संगीत - हृदयाला भिडणारं !

Submitted by डी मृणालिनी on 16 July, 2020 - 11:05

संगीतशास्त्र हे मानवनिर्मित आहे पण संगीत हे काही मानवनिर्मित नाही . ते तर निसर्गातच आहे. प्रत्येक जीवांमध्ये भिनलेली एक कला. चिमण्यांचा चिवचिवाट ,पाण्याचं झुळझुळ वाहणं ,ढगांचं खर्जामध्ये गडगडणं हे सगळं संगीतच आहे कि ! 'भीमसेन जोशी बिजलीसारख्या ताना घेतात ' यामध्येसुद्धा तानांना बिजलीचीच तर उपमा दिली आहे ! म्हणजे वीज कडाडते असं म्हणण्यापेक्षा वीज ताना घेते असं म्हणणंच योग्य .. ! ' मला संगीत आवडत नाही ' असं बोलणारा माणूसच संगीतावर नकळतपणे प्रेम करत असतो. माझा दादा संगीत या विषयात औरंगजेब आहे , पण तरीही त्याला गुणगुणत असताना मी अनेकदा पाहते.
हे तर सगळं निसर्गाचं संगीत ! पण शास्त्रोक्त ? ते काही सगळ्यांनाच आवडेल असे नाही. पण मला मात्र शांत मंदिराच्या गाभाऱ्यात बसल्यावर जसं पवित्र वाटतं तसाच अनुभव शास्त्रीय संगीत ऐकताना येतो.
कौशिकी चक्रवर्ती ,किशोरीताई आमोणकर आणि निराली कार्तिक ह्या माझ्या आवडत्या गायिका . तिघींचाही आवाज अत्यंत मधुर आहे आणि तेवढाच धारदारही आहे. तबला वादनात मी झाकीर हुसेन यांची प्रचंड चाहती आहे. अजूनही मला त्यांचं प्रत्यक्ष वादन ऐकण्याची संधी मिळाली नाही ,पण त्यांच्या कितीतरी व्हिडिओंचा माझ्याकडे संग्रह आहे. जो मी अगदी सोन्यासारखा जपते. ते स्वतः तबला वाजवतच नाहीत ,तर केवळ त्यांच्या हाताच्या स्पर्शाने तबला स्वतःच वाजू लागतो. या सर्वाचं गायन -वादन ऐकताना मला कशाचंच भान नसतं . दूध उतू गेलं म्हणून मम्मा माझ्या नावाचा गजर करत असते. काहीतरी विसरले म्हणून दादा माझ्या नावाने आरोळ्या मारत असतो. पण झाकिरजींचा तबला बोलू लागला किंवा किशोरीताईंनी राग आळवायला सुरुवात केली कि बस्स ! माझ्यासाठी जणू स्वर्गानंदच !
किशोरीताई आमोणकरांना भूप राग खूप आवडायचा आणि रसिकांचीही नेहमी हीच फरमाईश असायची. सर्वसामान्यांच्या भाषेत भूप राग त्या मानाने सोपा ! ( कोणतेही कोमल -तीव्र स्वर लावायची भानगड नाही ,म्हणून असेल कदाचित ! ) पण खरं हा राग इतका सोपा असता तर सगळेच किशोरीताईंसारखे नसते का गायले ??! त्यांचा 'भूप ' ऐकताना फारच अद्भुत वाटत हे खरं . पण मला मात्र भूप पेक्षा किशोरीताईंनी गायलेला 'ललित ' ऐकायला प्रचंड आवडतं . ललित रागाबद्दल मला 'अ' का 'ढ' माहित नाही . पण किशोरीताई गाताना तो काळजात भिडतो .
कौशिकी चक्रवर्तींच्या आवाजातला भीमपलास किंवा ठुमरी . अहाहा ! दरबार फेस्टिवलमध्ये त्यांनी गायलेली ' जा जा रे अपने मंदिरवा ' ही बंदिश प्रारंभिकच्या मुलांना शिकवली जाते असं कोणाला सांगूनही पटणार नाही. एवढे प्रचलित आणि सर्वसामान्य राग जेव्हा त्यांच्या गळ्यातून येतात तेव्हा ते मिया कि मल्हार , मुलतानी ,दरबारी कानडा यासारखे भरगच्च असे कोणतेतरी राग वाटतात. मिया कि मल्हार वरून आठवली निराली कार्तिक. तिचा आवाज शब्दांमध्ये कसा वर्णावा तेच कळत नाही. नुकताच तिने गायलेला मिया कि मल्हार एका वेगळ्याच जगात नेऊन सोडतो. या तिन्ही गायिकांचा आवाज ऐकताना माणूस मंत्रमुग्ध होतो . शांत डोळे मिटून ऐकतच रहावंसं वाटतं . अगदी तसाच झाकिरजींचा तबला ! त्यांच्या आणि उस्ताद अल्ला रखाजींच्या अनेक जुगलबंदी झाल्या. पण त्यातलीच एक विशिष्ट जुगलबंदी मला खूप खूप आवडते . पेशकार वाजवण्याची कसलीही औपचारिकता न करता थेट आक्रमण ! लेहऱ्याच्या दुसऱ्या आवर्तनापासून त्यांची बोटं सुसाट धावतात ते थेट शेवटीच विश्रांती घेतात . ते ऐकताना तर अक्षरशः अंगावर काटा येतो. उ. झाकीरजी आणि पात्री सतीश कुमार यांची तबला -मृदूंग जुगलबंदी जवळ -जवळ ५० वेळा तरी पाहिली असेल. पण तरीही पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोहच आवरत नाही . झाकिरजींचा तबला आणि जयंती कुमारेश यांची वीणा . या दोन वाद्यांमधील संवाद तर विलक्षण आहे.
या सर्व गोष्टी अर्थातच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या छटा आहेत . पाश्चात्य शास्त्रीय संगीतही ऐकायला तेवढंच प्रसन्न वाटतं . फ्रॅन्झ शुबर्टच्या रचना ,सोनाटाज ,सिंफनी ,बीथोवनच्या रचना आणि मोझार्टच्या रचना सृजनशीलतेचं कलात्मकतेचं प्रतीक आहे. या सर्व रचना ऐकताना आपणच musical notes बनून वाहतोय कि काय असं वाटतं . जॅझ ऐकताना तर एखाद्या शांत ,पवित्र जागी बसल्याचा भास निर्माण होतो. खरंच ,संगीत किती अद्भुत ,किती अफाट आहे ना ! पण मग एवढं सगळं अद्भुत असतानाही आजची पिढी हनी सिंग आणि बादशाहाचाच मागे वेडी का आहे ???

