द साउंड ऑफ मॅजिकः एन मॅक माहिती

Submitted by अश्विनीमामी on 21 May, 2023 - 10:08

द साउंड ऑफ म्युझिक परी क्षणाच्या धाग्यावर एन मॅक चा उल्लेख आहे, त्याची जास्त माहिती देत आहे.

https://nmacc.com/

ही ऑफि शिअल साइट आहे. तिथे सर्व माहिती व आगामी नाटके प्रयोग ह्या बद्दल माहिती व बुकींग डिटेल्स आहेतच.
एन मॅक हा जिओ वर्ल्ड युनिवर्स चा एक मोठा भाग आहे. मुंब ई येथील बांद्रा कुर्ला काँप्लेक्स येथे हे मोठे सांस्कृ तिक केंद्र नव्याने बनले आहे.
इथे एक ग्रांड थिएटर व इतर छोट्या मोठ्या स्पेसेस, आर्ट गॅलरी , काही लक्षरी ब्रँड्स ची ओपन प्लान दुकाने असे आहे. तीन कि चार मजली इमारत असावी. ग्रँड थिएटर ह्याची एंट्री ११ व्या गेट मधून आहे. अगदी गेट समोर गाड्या प्रेक्षकांना उतरवू शकतात. व लगेच व्हील चेअर असिस्टन्स उपलब्ध आहे. जिओ वर्ल्ड कन्वे न्शन सेंटर जिओ ड्राइव्ह नं तर हे गेट आहे. व तुम्ही अमेरिकन स्कूल ऑफ बाँब्बे व धिरु भाई अंबा नी स्कूल चा जो बोर्ड आहे तिथुन पुढला यु टर्न घेउन थिएटर समोर उतरू शकता. उबर व ओला ने अ‍ॅक्सेसिबल आहे. ह्या टर्निन्ग वर धिरु भाई अंबानी स्क्वेर असा मोठा बोर्ड आहे. उबरवाल्याला सांगायला सोपे.

एकदा आत गेले की मुंबई म्हणजे जागेची कमतरता हे समीकरण विसरायला होते. सर्व फार स्वच्च्छ व प्रशस्त आहे. अंबानी कलेक्षन मधील आर्ट व मुर्ती ठेवलेल्या आहेत. नव्या शोज चे बोर्ड आहे त. पूर्ण वास्तूचे इंटिरीअर एकाच प्रकारच्या शुभ्र व ग्रे रंगाच्या संगमरवर तून बनवलेला आहे. आपली मानसिक ममव धारणा असते त्या प्रमाणे अंगावर ये णारे नाही. वर्ल्ड क्लास हे एकच विशेषण डोक्यात येते. प्रत्येक मजल्यावर स्नॅक्स चे टर्मिनल्स व भरपूर स्वच्च्छता गृहे आहेत. स्त्री पुरु ष व दिव्यांग व्यक्तीं साठी वेग वेगळी उपलब्ध आहेत. तिथे आत पुष्प रचना, function at() { [native code] }इशय स्वच्छता व भरपूर चकचकीत आरसे व अटेंडंट्स आहेत. सभा गृहाच्या प्रत्येक गेट पाशी अगदी ट्रेंन्ड असिस्टंट आहेत. फारच विनम्र वागतात. व मदत् करतात.

मेन सभाग्रू ह फार मोठे आहे. तुलनेने एन सी पी ए मेन थिएटर पेक्षा. प्रुथ्वी थिएटर काही मी बघितले नाही. दोन बालकनी लेव्हल आहेत आमची मधली बालकनी होती. पण तिथून शो व्यवस्थित दिसतो व ऐकू येतो. पहिल्या मजल्या पेक्षा ह्या दुसर्‍या मजल्याव्र स्नॅक्स साठी कमी लायनी होत्या. चहा कॉफी पाणी, फ्रुट प्लॅ टर , चॉकोलेट डोनट छोट्या साइजचे दोन, वडापाव( एका पैशा त दोन वडापाव चटणी मिरची नाही)
च टनी व चीज सेंडविच. व चिप्स इत्यादि उपल ब्ध आहे. मुलांसाठी क्यांडीचा पण स्टॉल आहे. व बारके हॅमलीज चे दुकान.

मेन सभा गृहातील खुर्च्या प्रशस्त व आरामशीर आहेत. एसी न जाणवेल असे आहे.

आमचा काल जेवणाचा प्लान फार वाया गेला पण कधी कधी वेगळ्या अनुभवा साठी थोडी गैरसोय सहन करावी लागते. आम्ही एक वडापाव व एक चटणी सँडविच घेतला. व शेअर केला.

