|जीवामृत|

Submitted by अक्षता08 on 8 May, 2022 - 01:16

झाडांची जास्त चांगली वाढ होण्यासाठी आपण खत वापरतो. मी अगदी सर्व प्रकारची खतं वापरून बघितली आहेत. (Liquid fertilizers to solid fertilizers, bioenzymes, etc) परंतु, जो result झाडांना जीवामृत देऊन मिळाला आहे त्याची तुलना बाकी कशाची होऊ शकत नाही. जीवामृत मुख्यत्वे गोमातेच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून बनवल जातं. बऱ्याच लेखांमध्ये आणि व्हिडीओज मध्ये मी याबद्दल वाचलं आणि ऐकलं होतं. त्यामुळे, एकदा प्रयत्न करून बघाव असं ठरवलं. पण देशी गायीच ताजं शेण मिळणं हे खूप महत्प्रयासाने शक्य झालं.( गोमूत्र शीळ वापरु शकतो मात्र शेण ताजच हव). जीवामृत बनवण्याची पद्धत आणि त्याचे मोजमाप हे तंतोतंत पाळले गेले पाहिजे (तो एक प्रकारचा संस्कारच म्हणावा लागेल) महिन्यातून दोनदा जीवामृत देणे कुंड्यांमधील झाडांसाठी पूरक आहे.

जीवामृत is game changer for me. जीवामृताशिवाय झाडं वाढवण्याचा विचारही करू शकत नाही. जीवामृताचा उपयोग फक्त खत म्हणून नाहीतर कीटकनाशक म्हणूनही होतो. गोमूत्र पाण्यात मिसळून त्याचा फवारा झाडांवर मारला तर झाडांना लागणाऱ्या रोगांच प्रमाण कमी होतं. जीवामृत नियमितपणे वापरल्यास फुले येण्यामध्ये वाढ होते, झाडांची वाढ झपाट्याने होते आणि झाडांची रोगांपासून लढण्याची ताकदही वाढते.
आपल्याकडे किती झाड आहेत याचा अंदाज घेऊन जीवामृत बनवाव लागत. जीवामृतात मुख्यत्वे ताजे शेण, गोमूत्र, माती, गुळ, चण्याच्या डाळीचे पीठ हे पदार्थ जातात. त्यांच्या प्रमाणाबद्दलची माहिती सहज कोणत्याही जाणकारांच्या लेखात आणि व्हिडिओमध्ये मिळेल.
जर जीवामृत बनवण्याचा वेळ नसेल तर घनजीवामृत ही बनवू शकतो. ज्याचा वापरण्याचा कालावधी सहा महिने आहे. जीवामृत शक्यतो दहा दिवसांमध्ये वापरून संपवावे लागते.

ज्यांच्याकडे झाडं आहेत कींवा झाड लावायची वाढवायची आवड आहे त्यांनी किमान एकदा तरी जीवामृत वापरून बघावे.

नमन त्या गोमातेला जिच्यामुळे मी झाडांना जीवामृत देऊ शकते !!!1651985572387285-3.jpg1651985576614955-2.jpg1651985580934634-1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान आहे
तुम्ही जीवामृत कसे तयार केले त्याची माहिती दिलीत तर चांगले . जीवामृत बाहेर बाजारात विकत मिळते का ?

छान माहिती
फुलझाडांना उन्हाळ्यात जीवामृत द्यावे का?

मी जीवामृत असे करते -

२५० लिटरच्या ड्रुममध्ये २००-२२५ लिटर पाणी घेते अन्दाजे. हे नदीचे पाणी आहे.
त्यात एक बुट्टी ताजे गोमय म्हणजे साधारण दहा किलो. मला गिर गाईचे शेण मिळते, कुठलीही देशी गाय चालते. उष्णता हवी असेल तर अजुन एक बुट्टी. आंबोलीत डिसेम्बरात जमीन थंडगार पडलेली असते तेव्हा दोन बुट्ट्या.
१० लिटर गोमुत्र. मी जसे मिळते तसे वापरते. जुने चालते. शेण व गोमुत्राचे सोर्स वेगवेगळे आहेत.
१ किलो बेसन. एक ते दिड किलो गुळ. म्हशींसाठी खाद्य म्हणुन स्वस्त काळा गुळ मिळतो. (३५त्ते ४० रु किलो) तो वापरते.
पसाभर उम्बरा खालची माती. पावसाळ्यात या मातीत गान्डुळे असतात, ती काढुन टाकावी लागतात.

हे सगळे एकत्र करुन ढवळुन ठेवते. रोज सकाळसन्ध्याकाळ ढवळते. तिन ते पाच दिवसात वर साय न धरता पिवळसर द्रावण झाले कि समजावे जीवामृत तयार. शेताला पाणी देताना पान्यात तोटी सोडुन देते. पाणी द्यायचे नसले तर फवारणी करवते नाहीतर पिकाच्या मुळाशी ओतवते म्हणजे आळवणी.

कधीकधी १५ दिवस तसेच तयार पडुन राहते कारण गडी दुसरी कामे करत असतो. तरी मी वापरते. अजुन जास्त दिवस पडुन राहिले तर मात्र टाकावे लागते. काळे होते व वास येतो.

गेल्या वर्षी जीवामृतावर उस अजिबात होणार नाही असे लोक मला सांगायचे. यन्दा अजुन कुठले खत वापरता म्हणुन विचारतात.

जाई - हल्ली खुप लोक जीवामृत विकतात. नेटवर शोधलेस किन्वा बागकामाचे फेसबुक ग्रुप बघितलेस तरी मिळेल.

धनवंती - हो लिहायचे आहे. अजुन अनुभव खुप त्रोटक आहे, तरी. लिहायला घेतले आहे.

@साधना
फारच उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद !! Happy Happy

मी ऑनलाइन जीवामृत मागवले होते. महाग मिळत आणि त्याचा तितकासा फरक नाही दिसला मला.

छान लेख.
साधना, प्रमाणासहित कृती ही छान दिलीय.

बापरे साधना, एवढ्या मोठ्या प्रमाणात करतेस जीवामृत, अर्थात शेती करणं हेच खुप मेहेनतीचं काम आहे. प्रत्येक स्टेप महत्वाची आणि अंगमेहनतीची आहे. तुला सलाम. तुझे अनुभव वाचायला खुपच आवडतील.
अक्षता08 चे लेखही छान माहिती पूर्ण असतात.