लेखात सांगितलेल्या सर्व कलाकारांचं नमूद केलेले संगीत ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=QI749_-TjqU -राग ललित ,किशोरीताई आमोणकर
https://www.youtube.com/watch?v=uEqYzdz3Zvg - भीमपलास ,कौशिकी चक्रवर्ती
https://www.youtube.com/watch?v=o6oL9kKftFo - ठुमरी ,कौशिकी चक्रवर्ती
https://www.youtube.com/watch?v=EelXOm_iou0 - मिया कि मल्हार ,निराली कार्तिक
https://www.youtube.com/watch?v=yFcSkWn2oGk -
उ. झाकीर हुसेन आणि उ. अल्ला रखा जुगलबंदी
https://www.youtube.com/watch?v=Lgj_4xyUt2s -
उ. झाकीर हुसेन आणि पात्री सतीश कुमार जुगलबंदी
https://www.youtube.com/watch?v=sFLh4uYxbe0
उ. झाकीर हुसेन आणि जयंती कुमारेश जुगलबंदी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर पंडीत डी.व्ही. पळुसकरांच "जब जानकी नाथ सहाय करे" हे गाणंं इतकं आवडतंं की या एका गाण्यासाठी ते पुन्हा सुक्ष्मरूपी अवतरले आणि पुन:श्च शरीररूपी गाण्यासठी त्यांनी माझ्या शरीराची मागणी केली तरी सुद्धा मी ते देऊन टाकायला तयार आहे!!
हे गाणं मला डिप्लोमाच्या सेकंड इअर मधे एका वेबसाईटवर सापडलंं होतं. काही राग मी डाऊनलोड करत होतो.
आणि मला या गाण्याची फाईल इथे अपलोड करावीशी वाटते पण लॅपटॉप वरून कोणत्याही प्रकारच्या फाईल्स अपलोड करण महा कढीण, मला कळतच नाहीये अप्लोड कस करतात. इथे कॉमेंट्स मधे... एनिवे तुम्हाला मिळाल तर जरूर ऐका 3:29 मिनीटांच असलेलच पूर्ण गाणंं आहे
धन्यवाद हा धागा तयार केलात.