उर लेला ट्रे मी डस्टबिन मध्ये टाकायला निघाले पण तो ही मेन होस्टॅस ने हातातून घेतला. मी टाकते म्हटली. अगदी जेन्युइन सर्विस हेतुने.
असे असते श्रीमंतांचे जग म्हणून मी फ्रूट्स व डोन ट्स घ्यायला लायनीत उभे राहिले पण मग लक्षात आले की हातात पैसे नाहीत. पर्स लेकीकडे आहे!!! व लगेच मध्यंतर संपलेच मग आत शिरलो. फक्त पाण्याची छोटी बाटली आत न्यायला परवानगी आहे.

इथे माबोकरणीने लिहिले होते की शो संपल्यावर ओला उबर मिळत नाही म्हणून आम्ही दुपारीच बुक करुन ठेवलेल्या दोन्ही व ट्रिप शेड्यु ल केलेल्या. पण १०. २१ ला कार्यक्रम संपला व लगेच ओला मिळाली. आपला मराठी भाउच.

ह्या सभागृहाचे पार्किन्ग बाहेर कुठेतरी आहे. त्यामुळे प्रत्येक श्रीमंत प्रेक्षक ड्रायवर ला फोन वर बोलावुन घेत होता व ट्रापिक जॅम झालेला.
पण प्रेक्षक वर्ग तसासुद्धा आंतरराष्ट्रीय , व सुपर पोलाइट. त्यामुळे कुठे ही दिल्ली स्टाइल बाचाबाची दिसली नाही.

प्रेक्षक वर्ग सर्व वयोगटाचा आहे. अगदी म्हातारे लोक पण होते व व्हीलचेअर प्लस अटेंडंट उपलब्ध होता. मला मेन सभा गृहात एक बॉक्स चे सीट्स घ्यायचे होते. ह्याला सेपरेट बटलर व स्वच्छता गृह उपलब्ध आहे. पण हे फार महाग आहेत. उससे अच्छा एक एफडी कर लेंगे असे माझे व मुलीचे एकमत झाले. पण एक अनुभव म्हणून व डॉलर व्हॅल्यु मध्ये परवडन्या सारखे असावे. चॉइस इ ज युअर्स.

सर्व लिफ्ट एकदम घरापेक्षा मोठ्या व चकचकीत आहेत. तोच मार्बल सगळी कडे. वहि नींचा एक फोटो आहे फक्त फुल लेंग्थ.

इथे एक म्युझीअम, छोटी मोठी सभागृहे आहेत. आर्ट गॅलरी पण आहे. हे सर्व कधी तरी बघायला जाउच.

मुलांसाठी चित्रे रंगवण्याची वर्क शॉप्स पण घेतली जातात. जनरल समर फन.

गुजराती पद्धतीनुसार मारबल मध्ये मार्बल मुर्तींचे राधा - कृ ष्ण आहेत. रात्री ते झोपले म्हणून वरुन गुलाबी चकचकीत पडदा ओढला होता.
अनुपमा बघून मला हे एकदम माहीत झाले आहे. मी दादा व वहिनींच्या सौख्या - आरोग्या साठी प्रार्थना केली. सर्वत्र बाईची नजर व देखरेख जाणवते. रिलायन्सचा डिविडंट आला की मला मुकेश भाईने भाउबीज दिली गरीब बहिणीला असेच वाटायचे. दुसरे भौ आमचे रतन टाटाजी. हार्ट हार्ट.

मी मुंबईत आल्यावर एनसीपीए चे प्रॉग्राम बघायचे खूप प्रयत्न केले. एकदा तर दोन प्रोग्राम बुक केले होते. सकाळी झाकीर हुसेन तबला व सतार निलाद्री तो बघितला मग रात्री नौ ला राजस्तानी गाण्यांचा प्रॉग्राम होता. तो ही बघायचाच होता. पण घरी कुत्रा! व परत जायचे अंतर फार होते.
मग तिकिटाचे पैसे वाया गेले. आपल्या लिमिट लक्षात येतात. तिथेच चार पाच तास हॉटेलात राहो असा विचार केला पण ते वर्केबल नाही आपल्याला. एन सी पी ए साठी तुम्ही तिथेच राह्यला पाहिजे. अजुनही प्रॉग्रामच्या मेल्स रेगुलरली येतात. पण एक तर हवे ते कार्य क्रम वर्किंग डेला साडे सहाला!! नाहीतर लगेच बुक होउन जातात.

प्रुथ्वी थिए ट र व कॅफेत पण जायचे आहे. पन सेंट्रल वेस्टर्न करणे जमत नाही. एक बार वो भी करना है.

अश्या प्रेक्षकांना एन मॅक हा एक उत्तम पर्याय आहे. पण प्री बुकींग आवश्यकच आहे. व जायची यायची सोय बघा. आजु बाजूला जेवाय खायचे स्वस्त पर्याय नाहीत. एक तर घरुन जेवुन या डबे घेउन या. किंवा वडापव/ समोसा.

