अगरबत्ती बिझनेस

Submitted by विनिता.झक्कास on 29 April, 2023 - 10:24

नमस्कार माबोकर,

सगळे खुशाल असाल अशी कामना करते.
सुचेतस इंडिया ही कम्पनि मी आणि माझ्या मुलाने सुरु केली आहे. हे मी मागे सांन्गितले होतेच.
ऑडिओ बन्वायची कामे सुरु आहेत. कुकू एफ एम, मिर्ची प्लस साठी काम सुरु आहे. चांगला रिस्पॉन्स आहे.

खादी ग्रामोद्योग मधे अगरबत्तीचे ट्रेनिंग घेऊन आता अगरबत्तीचे काम सुरु केले आहे. हा प्यूअर महिला उद्योग आहे.
भेसळमुक्त अ‍ॅलर्जी विरहित अगरबत्ती आम्ही बनवतो आहोत. तसेच अस्सल गाईच्या शेणाच्या गोवर्‍या पण सेल करतो आहोत.
डिलरशीप पण देणे सुरु आहे. महीला डोअर टू डोअर सेल करु शकतात. रिझल्ट छान आहे.

मला हे सांगायचे आहे की तुम्हांला एखादा उद्योग सुरु करायचा असेल तर सरकारी बर्‍याच योजना सुरु आहेत.
युवा आणी महिलांसाठी ज्याची सर्व माहीती आम्ही देऊ शकतो. नोकरी सांभाळून पण तुम्ही साईड इन्कम मिळवू शकता.
नोकरी सोडून मी ही कामे सुरु केली, तेव्हा मला पण याची कल्पना नव्हती की छंद पण आपले उत्पन्नाचे साधन बनू शकतो.
युवा आणि महिलांना थोडी साईड इन्कम मिळावी हाच पहिल्यापासून आमचा हेतू होता, तो बर्‍यापैकी साध्य होतो आहे.

आज सुचेतसचे मार्शल आर्टसचे वर्ग सुरु आहेत, ऑडिओ बुक बनत आहेत, महिला गृह उद्योग सुरु आहे.
लवकरच आम्ही लहान मुलींचे फ्रॉक मार्केटमधे आणत आहोत. जे चांगल्या क्वालिटीचे आणि माफक किंमतीचे असतील.
सुचेतस एफ एम सुरु होईल, बाल साहित्याचे अ‍ॅनिमेशन चॅनेल सुरु होत आहे.

आमच्या प्रवासात मायबोली नेहमीच सोबत होती. म्हणुन आज हे सर्व इथे सांगते आहे.
मनापासून धन्यवाद __/\__

- विनिता माने - पिसाळ

Group content visibility: 
Use group defaults