Indi - पॉप JukeBox

Submitted by रानभुली on 1 April, 2022 - 05:13

नवव्दच्या दशकापासून (आधीचे असतील तर ते ही) ते आतापर्यंत गाजलेल्या इंडी पॉप गाण्यांची (शक्यतो नॉन फिल्मी) यादी बनवायची आहे. त्यातल्या त्यात सॉफ्ट गाणी प्राधान्याने सुचवावीत. (नियम नाही).

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिया बसंती रे.... खूप आवडतं गाणं

देखा है तेरी आँखों को

परदे में रहने दो -- आशा भोसले --- याच्या व्हिडीओमध्ये पहिल्यांदा रपन्झलची गोष्ट पाहिली.

अजून बरीच लिस्ट आहे. नंतर लिहिते.

आर्यन्सचं ये हवा कहती है क्या, अजूनच छोट्या शाहीदचं आंखों में तेरा ही चेहरा ,
डुबा डुबा रहता हूं आंखों में तेरी,,, हे माझं फार आवडतं, evergreen आहे.
आशा भोसलेचं जानम समझा करो.

दलेर मेहेंदी

बाबा सहगल ( मंजुळा )

सोनु निगम ( इस कदर प्यार है , दिवाना )

परी हूं मै - सुनिता राव

सुचित्रा कृष्णमुर्ती

आवडती गाणी
-अहिस्ता अहिस्ता किजीए बाते
-चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसा बाल
एक तुही धनवान है गोरी बाकी सब कंगाल
#पंकज उधास

-गोरी तेरी आखे कहे के तु रातभर सोयी नही.

-चांदनी राते सब जग सोये हम जागे तारो से करे बाते.

आठवतील तशी लिहिन.

ले जा ले जा रे
श्रेया गोषाल आणि उस्ताद सुलतान खान
गोरी तेरी आखे कहे के तु रातभर सोयी नही.>>>हे आवडतं आहे.
छान धागा.

कटे नाही रात मोरी पिया तोरे कारन कारन (उस्ताद सुलतान खान)
आफरीन आफरीन (नुसरत फतेह अली खान)
कभी तो नजर मिलाओ कभी तो करिब आओ (अदनान सामी, आशा भोसले)
पुरानी जीन्स और गिटार
मैने पायल है छलकायी (फाल्गुनी पाठक)
क्या सुरत है (बॉम्बे व्हायकिंग्ज)

टिव्ही वर इंडी पॉप नावाचा गाण्याचा प्रकार असायचा . ती अल्बम मधली गाणी पाहताना मजा यायची . त्यातले काही कलाकार पुढे नायक / नायिका / दिग्दर्शक / गायक गायिका झाले. शाहिद कपूर , हृषिता भट ही वानगीदाखल उदाहरण

1) डूबा डूबा रहेता हु आखोमै तेरी - मोहित चौहान ( सिल्क बैंड)

2) देखा है तेरी आखो को
चाहा है तेरी अदाओं को (आर्यन ग्रुप)

3) आखोमै तेरा ही चेहरा धडकन मै तेरिही आखे कहती है दीवाना ( शाहिद / हृषिता :- आर्यन ग्रुप )

4) छुई मुईसी तुम लगती हो ( ह्यातल्या त्या हातावर बांध्यायाच्या छोट्या टेडी बेअर ने धमाल उड्वलेली शाळेत )

5) कभी आना तू मेरी गली ( पलाश सेन , विद्या बालन )

6) मैंने पायल है झन कायी अब तो आजा तू हरजाई ( फाल्गुनी पाठक :- हिची अशी बरीचशी
गाणी आहेत )

7) ऐका दाजीबा :- अवधूत गुप्ते / वैशाली सामंत

8) अब के सावन ऐसे बरसे ( शुभा मुदगल)

9) परी हु मै , मुझे न छूना ( सुनीता राव)

10 ) पिया बसंती रे काहे सताए आजा ( चित्रा , उस्ताद सुलतान खा )

11) तन्हा दिल तन्हा सफर दुन्ढे तुझे फिर क्यों नजर ( शान )