@मृणालीनी https://www.youtube.com/watch?v=jpD-WR2hc5w
ते तुमच देखिल सेम आहे पण तुमच्या कडच्या लि^क मधे तंबोरा आणि म्युजिक जास्त आहे बाक्ग्राउंड ला
म्हणून मी वर बोललोय की ३:२९ मिनिटांच ऐका Happy
मी अजून काही गाणि टाकेन
इथे तुमच्यासाठी https://www.youtube.com/watch?v=4pWab9pJi8w

"दरबार फेस्टिवलमध्ये " ---> मी गेले सहा - सात महिने तिथले काही व्हिडिओज , कधि त्यांच एम. पी. ३ कन्व्हर्जन करून

https://getvideo.org/en & https://en.savefrom.net/18/ या साइट्स वरून
सतार चे शेशन्स खूप आवडतात मला तिथले आणि कौशिकिंचे पण

https://www.parrikar.org/vpl/?page_id=98/ ----> इथे बरच काही मिळु शकतं मि देखील इकडून बराच साठा डाऊनलोड केलाय
सेफ साईट आहे .ओआरजी खूप जुन्या रेकॉर्डिंग्स आव्हेलेबल आहेत

@प्रगल्भ आपले आभार कसे मानावेत हेच कळत नाही. आपण मला अक्षरशः मौल्यवान खजिना दिलाय. थँक्स

@मृणालिनी आभार नका मानू माझ्या सारख्या युवक अवस्थेतल्या लोकांपर्यंत हे पोहोचण्याची खुप जास्त गरज आहे. आणि आवड उत्प्नन्न करण्यासाठि बालपणात / किशोरवयात हे सगळे कानी पडणे आवश्यक!!
तुम्ही विविध राग शिकत आहातच सो, मी दिलेल्या साइट्स वरून ज्या काही दुर्मिळ गायकांच्या विविध रागातील रेकॉर्डिंग्स असतील तर त्या त्या
रागाच्या बद्दल सांगितीक माहिती अगदि आरोह अवरोह पासून माहिती असलेला स्वतः चा एक ब्लॉग तयार करावा आणि उदाहरण म्हणून या रेकॉर्डिंग्स आहेतच...
माझी कुबुद्धि आणि आळस यामुळे मी संगीत शिकू शकलो नाहि. अध्यात्मिक गुरुंनी आईला सांगितल होतं (मी लहान असताना) की याला गाणं शिकू देत... पण त्या वयात ( ५-६ वर्षे ) मी बुद्धि नासल्यासारखा नाही म्हणालो... पण आता ऐकताना आपण खूप मोठि चूक केलिय हे पदापदाला जाणवतं!! आता गाणं तर शिकता येणार नाहि त्यामुळे तुमच्या ब्लॉग थ्रु मला माहिती तरी मिळेल... आणि जी काही कमी वयाचे मुलं मुली तुमचा ब्लॉग वाचतील , उदाहरण म्हणून दाखवलेल्या रेकॉर्डिंग्स ऐकतील आणि आवड उत्प्नन्न झाली कि योग्य त्या वयात गाण्याच शिक्षण घेतील!! बघा तेवढं जमलं तर... थान्क्स नकोत खरच...

