बायका वय का चोरतात ?

Submitted by ढंपस टंपू on 6 July, 2023 - 22:44

बाईचे वय आणि पुरूषाचा पगार विचारू नये असं म्हणतात.
अपवाद वगळता कोणतीच बाई आपले वय खरे सांगत नाही हा सर्वांचा अनुभव असेल. बायका बायकात गप्पा मारताना मुलांची वयं सुद्धा दोन वर्षांनी कमीच सांगतात. कधी कधी कुणाचा सोनू तीन वर्षांपासून पाच वर्षांचा राहतो. त्यामुळं वय चोरलं तरी इतरांना ते माहिती असतं. पण तरी वय चोरतातच.

असं का ?
कृहघ्या.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात गिल्टी फीलिंग येण्यासारखं काहीच नाही. ते सुद्धा एक टॅलंट आहे ज्याचा अभिमान वाटायला पाहीजे.
करून बघा. मज्जा येते. मायबोलीवर सुद्धा सगळे वय चोरतात. पण सिनेमाबद्दल लिहीताना ते उघडे पडते. मग प्रतिसादच असे द्यायचे कि वय कळलेच नाही पाहीजे. हे टॅलेण्ट पणाला लावण्यात तर खरी मज्जा आहे. तुम्ही नेमक्या कुठल्या कालखंडातले आहात याचा पत्ता नाही लागला पाहीजे.
मधूनच सैगल बद्दल लिहा. पण ते जरा जास्तच वाटू लागले कि मग सांगा टीव्हीवर पाहिला. नैतर शोले पाहिला तेव्हां जन्म झाला होता आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे च्या वेळी आईच्या कडेवर होतो असं लिहा.

कुणाला काय वाटेल याची भीडभाड ठेवू नका. लोकांचं ही मनोरंजन आणि आपल्याही बुद्धीला चाळा !

पुरुष (प्रसंगी) श्वास रोखून ढेऱ्या ज्याच्यासाठी आत ओढतात त्याच्यासाठीच ! >> मायबोलीवर लिहायला कशाला ढेरी आत ओढायला पाहीजे ? उलट थुलथुलीत ढेरी हसवत हलवत लाजलज्जा आत ओढून हसत प्रतिसाद द्यायचे. हाकानाका Proud

बाईचे वय आणि पुरूषाचा पगार विचारू नये असं म्हणतात.
,>>>>>>>>

हे फार जुने झाले जेव्हा फक्त पुरुष कमवायचे. आता दोघे कमावतात.

त्यामुळे हे वाक्य आजच्या जमान्यात बदलले आहे,
बायकांना आणि स्मार्ट पुरुषांना वय विचारू नये।

वयाचे टप्पे दिले आहेत.
आणि कंसात वय लपवण्या ची कारण दिली आहेत
1) वय वर्ष वीस पर्यंत वय लपवले जात नाही उलट एकाद वर्ष वाढवून च सांगितले जाते
( मी आता लहान नाही जवान झालो आहे)
२) २० ते ६० पर्यंत मात्र वय लपवले जाते ,वय कमी सांगितले जाते .
(
( मी अजून तरुण आहे अजून काही म्हातारा झालो नाही)
३) पण६० नंतर परत आहे त्या पेक्षा जास्त वय सांगितले जाते
(बघा माझे वय इतके आहे पण आहे ना फिट)

बायका काय काही बाबे पण वय चोरून सांगतात.

आमची आई स्वतःचं आणि मुलांचं वय कायम 2 वर्ष वाढवून सांगते. कधी कधी 4... जेंव्हा ती 51 वर्षाची झाली तेंव्हा पासून म्हणते 'आता काही वर्षांत साठी येईल'

जसे वय चोरून सांगणारे लोकं असतात तसे समोरच्याचे वय काय असावे यात फुकटचा इंटरेस्ट दाखवणारे लोकं सुद्धा असतात. ही माहिती मिळवून त्यांना काय करायचे असते हे ही बरेचदा त्यांना स्वताला माहीत नसते. तरी आपल्याकडे बायकांना त्यांचे वय विचाराने शिष्टाचारात बसत नाही. पण पुरुषांना मात्र कोणीही तोंड वर करून माहितीचा अधिकार असल्यागत वय विचारते. बरं नाही सांगितले तर मग याच्या मुलांचे वय काय, याचे लग्न कधी झाले असावे, हा जॉबला कधी लागला, दहावी कुठल्या वर्षी वगैर माहिती गोळा करत अंदाज बांधत बसतात...

मी तर बिलकुल कोणाला वय सांगत नाही. ना खरे ना खोटे. खेळत बसा अंदाज अपना अपना Happy

आमची आई स्वतःचं आणि मुलांचं वय कायम 2 वर्ष वाढवून सांगते. कधी कधी 4... जेंव्हा ती 51 वर्षाची झाली तेंव्हा पासून म्हणते 'आता काही वर्षांत साठी येईल'>>>> Rofl हाऊ क्युट..

^^^:हाहा:
संयुक्त आयडीचा इफेक्ट असतो. जात नाही. Happy

ह्या लायनीतले दर्दी पुरुष असतात त्यांना बायकांनी कितीही चोरले तरी अ‍ॅक्चुअल करेक्ट वय कळतेच. उगीच मज्जा.

फोन कॉल वरून ऐकू येणाऱ्या आवाज वरून वयाचा काही प्रमाणात अचूक अंदाज येतो.
तरुण मुलगी /मुलगा आहे.
मध्यम वयीन स्त्री/पुरुष आहे
की वयस्कर .
स्त्री/पुरुष आहे.
ही कला सर्वांकडे असावी आवाज वरून वयाचा अंदाज घेण्याची

अमा Lol