होळी रे होळी, पुरणाची पोळी!

Submitted by देवीका on 14 March, 2022 - 01:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

पुरणपोळीची कृती काही नवीन नाही. पण मी इथे पुर्णपणे गव्हाचे पीठ वापरून केली आहे.
मी आटॉलाईझ पद्धत वापरली आहे, ज्यामध्ये कणीक पाण्यात भिजत ठेवतात.

क्रमवार पाककृती: 

मी इथे विडिओ देत आहे.
https://youtu.be/JJu4qudgzoM

विडिओ माझाच आहे.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

कणीक तिंबण्यात कसब आहे , बस्स. Happy

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..छान... मस्त बनवली पोळी. आमच्याकडे चपाती अन पुरणपोळी गव्हाच्या पिठाचीच करतात त्यामुळे मला इतर कोणती पिठं वापरून बनवत असतील तर त्याबद्दल उत्सुकता आहे.

देविका छान आहे क्रुती आणी फायनल प्रोड्क्ट पोळ्याचा तलमपणा अगदी व्हीडियोतही जाणवतोय,मागे मला वाटत सईने पण साध्या पोळ्यासाठी ही ट्रिक सान्गितली होती
यावेळेस अशा करुन बघेल, माझी आई कणीक सपिटाच्या चाळणीने चाळुन मग सकाळीच भिजवते तिच्यामते किमान २-३ तास पोळिची कणीक भिजायलाच हवी.

छान आहे व्हिडियो.
व्ही बी यांची अशी रवा मैद्याच्या पारीच्या पुरणपोळीची रेसिपी आहे.
त्यावरूनच सईंनी चपात्यांसाठी प्रयोग करून पाहिले.

सर्वांना मनापासून धन्यवाद. पाकृ नवीन असे काहीच नाही. पण माझी आई , रूमाली रोटी बनवायला शिकली बर्‍याच वर्षापुर्वी आणि त्यानंतर मांडे तिच्या मैत्रीणीकडे. त्या दोन्ही कृतीतून तिने मग अश्या रीतीने पुरणपोळी बनवायला लागली. तो वर ह्याला ऑटोलाईझ म्हणतात हे माहित न्हवते. मग मी ब्रेड करायला शिकले (साअर्डो) त्यात ऑटोलाईझ काय असते ते कळले.
अशी बर्‍याच वेळ कणीक भिजत ठेवल्याने, ब्रेड हलका होतो. हे माझ्या बेकींग क्लास मध्ये शिकले. मग हा प्रयत्न.

छान आहे व्हिडीओ. पोळ्या पण मस्त मऊसूत दिसताहेत. हे टेक्निक वापरले नव्हते कधी. नेक्स्ट टाइम वापरेन.

धन्यवाद सर्वांना परत. ह्याच पीठाचे फुलके किंवा रूमाली रोटी मस्त होते किंवा चार पदरी पोळी किंवा लेअर पराठा सुद्धा छान होतो.

मेधावी, मांडे सुद्धा ह्याच पीठाचे करता येतील. माझ्याकडे तो खास तवा किंवा खापर नाहीये. आणि ते फक्त आईलाच छान जमते. अईचा तवा फोडला का फुटला. मी शिकाउ आहे मांडे करण्यात आणि आई आता गॅस जवळ विशेष काही करत नाही, दमते ती. त्यामुळे मीच प्रयत्न करेन जेव्हा खापर मिळेल तेव्हा व टाकेन विडिओ नक्कीच.

देविका छान झालाय व्हिडिओ. तुझे सगळे पदार्थ छानच होतात. मी कधी ह्या पद्धतीने कणिक भिजवले नाहीये. मागे सईच्या धाग्यावर पहिल्यांदा वाचलेला हा शब्द ऑटोलाईझ.

देवकी, छान विडीओ. आमच्याकडे नेहमी तेलपोळ्या करतात, यावर्षी तुमच्या पाकृनुसार पुरणपोळ्या केल्या. मस्त झाल्या. धन्यवाद.
यातल्याच उरलेल्या कणकेचे लच्छा पराठे केले तेही छान झाले.

देविका, तुमच्या क्रुतीने आज कणीक भिजवली पुरण शिजतय तोवर चान्गली १ तास पाण्यात होती नतर मळुन घेतली ,छान ताणली जात होती कणीक आणि पोळ्याही सुरेख झाल्या मुख्य म्हणजे जराही फुटल्या नाही, पुरण मी अर्धी साखर -अर्धा गुळ अस घेते.

ह्या कृतीने कणीक भिजवून पुरणपोळ्या केल्या. मस्त मऊसुत झाल्या एकदम. इथे व्हिडीयो दिल्याबद्दल धन्यवाद! Happy

सगळ्यांना धन्यवाद !!
शक्य असल्यास, तुम्ही केलेल्या पुरण्पोळीचा इथे फोटो टाकला असता तर आवडेल पहायला.

बघितला व्हिडीओ . सुटसुटीत शब्दात सांगितल्याने मस्त झालाय.
नवशिक्याना हा व्हिडिओ बघून पुपो करायचा आत्मविश्वास नक्कीच येईल.
ती ऑटोलाईज पद्धत रोजच्या पोळ्यासाठी करून बघितली पाहिजे

प्राजक्ता, सुंदर ताट आणि पोळी सुद्धा. बरेच प्रकार केलेत. छान. साखर घालून कधीच केली नाही वा खायला मिळालेली नाही. करून पहायला हवी.
थँक्स

Pages