12) सयोनी ( पाकिस्तानी बैंड )

13) चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल ( पंकज उधास - दचकू नका . गाण्याच चित्रीकरण खूप छान होत )

14) डोले डोले - सुचित्रा कृष्णमूर्ती

15) ओ सनम - लकी अली

16) मेड इन इंडिया - अलीशा चिनॉय
( यात आमचा लाडका मिसो ही होता )

17) दीवाना / बिजुरिया - सोनू निगम

18 ) जानम समझा करो - आशा भोसले

19) गुल नाल इश्क - बाली ब्रम्हभट

20) पिया रे पिया रे - नुसरत फतेह अली खा

21) सा नी ध प - कलोनियल कझन्स

22) कभी तो नजर मिलावो - अदनान सामी

23) आखरी अलविदा - स्ट्रिंग्ज

24) तेरी दीवानी - कैलाश खेर

25) दीवाने तो दीवाने है - श्वेता शेट्टी

26) निगोड़ी कैसी जवानी / हुलिया मै उड़े रे गुलाल - इला अरुण

27) चंदु के चाचाने चंदु की चाची को - channel v आस्मा ग्रुप

28) दुनिया / हुल्ल्ले हुलारे :- रागेश्वरी

पॅाप आणि इंडि कसं कोण ठरवतात?
>>>>
नव्वदीच्या दशकातील नॉन फिल्मी अल्बम...
आम्ही अजूनही कधीतरी रात्री नॉस्टेल्जिक व्हायला ऐकतो..
फाल्गुनी पाठकचीच सात आठ लावली जातात.. त्यातले माझे आवडते मैने पायल है छनकाई... बघायलाही आजही तितकेच गोड वाटते

तुम हो मेरी मै तुम्हारा. छोटासा संसार हमारा, आगे जाने राम क्या होगा...
हे गाणे सुद्धा विशेष आवडीचे. बाकं बडवून गायचो Happy

पिया बसंती रे क्लासिकल.. ऑटाफे.. जेव्हा मोबाईलमध्ये जेमतेम पंधरा गाणी राहतील ईतकी मेमरी असायची तेव्हाही हे त्यात पडीक असायचे.

तनहा दिल सुद्धा बेक्कार आवडायचे.. शान सुद्धा त्याच्यामुळेच आवडायची.. त्याचे लवॉलॉजी मे पास बाकी सब मे फेल किंवा भूल जा वगैरे ठिकठाक गाणीही तनहा दिल गाणाऱ्या शानची गाणी आहेत म्हणून ऐकली जायची. पुढे त्याचे चांद सिफारीश जो करता हमारी हे गाणे मात्र खरोखर आवडलेले.. त्यातला कैलाश खेरचा तडकाही आवडायचा... कैलाश खैर वरून आठवले, त्याचे मर गयी मै मिट गई मै आरी ओरी दिवानी.. तेरी दिवानी.. हे ऐकायलाही मजा यायची आणि मोठ्या आवाजात घसा फाडून गायलाही..

पुढे आतिफ अस्लमचा दूरी अल्बम आला.. जल.. आदत .. आणि गाण्यांची टेस्टच बदलली.. कॉलेजमध्येही पदार्पण केलेले तेव्हा.. कातिल वाटायची ती गाणी

मस्त धागा रानभुली...!
जाई, छान लिस्ट दिली आहेस गाण्यांची ... !
' दिवाना' अल्बमची सगळीचं गाणी आवडतात.

अश्या गाण्यांची क्रेज नव्वदीच्या दशकात ईतकी होती की एक रहीम ईर एक रहीम बीर एक रहीम फत्ते वगैरे करत अमिताभनेही त्यात उडी मारलेली.
अमिताभच्या पिक्चरमध्ये दलेर मेहंदी गाणे गायचा त्याची मोठी हवा व्हायची.
दलेर मेहंदी वरून आठवले.. मला त्याची वा कोणाचीच पंजाबी गाणी कधीच आवडली नाहीत.. स्पेशली नाचाची.. पण काला कव्वावर नाचायला मजा यायची. मुंगडा आणि झिंगाटच्या मधल्या काळात ते फार गाजलेले.

