऑप्शन आहेत. जर BMT चा खर्च परवडत नसेल (जर एवढे फंडिंग उभे रहात नसेल तर) तर ATG सुद्धा खूपच चांगला पर्याय आहे. लवकर उपचार मिळणे गरजेचे नाहीतर तब्येत खूपच झपाट्याने बिघडते हा स्वानुभव आहे. ATG ट्रिटमेंट तुलनेने स्वस्त असली तरी नंतर घ्यावी लागणारी औषधे खूप महाग आहेत.
माझा ट्रिटमेंट पर्यंतचा खर्च 6 लाखांच्या आसपास आला आणि नंतर औषधांसाठी महिन्याला 60-70 हजार खर्च येत होता. हळूहळू डाॅक्टर औषधे कमी करतात तसा हा खर्च खूपच कमी होतो.

Submitted by Nidhii on 1 September, 2023 - 18:18 >> हॅटस ऑफ टू यू !!!

निधीजी ग्रेट !

मला या आजाराविषयी कसलीच माहिती नाही. लहान मुलगी आहे , वडील पेंटिंगचं काम करतात , २५ लाख ही मोठी रक्कम (माझ्यासाठी सुद्धा मोठीच आहे) उभी करायची आहे हे पाहिल्यावर शेअर करायला सुरूवात केली. मोठा पल्ला गाठायचा आहे. फोन नंबर असल्याने शंका असतील तर बोलून घेता येईल. मी फोन करतोय. लागत नव्हता दुपारी.

माझे मुलीच्या बाबांशी बोलणे झाले.

या आजाराच्या उपचारासाठी BMT आणि ATG असे दोन ऑप्शन आहेत. जर BMT चा खर्च परवडत नसेल (जर एवढे फंडिंग उभे रहात नसेल तर) तर ATG सुद्धा खूपच चांगला पर्याय आहे. >>>> ATG ची वेळ गेली आहे. BMT साठी BM मिळण्याची शक्यता असताना २५ लाख हे एस्टीमेट हॉस्पिटलने दिले आहे. पण दुर्दैवाने BM उपलब्ध होत नाही. वडलांचा BM ७०% जुळतो. त्याला दहाच्या स्केलमधे सात गुण जुळतात असे म्हणतात. त्यांच्या दृष्टीने ५०% मॅच आहे. मुलीला आता दर चार दिवसांनी त्रास होत असल्याने वेळ कमी आहे.

वर लोकमतची बातमी आहे. तसे लेखी आलेले नाही. तसेच BMT त्यात येत नाही. महात्मा फुले योजना, पाच लाखाची मदत यातले काहीच मिळत नाही. कुर्ला इथल्या आमदाराचे पत्र दिले आहे पण उपयोग होत नाही.

सीएम फंड
सिधीविनायक फंड
आणि अन्य सात ट्रस्ट कडे हॉस्पिटलने दिलेले पत्र मुलीच्या बाबांनी दिले आहे.

डॉक्टर म्हणतात कि वेळ कमी आणि अमाउंट मोठी आहे. शर्यत आहे.
त्यांच्या भावाचा नंबर मला ते देणार आहेत. त्यांच्या सोबत वेन्किज आणि सिप्ला मधे जाऊन येईन.

एम्समधे विचारायचं आहे. दिल्लीला जावे लागेल. कसे जमवायचे हा विचार करतोय.
केजरीवाल यांना ओळखणारे कुणी असतील तर कळवा. दिल्लीत मोफत उपचार होत असेल तर त्यांना कळवतो.

मायबोलीवर दिल्लीला रहाणारे कोणी असेल व ती व्यक्ती मदतीला तयार असल्यास एम्सचे तुम्हीदोघे मिळुन काही करता येईल का? मोठे बिझनेसमन, नटनट्या यांच्या काही मदतयजोना असतात का?
तुम्ही ओळख नसताना जातीने पुढे आलाहात याबद्दल कौतुक. ऑल द बेस्ट.

मी थोडीफार चौकशी केली.तर काही गोष्टी कळल्या. कदाचित त्या इकडे बऱ्याच जणांना माहिती असतील पण उल्लेख दिसला नाही त्यामुळे जर काही मदत होण्यासारखी असेल तर म्हणून टाकते. अनावश्यक असेल तर दुर्लक्ष करा.
--

25 Lakh mothi amt ahe... 2/3 thikan Milun try karta yeu shakte... pratyek hospital madhye medical social worker asato tyache letter lagte... then govt mediclaim, sidhivinayak trust, lalbaugacha raja... he sagle documents verify karun madat kartat...
Hospital chya medical social worker Kade mothi list asate Sansthanchi... they guide in such cases
Pratyek Mothya hospital la mandatory ahe medical social worker

मदत केली आहे.
मुलीला लवकर बोन मॅरो मिळून बरं वाटो.

बरेच दिवस अपडेट्स न मिळाल्याने पुढे काय झाले हे समजले नाही.

गेल्या खेपेला छोटी मदत पाठवली होती. पण लागणारी रक्कम मोठी असल्याने चुटपूट लागली होती.
आताही खारीचा वाटाच पाठवला आहे.

दुर्दैवाने BM उपलब्ध होत नाही. वडलांचा BM ७०% जुळतो. >> या स्केलवर BMT करणे मुलीसाठी घातक आहे. ATG ची वेळ गेली म्हणजे?? उलट परफेक्ट BM मिळत नसेल तरच ATGचा विचार करतात डाॅक्टर.
माझ्यासाठी पण बहिणीचा आणि भावाचा HLA typing report आधी करायला लावला आणि दोघांचाही 50% match झाल्यामुळे life risk घेण्यापेक्षा ATG Treatment करण्यात आली.
अर्थात प्रत्येक डाॅक्टरांचे निर्णय घेण्याचे फॅक्टर वेगवेगळे असू शकतात. लहान मुलांच्या बाबतीत पण काही वेगळे घटक असू शकतातच.
मला शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांना थँक्स. पण माझा ग्रेटनेस फक्त पाॅझीटिव्ह राहण्यापुरताच मर्यादित होता. खरे ग्रेट श्री स्वामी समर्थ आणि डाॅक्टर अभिजीत गणपूले.

>>>>>>>बरेच दिवस अपडेट्स न मिळाल्याने पुढे काय झाले हे समजले नाही.
आय डी उडालेला दिसतोय.

खरंच की !
तरी पण सामना या आय डी ने मायबोली वर त्या मुलीच्या मदती साठी एक स्तुत्य उपक्रम राबवला होता या बद्दल शंका नाही ....

ओह ! तरीच.

Submitted by Nidhii on 6 September, 2023 - 17:21 >>> कृपा करून दिलेल्या फोन नंबर वर संपर्क करून त्यांच्या डॉक्टरांशी बोलाल का का ? तुमच्या शंका रास्त असतील तर त्यांनाही समजेल. मदत करणार्‍यांनाही समजेल. इथे पण अपडेट द्या.

जर वेगळी परिस्थिती असेल तर या शंकांमुळे मदत करू इच्छिणार्‍यांच्या मनात संशय निर्माण होईल.

तरी पण सामना या आय डी ने मायबोली वर त्या मुलीच्या मदती साठी एक स्तुत्य उपक्रम राबवला होता या बद्दल शंका ना >>
बाजारू सिनेमावर कष्टाचे पैसे घालवायचे आवाहन करणारे धागे काढायला हवे होते म्हणजे आयडी टिकला असता यांचा. Proud