साहित्य चोरी मध्ये मैलाचा दगड

Submitted by स्वरुपसुमित on 6 April, 2023 - 00:22

मित्रानो

साहित्य चोरी हा नेहमी चघळा जाणार विषय आहे पण आज ह्यात मैलाचा दगड पडला
पहिल्यन्दा पोलीस complaint झाली आणि त्यावर शिक्का पण आहे हे आधी कोणी पण करू शकले नाही
दुसरे म्हणजे हे ऐवढे viral झाले कि ह्या वेळी सोक्ष मोक्ष लागणारच

https://www.facebook.com/JanardanKeshavHome/posts/pfbid0vctQtGVKFCCgoomB...

https://www.facebook.com/TheLayBhariOfficial/posts/pfbid0y2MCAJvccQDgLMV...

https://www.facebook.com/Maharashtra60/posts/pfbid0WHTPWzJ2zdqqjuqvipZ1b...

https://www.facebook.com/search/photos/?q=%22%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4...

आपापले साहित्य चोरी चे अनुभव प्रकट करावे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हम्म.मला टेक्निकली हे बरोबर वाटतं. पण एकंदरीत सायबर क्राईम आणि पोलिसांचे अल्प मनुष्यबळ यामुळे तक्रार कारवाई होईल का याबाबत शंका वाटते.त्यातही बाईंनी कॉपीराईट टाकला नसल्यास तो कॉपी करणारा 'मला माहित नव्हतं यांची आहे, मला वाटलं फॉरवर्ड आहे म्हणून मीपण टाकलं' असा बचाव मांडू शकतो.

कृपया मजकुरात आणखी सविस्तर लिहा. इतक्या लिंका बघायला नको वाटते.

नवीन Submitted by हरचंद पालव on 6 April, 2023 - 00:56

पया मजकुरात आणखी सविस्तर लिहावे >>>> +११

नवीन Submitted by कुमार१ on 6 April, 2023 - 02:0

नवीन काय लिहिनार
जे आहे लिन्क मधे आहेच स्वत्।अच्य्या दोन ओळी फक्त लिहिल्या आहेत

मायबोली पर्यंत आले का हे. त्यांनी पहिल्यांदा एका कवितांच्या ग्रुपवर टाकली होती ही पोस्ट तेंव्हा मी ती वाचली होती. पण आता मूळ पोस्ट तिथून डिलीट झालेली दिसते. त्यातली हि पोलीस कम्प्लेंट मात्र व्हायरल झाली आहे:

>>> गंमत म्हणजे लोकांनी त्या पत्राचा फोटो पण विना-परवानगी सोमीवर टाकला आहे.
Proud

इथे वाचून काय गडबड आहे ते कळलं - फेसबुकावर नुसत्याच प्रतिक्रिया दिसल्या होत्या.
इन्टलेक्च्युअल प्रॉपर्टीचं महत्त्व कळायला हवंच. कविता शेअर करण्याइतकी आवडते तर कवी/कवयित्रीला श्रेय द्यायचंही कळलं पाहिजे.
प्राजक्ता गोखल्यांचं अभिनंदन. या केसमध्ये काही कारवाई होईल न होईल, पण सुरुवात झाली हे उत्तम झालं.

यात आयरनी अशी आहे की कविता जशीच्या तशी टाकली म्हणून क्लेमतरी करता आला. पण आपल्या कल्पना, शब्द वगैरे ढापून लोक तातडीने त्याच्या पातळ आवृत्त्या काढतात त्याचं दु:ख आणखी मोठं असतं.

मला ती कविता वाचायचीय. >> +१

ChatGPT वापरून स्वतःच स्वत:ची एक कविता लिहायला हवी होती, खरं तर.

भविष्यातील सुधारणा:
मग दुसऱ्या नावाने स्वत:चीच ती कविता प्रकाशित करायची. आणि पहिल्या नावाने तक्रार करायची. म्हणजे छान जाहिरात होईल.

पोलीसांना दिलेल्या तक्रारीत चोरीला गेलेल्या दोन्ही कविताही लिहिल्या असत्या तर पोलीसांना व्यवस्थित तपास करता आला असता.

कविता चोरी वाईटच आहे. पण काही निरीक्षणं आहेत.

