भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांचे सत्तापिसाट कडबोळे : चोराच्या उलट्या बोंबा.

Submitted by अलीबाबा on 17 July, 2023 - 10:57

सत्ता बळकावण्यासाठी काय वाट्टेल ते करणे व त्याचे समर्थन चाणक्यनीती, ऑपरेशन लोटस वगैरे म्हणत करणे, या भाजपच्या निलाजर्‍या खोटारडेपणाचा आता लोकांना वीट आलेला आहे.

हेडलाईन मॅनेजमेंट नावाचा अजून एक प्रकार आहे.

म्हणजे 'विरोधी पक्षांचे कडबोळे भाजपाला पर्याय होईल का' वगैरे हेडींग देउन लेख पाडायचा. त्याखाली कितीही पुराव्यासकट तोंडावर पाडले तरी वरवर पहाणार्‍यांना भाजप के खिलाफ सब लोक असे फिलींग द्यायचे काम होऊन गेलेले असते.

तेव्हा, विकिपेडियाचे हे पान : https://en.wikipedia.org/wiki/List_of_National_Democratic_Alliance_members

व त्याचा हा सारांश :
BjpAllies.jpg

हे पाहता,

खरीदून, धमकावून गोळा केलेले आमदार खासदार, अन स्वतःच सत्तेच्या आचळाला जळूसारखे चिकटलेले आठवले म्हणून पाठवले सारखे लोक, या सगळ्यांच्या भाजपेयी कडबोळ्याचे बिलंदर सरदार किती दिवस अंबादाणीच्या आडदांड पैशाच्या अन त्यांच्या मालकीच्या च्यानल्सच्या जोरावर सत्ता बळकावणार व आपण त्यांना आपला खिसा खाली करू देणार, हे ठरवायची वेळ आलेली आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय. ते रिजनल स्टेट गव्हर्नमेंट बळकावून राज्यसभेत बळ मिळविण्यासाठी केलेले आहे.

Yup.

अटल बिहारी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा bjp कडे स्वतःचे पूर्ण बहुमत होते.
बाकी पक्षांचे नेते फक्त फोटो काढून घेण्यासाठी अटल बिहारी ह्यांच्या बाजू नी लोकसभेत असायचे.
लाचार कुठले

Our 38 partners have confirmed attending the NDA meeting to be held tomorrow, says BJP National President JP Nadda.

ते d for developmental का d for democratic नक्की काय ते फायनल झाले का ?

खूप वेळा एकच सांगायला लागत बघा.
Bjp मुळे
भारताची लोकशाही धोक्यात आली आहे.
सर्व स्वायत्त संवैधनिक संस्था धोक्यात आल्या आहेत.
अघोषित आणीबाणी च देशात आहे.
म्हणून सर्व bjp विरुद्ध एक होत आहेत.
त्या आघाडी च काही ही नाव असू ध्या हेतू महत्वाचा आहे
आता हे पाठ करून ठेवा .
परत परत विचारू नका.
पाठ होण्यासाठी 100 वेळा वहीत लिहून घ्या.

पर नुस्त ईरोधी पक्षाच्या आघाडीच नाव ऐकुनच मोदीजींले ईतकी धडकी भरली की त्यायले ईंडिया या नावाचीच भिती वाटायली नी ईंडिया नावाशीच नफरत झाली भक्तभी आता ईंडिया ह्ये नाव कस गुलामगीरीच लक्षण हाय ह्ये पटवून देन्यासाठी जीवाच रान करायले लागलेत ब्वा..

या आघाडी च काही ही नाव असू ध्या हेतू महत्वाचा आहे

Submitted by Hemant 333 on 18 July, 2023 - 19:34

हेतू एकाच, सत्ता बळकावणे.

इथून तिथून अथ ते इति सगळेच नीच सत्ताकारणी

ते खाणार मलिदा तुम्ही बसा भांडत