माइरी - पलाश सेन
गुड नाल इश्क मिठा - मलायका आहे वाटतं यात
मेरी निंद उड गयी है - band of boys ( यात अनुपमा वाला वनराज आहे)
दूर से कोई आये - स्ट्रिंग्ज
लिफ्ट करा दे - अदनान सामी
ये जमी रुक जाये, भिगी भिगी रातों में - अदनान सामी

कोलोनिअल कजिन्स... हरीहरन.. सानिधापा.. काय रेंज होती त्या काळी गाण्यांची.. आज विषय निघालाय तर पुन्हा मेहफिल जमवायला हवी

गुड नाल इश्क मिठा - मलायका आहे वाटतं यात
>>>
हो आणि त्या हिरोचे नाव बहुधा जस अरोरा.. जे काही असेल.. फार छान वाटायची जोडी.. गाणेही मस्तच.. एक छोटीशी स्टोरीच असायची प्रत्येक गाण्यात ते भारी वाटायचे

गुड नाल इश्क मिठा - मलायका आहे वाटतं यात
>>>
हो आणि त्या हिरोचे नाव बहुधा जस अरोरा.. जे काही असेल.. फार छान वाटायची जोडी.. गाणेही मस्तच.. एक छोटीशी स्टोरीच असायची प्रत्येक गाण्यात ते भारी वाटायचे

गुड नाल इश्क मिठा - मलायका आहे वाटतं यात
>>>
हो आणि त्या हिरोचे नाव बहुधा जस अरोरा.. जे काही असेल.. फार छान वाटायची जोडी.. गाणेही मस्तच.. एक छोटीशी स्टोरीच असायची प्रत्येक गाण्यात ते भारी वाटायचे

गुड नाल इश्क मिठा - मलायका आहे वाटतं यात
>>>
हो आणि त्या हिरोचे नाव बहुधा जस अरोरा.. जे काही असेल.. फार छान वाटायची जोडी.. गाणेही मस्तच.. एक छोटीशी स्टोरीच असायची प्रत्येक गाण्यात ते भारी वाटायचे

फिर हाथ मे शराब है सच बोलता हू मै - पंकज उदास
यारो सब दुआ करो मिलके फरीयाद करो
वो कौन थी नजर मिलाके जान ले गई जो

वरची बहुतांशी सगळीच गाणी आवडतात
पिया बसंती आणि डुबा डुबा सगळ्यात आवडती अजूनही.

दोन गाणी वरच्या लिस्ट मध्ये आली नाहीत म्हणून लिहितेय

ओ सनम मेरे प्यार मे तेरे हे आठवत नसणार त्यामुळे लिंक दिली

मायरी

वाह ! मस्त मस्त गाणी दिली आहेत सर्वांनी.
पंकज उधास = गझल (दारूच्या). गझल / भजन / कव्वाली म्हणजे पॉप नाही. (रीमिक्स असेल तर शक्य आहे).

वरच्या लिस्टमधे पंजाबीला टक्कर देणार्‍या आपल्या मराठमोठ्या अवधूत गुप्ते / वैशाली सामंतचे अल्बमज नाहीत का ?
आणि रेमो ?
शेरॉन प्रभाकर, आलिशा चिनॉय ही मंडळी आद्य आहेत.

रेमोचं एक गाणं बीजे मेडीकलच्या ग्राउंडवर त्याचा लाईव्ह झाला होता तेव्हां ऐकलेलं आणि आवडलेलं.
ओशनक्वीन - सापडत नाही कुठे. बाँबे सिटी अल्बम मधे होतं म्हणतात.

मला फाल्गुनी पाठकची गाणी फार बोअर होतात अजूनही.

हि मराठी काही.. इन्डी पॉप कैटेगरीत येतात का माहिती नाही.
-गालावर खळी डोळ्यात धुंदी, ऑल्वेज फेवरीट

-दूरच्या रानात केळीच्या बनात (सिनेमातील आहे का माहीत नाही)

-सरीवर सरी
-कसे सरतील सये
-तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस हि

Pages