जनरल आंबिआन्स चांगला आंरा. एअर्पोर्ट/ पंचतारांकित हॉटेल असा आहे व सर्विस लेव्हल्स तश्याच आहेत. समोरच ट्रायडें ट हॉटेल आहे तिथे शो नंतर जेवता येइल. ह्या लोकांनी मिनी मील म्हणजे उदा: एक वाटी पनीर व भात एक दोन रोटी व रायता लोणचे अशी एक मिनी मील दिली तर बरे होईल. किंवा थेप ले- लोणचे( हे मुंबईत अनेक मिठा ई शॉप मध्ये मिळते. मी अनेक वेळा घेतले आहे अडीनडीस पोटाला आधार. / मसाले भात व सार/ आलु पराठे दही/ राजमा चावल/ दही भात असे पोटभरीचे काहीतरी. हैद्राबादच्या आय मॅक्स मध्ये ओहरी फुड कोर्ट मध्ये हा पर्याय उपलब्ध आहे. पण आपली काही तक्रार नाही. अगदीच ममव सूचना आहे. सेंट र मध्ये फुल फ्लेज्ड रेस्टॉरेंट नाही हे लक्षात ठेवा.

उत्साही प्रेक्षक कुर्ल्या मध्ये बैदा रोटी, खिमा रोटी, पाव / बिर्याणी खाउ शकतातच. आम्ही आज घरीच मागवून रविवार साजरा केला.
फोटॉ थोडेच आहेत फोन वरुन अपलो ड करते.

आपण प्रोग्राम बघून ग्रुपने बुकींग करुन इथे भेटू शकतो. व कलांचा आनंद घेउ शकतो. जिओ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त लेख. हे सेंटर उघडलं तेव्हाच्या बातम्या वाचून उत्सुकता होती. तुमचा लेख इतका चित्रदर्शी आहे की आत जाऊन फिरवून आणलं तुम्ही वाचकांना.
कीप रायटिंग!

मस्त लेख.
भारताच्या भावी सांस्कृतिक जडणघडणीत अंबानी हे नाव सुवर्णाक्षरात कोरले जाईल.
इथे गौतमी पाटील यांचा कार्यक्रम असेल तेव्हां दहा दहाची बंडल्स घेऊन जाईन नक्की,

इथे मुंबई लोकल ने जायचे असल्यास बांद्रा स्टेशन ला उतरावे की कुर्ला स्टेशन ला ?

इथे मुंबई लोकल ने जायचे असल्यास बांद्रा स्टेशन ला उतरावे की कुर्ला स्टेशन ला ?>> सेंट्रल लायनी वरून कुर्ल्याला उतरा. वेस्टर्न वरुन बांद्र्याला उतरा. बीके सी कॉम्प्लेक्स मध्ये आहे ही जागा.

३० तारखेला संध्याकाळी साडेसातला निलाद्री कुमार त्यांचे सुपुत्र व पंडित हरि प्रसाद चौरासिया व त्यांचे शिष्य असा पाव्णे तीन तासांचा कार्यक्रम आहे. त्याचे बुकिंग केले आहे. सतार व बासरी वादनाचा कार्यक्रम आहे. परंपरा म्हणून कार्यक्रम दर वर्शी होतो. पण बहुतेक षणमुखानंद हॉल ला व्हायचा. त्यापेक्षा हा व्हेन्यू फारच बेटर आहे. नेक्स्ट डे एक तारखेला सरोद अमज द अली खान व त्यांची मुले व शिष्य ह्यांचा कार्यक्रम आहे. माझी सतार व फ्लुटला पसंती आहे.

परवा शुक्रवारी एन मॅक मध्ये गेलेलो. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने शास्त्रीय वाद्य संगीताचे कार्यक्रम होते. त्यातील मला निलाद्री कुमार कार्तिक कुमार ह्यांचे सतार वादन व पं हरिप्रसाद चौरासिया राकेश चौरसिया ह्यांचे बासरी वादन ऐकायचे होते.

