घोरणारा नवरा

Submitted by ढंपस टंपू on 4 August, 2023 - 23:36

घोरण्यासाठी पुरूष त्यातही लग्न झालेले जास्त बदनाम आहेत.
आमच्या इथल्या एक काकू नेहमी त्यांच्या नवर्‍याच्या घोरण्याची तक्रार करतात. विषय निघाला कि त्यांचं नवर्‍याचं घोरायण सुरू होतं.
त्या तितक्या वैतागत असतीलच म्हणा. पण ऐकणार्‍यांचं मनोरंजन होतं. कधी कधी वैताग येतत, तर त्या व्यक्तीला किती सहन करावे लागत असेल ?
पण एकदा त्या काकांनी काकूंच्या घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करून फनफेअर मधे ऐकवला होता. तेव्हांपासून काकूंची तक्रार थोडी कमी झाली आहे.

घोरणार्‍या माणसाला कधीच पटत नाही कि तो स्वतः पण घोरतो. तो द्सर्‍याच्या घोरण्यावर चिडतो, पण आपणही घोरतो हे स्विकारायला त्याला जड जातं.
घोरण्याचे पण खूप प्रकार असतात. एकच माणूस घोरताना वेगवेगळे राग आळवत असतो.

अगदी सुरूवातीला बारीक घोरणे असते.
मग श्वास अडकायला लागला कि ख्ख ख्खॅ ख्खॅ ...ख्ख्र ख्र्खर्र ....ख्ख्खा .... ख्रारर्रा...
मग ख्खो..... ख्ख्खूओ... ख्खुअआ.... ख्खूऊख्ख्खूऊऊऊऊ ..... ख्ख्खूओ

असे चित्रविचित्र आवाज येऊ लागतात.
मग भीड चेपल्याप्रमाणे साऊंड लेव्हल वाढत जाते.
कानठाळ्या बसायला लागतात.
नंतर तर बाँबस्फोट होतायत कि काय असे आवाज येऊ लागतात.

तुम्हाला कुणाच्या घोरण्याचा त्रास होतो का ?
असे काही किस्से आहेत का ?
कारण घोरणारा मनुष्य हा अगदी बुद्धासारखा शांत असतो. त्याच्या चेहर्‍यावर ध्यान लागल्यासारखे भाव असतात.
त्या वेळेला त्याच्या चेहर्‍यावर पवित्र भाव असतात.

घोरणार्‍याला काही त्रास होत असतो का ?
घोरणे जीवघेणे ठरू शकते का ? अन्य काही परिणाम होतात का ?
घोरण्याच्या मागची कारणे काय असतील ?

घोरणे बरे होऊ शकते का ?
त्यासाठी काय उपचार आहेत ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हा एक गंभीर विषय आहे.
मोहन नावाचा एक तरुण आहे..तो आयटित जॉब करत आहे..एकदा तो कलिग्ज बरोबर पिकनिक ला गेला असता त्याचं घोरणं पाहून त्याचं नाव मोटरमोहन पडलं..
तो कंपनी बसने ऑफिस ला जात असता त्याची क्रश शेजारी बसली होती तीला कसं प्रपोज करावं हा विचार करता करता त्याचा डोळा लागला आणि आणि घोरणं ऐकून क्रश दूर पळाली कायमची....
एकदा दुपारी हॉलमध्ये टिव्ही पाहता पाहता त्याचा डोळा लागला..लहाण बहिणीच्या कॉलेज मैत्रिणी घरी आल्या मोहनचं घोरणं ऐकून बहिणीला खूप चिडवून हसून गेल्या..आणि मोहन आणि बहिणीचं भांडण झालं..
कसंबसं लग्न झालं मोहनचं.. पंधरा दिवसानंतर बायको फार आजारी पडली दवाखान्यात एडमिट केलं..डॉक्टर म्हटले ती पंधरा दिवस झोपलीच नाही...
औषधपाणी, उपास तापास, काढे,दुसऱ्या व्यक्तीने इयरप्लग घालून झोपणे सगळे करून झाले पण मोहनचे घोरणे आणि इतरांचा त्रास काही कमी झाला नाही..
काय करावे सांगा ?

नासा मध्ये गेल्यावरसुद्धा तो पुन्हा इकडे गावातच येणार पवनचक्की बनवायला कारण शेतात राखणीला जाऊन घोरले तर दुहेरी फायदे होतात

दिवसा हवे ते काम करावे. रात्री मग जिथे रात्र पाळी चालते आणि जिथे काम करताना लोकांना झोप येते तिथे जाऊन झोपण्याचे काम करावे म्हणजे त्यांना झोप येणार नाही. या सेवेचाही चांगला मोबदला घ्यावा आणि स्वतःची झोप डिस्टर्ब होणार नाही अशा सर्व सोयी त्यांच्या कडून करून घ्यायच्या.
मस्त झोप होईल, घोरतो म्हणुन कोणाचे टोमणे ऐकून घ्यायची गरज नाही आणि सेवेचा हक्काचा मोबदलाही घ्यायचा.

माझ्या घोरण्यामुळे मी व बायको कित्येक वर्षे स्वतंत्र खोलीत झोपतो. तिला अगोदर झोप लागली व मला नंतर लागली तर म्हणे तिला माझ्या घोरण्याचा त्रास होत नव्हता. ्मी स्लिप ऎपनिया टेस्ट केली तर त्यात तो त्रास असल्याचे डिटेक्ट झाले. घोरणार्‍याला त्रास जाणवत नाही पण इतरांना त्याचा त्रास होत असतो.

काही लोकं एव्हढे तेजस्वी असतात की आपल्या घोरण्याचा त्रास बाकीच्यांना होऊ नये म्हणून घोरताना शिट्या मारण्याचं कसब त्यांनी डेव्हलप केलेलं असतं.

सोपे उपाय -
१)पहिली दोन तासांची झोप बसून डोकं पुढे टेबलवर टेकवून झोपणे. म्हणजे रेल्वेत/विमानात पुढे छोटा ट्रे दिलेला असतो त्यावर डोकं टेकून झोपतो तसे.
२)पालथं किंवा कुशीवर झोपणे.
३)कॉमन हॉलमध्ये बाजूचा घोरणारा असेल तर त्याच्या तळपायास पिसाने,मऊ काडीने गुदगुल्या करणे. (ही गोष्ट रेल्वेच्या बर्थवर झोपलेल्या सहप्रवाशासाठी लागू नाही.)आपल्या नशिबास दोष देणे एवढेच करू शकतो.