फोटोग्राफी साठी चांगला मोबाईल

Submitted by Rama 85 on 28 April, 2022 - 01:00

मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. मुख्य उद्देश प्रवासादरम्यान किंवा फिरायला गेल्यावर सहज आणि सुलभ व चांगल्या दर्जाची फोटोग्राफी करता येणे हा आहे. दर वेळेस कॅमेरा सोबत नेणे शक्य नसते. अशा वेळेस एखादे सुंदर दृश्य टिपता येत नाही.

कृपया 30 हजार पर्यंत बजेट असणारा फोटोग्राफी साठी उपयुक्त असा मोबाईल सुचवा.

Thanks in Advance !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

30 हजार पर्यंत बजेट असणारा फोटोग्राफी साठी उपयुक्त असा मोबाईल सुचवा.

या वाक्याने
काम सोपं केलंत. दुकानदारही फोन घ्यायला येणाऱ्यास हाच प्रश्न विचारतो. "बजेट किती."

१)क्याम्रा मोड्युल महत्त्वाचे.

चांगला क्याम्रावाला फोन म्हणजे फोनमध्ये असलेलं क्याम्रा मोड्युल तीच फोनवाली कंपनी बनवतेच असं नसतं ती दुसऱ्या क्याम्रा बनवणाऱ्या कंपनीचे टाकते. इथे सामसंग दोन्हीही करते. म्हणजे फोन आणि क्याम्रा मोड्युल त्यांचेच.

२) फोनचा सिपियु ऊर्फ प्रसेसर

क्याम्राच्या सेन्सरवर उमटलेलं चित्र जलद रितीने तिकडून काढून मेमरीवर नेऊन पुढच्या फोटोसाठी सेन्सर रिकामा/कोरा करून ठेवणे यासाठी प्रसेसर फास्ट असावा लागतो.

३) bloatware
या वरच्या दोन्ही गोष्टी महाग असल्याने क्याम्रा फोनची किंमत वाढते.
पण ती अप्रत्यक्षपणे कमी करण्यासाठी सामसंग, शाओमिवगैरे कंपन्या जाहिरातींचे लोढणे घुसडतात. तुलना करताना याचाही विचार करा. हे gadget 360 ndtv या साईटच्या रिव्यूत कळते. 'bloatware' म्हणजेच नकोसं ओझं. ते उतरवता येत नाही.

हे मी थोडक्यात सागितले. वरच्या क्रमांक (१),(२) मध्येही बरेच महत्त्वाचे उपमुद्दे आहेत.

तीस हजारांचं बजेट असेल तर वापरायला सोपे आणि हलके कॅमेरेही असतात. उदा. Canon powershot https://www.flipkart.com/canon-powershot-sx430/p/itmeqyxgbgca89nm?ef_id=...

हा छोटा, वापरायला सोपा आणि भरपूर झूम असणारा कॅमेरा आहे. फोटो स्मार्टफोनमधे सहज ट्रान्सफर करता येतात.

गारंबी, SRD, वावे धन्यवाद!

SRD, तुम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. मला तांत्रिक अंग फारसे समजत नाही. फोटो क्लरिटी , झूम फीचर्स, बॅकग्राऊंड ब्लारिंग, फोकस आणि फ्रेम फीचर्स चांगले हवेत अशी अपेक्षा आहे.

@वावे, कॅमेरा आहे . मोबाईल अशासाठी हवाय की अनपेक्षित अवचित, अनाहूत असे काही समोर दिसले तर ते टिपता यावे.

हा पर्याय आवडला. ओप्टिकल टेली झूम फोनमध्ये महागात आहे.
हा शुक्र, गुरु,चंद्रकोरचा आज पहाटेचा फोटो moto g40 fusionचा. हाच compact क्याम्राने चांगला आला असता.

Vivo x 60. पाहू शकता.
35हजार. यात Zeiss कंपनीचे camera module, Qualcomm 870 processor आहे.