सुरुवातीला सौ नीता वहिनींचे भावुक भाष ण झाले. त्यामुळे पूर्ण कार्यक्रम अर्धा पाउण तासाने उशीरा सुरू झाला. कार्तिक कुमार रविशंकरांचे शिष्य. चौरासियाजी अन्नपुर्णा देवी ह्यांचे शिष्य. कार्तिक कुमार व निलाद्री ह्यांनी चतुरंग मल्हार राग सादर केला. सुरदासी मल्हार, गौड मल्हार मिया की मल्हार आणि अजून एक. ह्यांचे मिश्रण सुराव टीत होते. उत्तम कार्यक्रम झाला. सत्यजित तळवळ कर ह्यांनी जबरदस्त तबल्याची साथ संगत केली. व श्रीधर पार्थ सारथी ह्यांनी ताकदीने मृदंगम वाजवला. ढोलक ची पण एक साथ होती. पुढे निलाद्री ह्यांनी एक धून झिटार ह्या त्यांनी संशोधित केले ल्या सतार व गिटार ह्यांच्या मीलनातून बनलेल्या वाद्यावर सादर केली. ही पण सुश्राव्य होती.
एन मॅक चे ऑडिओ एकदम परफेक्ट आहे. ह्याच्या साउंड चेक साठी पं झाकीर हुसेन व पं निलाद्री दोन वर्शा पुर्वी आले होते. एकदम परफेक्ट गोळी बंद पर्फॉरमन्स. सतार वादन संपवल्यावर ८७ वर्शांचे कार्तिक कुमार स्टेज वरुन उतरून खाली येउन बसले तेव्हा निलाद्रीने त्यांना पायातील बूट घालायला व चालत उतरायला मदत केली. तेव्हा डोळ्यात पाणी आले. अगदी हृद्य वेळा. गुरु शिष्य परंपरा व त्यापुढे वडील मुलगा बाँड.
मागील स्क्रीन वर चंद्र व तळ्याचे निळे पाणी कमळे असा सुरेख शांतवणा रा सीन होता.

दुसर्‍या भागात बासरी वादना चा आनंद लुटला. माझ्याकडॅ हरी प्रसादांच्या वादनाचे मजबूत कलेक्षन होते. आता सर्व स्पॉटिफायची कृपा. सध्या प्रवीण घोड खिंडी चे वादन पण ऐकते. उत्तम आहे त्याच्या वादनाचे कलेक्षन.

वयानु सार हरिप्रसादांचे हात शेक करत होते. पण त्यांनी वादन व्यवस्थित केले. बरोबरीने सहा शिष्या होत्या. त्यातील एक रेने म्हणून जस्ट ग्राजुएट झालेली मुलगी हिने गुरु: ब्रम्हा श्लोक गायला शेवटी. ओम जय जगदीश हरे चे पण वादन झाले. शिष्या तर खरेच गोपींसारख्या वाटत होत्या हातात बासरी घेउन वाजवताना. डोळे मिटून ऐकले तर शेक्स पीअरच्या मिड समर नाइट्स ड्रीम मध्ये एक रात्रीचा पर्‍यांचा सीन आहे त्याची आठवण आली. ह्याचे मराठी नाव पण छान आहे ग्रीष्म शर्व रीचे स्वप्न. मागच्या चित्रातले चंद्र तारे पण पूरक होते

शेवटाला कळले की एक जुलैला पंडितजींचा वाढदिवस असतो. ८० - ८५ वय आहे बहुतेक. मग राकेश जींनी बासरीवर हॅपी बर्थडे ट्युन वाजवले व सर्व प्रेक्षकांनी पण त्यांना गाणे म्हणून विश केले. एक सुरेख अनुभव.

मी १२ - १ ३ वर्शा पूर्वी हैद्राबादेत पं शिवकुमारजी व पं चौरासिया जी ह्यांचे संतूर बासरी वादन जुगल बंदी ऐकले आहे. तेव्हा बासरी जास्त जोरकस वाजत होती.

ह्या वेळी त्यांनी यमन राग वाजवला. तो ही रात्री. ते म्ह्टले की आम्ही अनेक वर्शे यमन वाजवत आहोत व आमचे विद्यार्थि पण आता यमन शिकत आहेत. ह्या ज्ञानाला अंत असा नाही.

नेक्स्ट डे सरोद वादन होते. पण पाउस व खर्चिक तिकेट ह्यामुळे जायचा विचार रहित केला. शुक्रवारी रजा घेतल्याने शनिवारी काम केले.
परंपरा कार्यक्रम दर वर्शी होतो पण ष ण मुखा नंद हॉल मध्ये व्हायचा. नोकरीत असताना तेव्हा रजा घेउन जाणे जमायचे नाही. यावेळी पूर्ण रजा घेतली. स्वतःच्या आव्डी चे कार्य क्रम बघायचेच असे ठरवले आहे. सौ नीता वहिनींनी गुलाबी डार्क कलरची बनारसी सिल्क साडी नेसलेली. व मोठा हार कानातली नेहमीप्रमाणे. मी पण बंगाली सिल्क ची साडी नेसलेले. प्रिंटेड. आपला फेवरिट टाइप.

आता एन मॅक मध्ये उत्तम क्वालिटीचे म्हणजे अगदी घरीच बनवलेले असतील असे ताजे छान ढोकळे मिळतात. गरम टोमाटो सूप मिळते. लै टेस्टी व माइल्ड. वडा पावचा आकार कमी झाला आहे. पण ऑथेंटिक. फार महाग नाही. त्यापेक्षा पीव्हीआर महाग आहे.