भारत का दिल देखो : चविष्ट शिंगाडा फ्राईज (पाककृती )

Submitted by मनिम्याऊ on 3 October, 2021 - 10:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शिंगाडे (उकडून) १०-१२
IMG_20211003_164218.JPG

हिरव्या मिरच्या - २ (बारीक चिरून)
जीरे - १ चमचा
तूप - १ चमचा
IMG_20211003_164151.JPG

क्रमवार पाककृती: 

'भारत का दिल देखो' या माझ्या मध्यभारतीय लोकजीवनावर आधारित असलेल्या मालिकेत एक झटपट बनणारा छत्तीसगढी पदार्थ. तलावांचा प्रदेश म्हणून ओळख असलेलया भागात 'शिंगाडे' हे सहजासहजी उपलब्ध असतात. ही एक पाणवनस्पती आहे. पाने पाण्याच्या पृष्ठभागावर गोलाकारात पसरतात.
Shingada plant.jpg
( स्रोत : इंटरनेट )
तर खाली मुळाशी हे टोकदार शिंगे असलेले फळ धरते. (शिंगे असतात म्हणून नाव शिंगाडे)

Shingada plant2.jpg
( स्रोत : इंटरनेट )

तर पाककृती एकदम सोपी आहे.

उकडलेले शिंगाडे सोलून घ्यावेत
IMG_20211003_164138.JPG
त्यांचे पातळ काप करून घ्यावेत.
IMG_20211003_164036.JPG
पॅन मध्ये तूप गरम करून जिरे घालावे.
जिरे तडतडले की बारीक चिरलेलया हिरव्या मिरच्या घालाव्या
शिंगाड्याचे काप घालावेत आणि खरपूस होईपर्यंत परतावेत.
IMG_20211003_164009.JPG

मधल्या वेळेत खाण्यासाठी साधी - सोपी डिश आहे.

वाढणी/प्रमाण: 
कराल तितके
अधिक टिपा: 

आपण उपासाला जे शिंगाड्याचं पीठ वापरतो त्याच शिंगाडा भाजीचे हे फ्राईज.
(प्रादेशिक मधे 'छत्तीसगढी' ऑप्शन नसल्यामुळे वैदर्भीय लिहितेय. पण हि मूळात छत्तीसगढची डिश आहे. )

माहितीचा स्रोत: 
--
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आधी हिरवे असतात
शिजले की काळे होतात

होय आत्ता कळले वॉटर चेस्टनट जे मिळतात इथे चायनिज पदार्थात सढळ हस्ताने वापरले जातात ते म्हणजेच शिंगाडे. फोटोमुळे कळले.

छानच.

ओह नविनच रेसिपी! भारतात काळ्या शिंगाड्यांच्या गाड्या कितीतरी दिसायच्या पण कधीही खाऊन पाहीले नाहीत.
यांची चव कशासारखी लागत असेल अंदाज येत नाही. रताळ्याटाईप लागतात का?

मस्त रेसिपी. शिंगाड्याच्या झाडाच्या फोटोंबद्दल विशेष आभार.

ते गाडीवरचे काळे शिंगाडे लहानपणापासून खूप खाल्ले आहेत. खास अशी काही चव सांगता येणार नाही. ब्लँडच असतात पण मस्त लागतात. हिरवे कच्चे पण खाल्ले आहेत.

यांना शिंगाडे का म्हणतात हे आज कळलं! >>> +१

हिंदीत पानीफल म्हणतात. >>> पानीफल नाव मस्त आहे. हिंदीत सिंघाडे पण म्हणतात.

वॉटर चेस्टनट = शिंगाडे बरोबर. पण समहाऊ चायनिज रेसिपीमधले जास्त क्रंची लागतात.

लहानपणी आम्ही यांना लहान कोळसाच समजायचो. भय्याच्या हातगाडीवर चिंचा, बोरं, कालाखट्टा सोबत हेही असायचे. उकडून तिखटमीठा बरोबर सुद्धा चवदार लागतात. वरील पाकृ सुद्धा फारच सोपी आहे. छायाचित्रांसाठी अनेक धन्यवाद.

आमची आजी एक भुक्त होती. ( दुपारी एकदाच जेवायचं आणि रात्री उपासाला चालणार काही तरी म्हणजे साबुदाण्याचे खिमट , खीर, एखाद केळं किंवा कॉफी एवढंच घेत असे. ) ते ही फार नाही अगदी लिमिटेडच. ह्यात शिंगाडे ही असत कधी कधी कारण शिंगाडे चालतात उपासाला. तेव्हा विकत पीठ मिळत नसे. आणि असत तरी विकतच चालणं अशक्य होतं आजीला. उन्हाळ्यात सोललेले शिंगाडे वाण्याच्या दुकानात मिळत असत. ते चार दिवस उन्हात वाळवून खलबत्त्यात थोडे कुटून नंतर जात्यावर दळून त्याच पीठ करत असे आजी. हे पीठ वर्षभर टिकत . रात्री कधीतरी ती शिंगाड्याच्या पिठाची दुधातली किंवा ताकातली लापशी करत असे. आधीच खूप नसे करत ती त्यात आम्ही सगळे इतके मागत असू की तिला द्यावीच लागे थोडी थोडी आम्हाला. त्या लापशीची चव अजून तोंडावर आहे.

शिंगाडे म्हटलं की सैपाकघरातला डीम लाईट , ओट्यावर बसलेली आजी आणि तिच्या भोवती कोंडाळ करून कधी आमच्या बशीत लापशी पडतेय ह्याची वाट बघत बसलेले आम्ही हेच आठवतं.