@प्रगल्भ .. खूप छान कल्पना आहे. मी लगेच कामाला लागते. मला अहो -जाहो करू नका. मी १६ वर्षीचीच आहे !! Happy

हा धागा खूप सुंदर निर्माण झाला आहे. मृणालिनी ,त्याबद्दल धन्यवाद.
इथे जे जे काही सांगितलं गेलंय, ते ते मी अमूल्य ठेवा जपून ठेवणार आहे.

तू खूप छान लिहितेस गं, माझ्यापेक्षा लहान आहेस म्हणून ए म्हणतीये हं! राग नसावा, इतक्या लहान वयात खूप ज आहे तुला, लिहीत रहा,प्रगती करत रहा!

@डीमृणालिनी तू कर! करशीलच म्हणून बोललो !!!
एवढ्या लहान वयात किती आणि काय काय करतेस !!

मी तर फक्त निबंधात चारोळ्या लिहायचो १६ व्या वर्षात
आणी एक कविता केली असेल ....अं....अं बहुतेक केतकी माटेगावकर वर केली होती...

तिच्या नावातल्या प्रत्येक अक्षराची ओळ बनवली होती... पण पुढच्या दोन - तीन वर्षात तो कागद हरवला...
तिचा शाळा पिक्चर पण तेव्हाच आला होता. तो बघूनच सॉलिड क्रश होता तिच्यावर हा! हा! हा!
आणि एक 'माझ्याबद्दल' मध्ये स्वतः वर केलेली कविता खूपच गोड आहे Happy बापरे कसली गोड आहे ...

अनेक शुभेच्छा पुढच्या प्रत्येक लेखनासाठी
आणि ब्लॉग ची लिंक द्यायाला प्लिज विसरू नकोस ...

https://www.youtube.com/watch?v=Ovhrc9WAN0k हे घे अजून एक गिफ्ट

तू फिल्म मधल पण गाण पाहू शकतेस पण ... लाइव्ह ची मजा और च असते !!
https://www.youtube.com/watch?v=7Ycykz61mCs

मी रामदासा नंतर कोणत्या दासाचा फॅन झालो असेन तर तो 'येसुदास'
त्याच नाव पण गोड आहे !! एकदम लाघवी

@प्रगल्भ , मी उद्यापासून ब्लॉग चे काम सुरु करेन . पहिले तुम्हालाच पाठवेन झाल्यावर ... Happy

@डी मृणालिनी ठीक आहे शुभेच्छा!! आणि अजुन एक सांगायच राहीलं ... तुझ अजुन शिकायच वय आहे ना सो, तुला कामी येऊ शकेल.
मिळेल तितका कुमार ऐक प्लीज... कुमार गंधर्व हे नुसते गायक म्हणून ऐकण वेगळ आणि त्यांची गाणी ऐकता ऐकता कुमारजींबद्दल जी इनसाईट वाटते त्यातून त्यांना ऐकण वेगळ. पुल भाई सिनेमा मधे म्हणालेलंं दाखवलय ना... (मी आयुष्यात काय केलं की जेणेकरून माझ आयुष्य सार्थकी लागलं) "मी कुमार ऐकला!!"
राहुल देशपांडे सुद्धा कुमारजींच गाण ऐकून ऐकूनच शिकलेत (कुमार ऐकून कान तयार झाले) आणि पुढे त्यांना कुमारजींचे पुत्र मुकुल शिवपुत्र यांच्याकडून गायनाची तालीम मिळाली. हे त्यांनी स्वत: सांगितलय एका कार्यक्रमात आणि कोणत्यातरी मुलाखतीत पण असेल बहुदा!! मला एक लेख लिहायचा आहेच कुमारजींवर इथे माबो वर...
https://www.youtube.com/watch?v=oI1XsKveQYk --> घर ते कॉलेज असा कॉलेजच्या बसने अर्धा तासाचा प्रवास बर्‍याच वेळा झालाय माझा. हे एकच गाणं परत परत ऐकत !!
तहान भागते कुमार ऐकल्यावर!
माहीत नाही कशाची तहान भागते पण भागते!!!