सुमधुर व अप्रतीम गायन - मैथिली ठाकूर !

Submitted by यक्ष on 3 May, 2023 - 01:50

सुमधुर व अप्रतीम गायन - मैथिली ठाकूर !
विशेषतः तिचे मराठी अभंग - अस्खलित मराठी शब्दोच्चार आणी सुमधुर स्वर.
दैवी देणगी....
https://www.youtube.com/watch?v=HLas-H_mEpQ

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैथीली ठाकुरचं ‘ऐगिरी नन्दिनी ‘ फार अप्रतिम आहे, उच्चार आणि लय खूप सुरेख !
मला माझ्या तामिळ मैत्रीणीने गोलु मधे लावलं होतं तेंव्हापासून फार आवडायला लागलं !
https://youtu.be/DEGcIi9aij8

लोकसंगीतवाली गायिका आहे. ती आणि तिचे दोन भाऊ लहानपणापासून गातात. ती गाते आणि पेटी वाजवते,भाऊ तबला आणि ताल. मजा येते. यूट्यूबवर सर्व विडिओ आहेत.
झुलेलाल मस्त कलंदर एवढं खास वाटलं नाही.

खरच हिंदी भाषिक आहेत का त्या? >>> हो, बिहारची आहे. पण तिचे उच्चार, विशेषतः मराठीतील 'ळ' हे अक्षर सुद्धा व्यवस्थित उच्चारते की ती हिंदी भाषिक आहे हे पटतच नाही!!! (उदा. अबीर गुलाल, उधळीत रंग) https://www.youtube.com/watch?v=1Dc9LS4jGbI

ती आणि तिचे दोन भाऊ लहानपणापासून गातात. >>> त्यांच्या घरातच संगीताचा वारसा आहे. त्यांच्या वडिलांकडून गाणे शिकले आहेत. मोठ्या भावाचे नाव - रिषव आणि धाकटा - अयाची

अबीर गुलाल
चांगलं गायलंय.
गुलाल, रंग ,महाराष्ट्र या सारखे शब्दोच्चार हिंदी भाषिक शेवटचे अक्षर तुटक म्हणतात. मैथिली बरोबर बोलते.

अभंग चांगले आणि वेगळे वाटले ऐकायला.
कोक स्टुडिओ चे 'आज बिरज मे' थोडं ऐकलं. एकदम रिमिक्स आहे असं वाटलं ते तर. वाद्यवृंद तर खूपच वेगवेगळे आवाज काढत होता.
'आज बिरज मे' हे शोभा गुर्टू यांचे ऐकले असल्याने तेच डोक्यात पक्कं बसलं आहे.(कोणाला ऐकायचे असल्यास https://youtu.be/6gpZDtfzkB8)