दर्जेदार कविता चोरीला जात नाहीत. ज्या कविता चोरीला जातात त्यांचा दर्जा काही भारी नसतो.
ज्या सहसा कुणी वाचत नाही त्यांची चोरी होते आणि असेच कवी जास्त दंगा करतात.
माझी कविता चोरीला जाते म्हणजे एव्हढा डिमांड आहे हे दाखवायची संधी.
कवितेमुळे मिळणार नाही एव्हढी प्रसिद्धी चोरीच्या बोंबाबोंबीमुळे होते.
दोन चार दिवस नाव होतं
उलट अशा चोरांना शोधून माझी कविता वाचणारा तू पहिलाच म्हणून घरी बोलवून सत्कार करायला पाहीजे

पोलीसांना दिलेल्या तक्रारीत चोरीला गेलेल्या दोन्ही कविताही लिहिल्या असत्या तर पोलीसांना व्यवस्थित तपास करता आला असता. >>> रोज अशा शंभर कविता वाचायला लागल्या तर काय होईल ?

मला ती कविता वाचायचीय....

Submitted by हाडळीचा आशिक on 6 April, 2023 - 09:49 >>> बघा. चोरी झाली म्हणून कविता काय आहे ते तर बघू ही जिग्यासा आली कि नाही ? एरव्ही तुम्हाला माहिती तरी होती का कवनी ताई आणि तिची कविता >

आय क्नो द फीलिंग. मी 1979 साली 'दोन सरदारजी बुद्धिबळ खेळत होते' असा जोक केलेला. त्यानंतर हजारो लोकांनी तो कॉपी केला पण त्याचं क्रेडिट मला कधीच मिळालं नाही Sad

मी मागच्या जन्मात सेम जोक केला होता. १९४७ साली.
त्यानंतर ब्रिटीशांची गोळी खाऊन मी शहीद झालो हे स्पष्ट आठवतं.

आय क्नो द फीलिंग. मी 1979 साली 'दोन सरदारजी बुद्धिबळ खेळत होते' असा जोक केलेला. त्यानंतर हजारो लोकांनी तो कॉपी केला पण त्याचं क्रेडिट मला कधीच मिळालं नाही
>>>>>>

क्रेडीट काय? कम्प्लेंट केली त्या समाजाने तर कारवाई होईल. वाचलात तुम्ही खरे तर..

मी मोरोबानी केलेल्या जोकला क्रेडिट देतो आणि त्यात थोडी भर घालतो.

दोन सरदारजी बुद्धिबळ खेळत होते.

दुसरा पहील्याला म्हणाला की तू तर चॅम्पियन आहेस, मला सहज हरवशील. म्हणून पहिला म्हणाला, अरे मी तुझ्याबरोबर डाव्या हाताने बुद्धिबळ खेळीन. मग दुसरा लगेच तयार झाला आणि हरला. तितक्यात त्याचे अजून २ सरदारजी मित्र तिथे आले. दुसऱ्याने त्यांना सांगितले की मला पाहिल्याने आत्ताच हरवले. तर मित्रांपैकी एक लगेच म्हणाला, अरे तू हरणारच कारण तो पहिला सरदार खरं तर डावखुराच आहे.

दुसरा म्हणाला की हरकत नाही.पण आता तुम्ही दोघे आलाच आहात, तर चला डबल्स खेळू.

सरदारजी आणि बुद्धीबळ by उपाशी बोका is licensed under CC BY-SA 4.0

एरव्ही तुम्हाला माहिती तरी होती का कवनी ताई आणि तिची कविता >> ही गोष्ट खरी आहे. पब्लीसिटी स्टंट पण असु शकतो. पण असा प्रत्येक कवी पोलीसात जायला लागला तर सायबर सेल सारखा नवीन विभाग काढावा लागेल.

या विषयावर आधीच बरीच बॅन्डविड्थ खर्च करण्यात आली आहे. जर लेखन हा तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय नसेल तर मुळात जिथेतिथे काॅपीराईटचा अट्टाहास कशाला? मूळ लेखक Creative Commons सारखे लायसन्स का वापरत नाही?

एक पक्ष आणि चिन्ह सर्वांदेखत दिवसाढवळ्या चोरीला गेला, त्याच्यावर अजून काथ्याकूट चालू आहे, तिथे कवितेचं काय !

>> ही गोष्ट खरी आहे. पब्लीसिटी स्टंट पण असु शकतो.

यासाठी मला आजकाल मायबोली आवडते. फेसबुक/व्हाट्सएपच्या ग्रुप्सवर (किमान मी जे पाहिलेत) तिथे एककल्ली विचारांचे पब्लिक सर्वाधिक असते. असे काही वेगळे मत कॅजूअली जरी तिथे लिहिले तर बापरे बाप. तो चोर सोडून आता आपल्यावरच पोलीस केस करतील का काय असे वाटू लागते Lol

Pages