मेजवानी

Submitted by जव्हेरगंज on 1 May, 2020 - 14:23

परवा एक वटवाघूळ खाल्ले. झकास होते. च्याऊंग गुहेच्या आतल्या भागात सापडले. मेजवानीच. पण काहीही म्हणा, डोंगराखालच्या मातीत वळवळणाऱ्या गांडूळाची सर कशालाच नाही. संध्याकाळी अजगराची कातडी सोलताना ठसका लागला. मग दोन उंदीर खाल्ले तेव्हा कुठे आराम पडला. रात्री सुग्रास कुत्रं खाऊन निवांत झोपलो.
सकाळी खोकतंच उठलो. बागेत जाऊन दोन लुसलुशीत सुरवंट गिळले. मग दोन मांजरी पकडून, कापून, फोडी फोडी करून, मिरची आणि कोथिंबीर लावून बरणीत मुरवायला ठेवले. कच्च्या फोडी म्हणजे स्वर्गसुखच.
मग बेडुक फ्राय आणि झुरळांची चटणी असा खमंग नाष्टा केला. पण खोकला थांबेचना. मग माकडाचे सुप पिलो. संध्याकाळी ताप आला आणि डोके दुखायला लागले.
तेव्हा समजले, खाण्यात काहीतरी चुकलंय जरूर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऊंदीर यात घ्यायला नको होते. ते मी ॲक्चुअली खाल्ले आहेत. ईथल्या आणखीही काही लोकांनी खाल्ले असतील. अर्थात मोठाले रानऊंदीर. कचरापट्टीवरच्या घुशी नाही...

वटवाघुळ मि खाल्ले आहे
मला फार काही आवडले नव्हते आणि ते खाऊन पोट ही अपसेट झालेले

ईईईईई
खोकल्यावरचे उपाय म्हणजे रोगापेक्षा ईलाज जालीम असे आहेत !!

ऊंदीर यात घ्यायला नको होते. ते मी ॲक्चुअली खाल्ले आहेत. ईथल्या आणखीही काही लोकांनी खाल्ले असतील. अर्थात मोठाले रानऊंदीर. कचरापट्टीवरच्या घुशी नाही...>>>

याक्स.... मला तर कल्पनाही करवत नाही..

उंदीर चांगलेच असतात, कित्येक जण आवडीने खातात
चिकन पेक्षा पौष्टिक आणि फुकट
झारखंड मध्ये तर त्यांचे नंबर 1 चे खाद्य आहे उंदीर

घुशी च्या बाबतीत अनुमोदन
त्या फक्त आजार पसरवतात
मी दोन वेळा मारली पण टाकून आलो लांबवर

माकडाच्या बाबतीत पुण्यात एक घटना घडली होती
नक्की आठवत नाही पण बहुदा नायजेरियन का अल्जेरियन विद्यार्थी होते त्यांनी कसे आणि काय मॅनेज केले माहिती नाही पण रूम वर माकड शिजवले होते
भयानक वास सुटल्याने बाकी विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला त्यांनी पोलीसात तक्रार केली
मग पोलिसांनी त्यांना अटक केली, वन्यजीव कायद्याखाली बहुदा
त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते हे आमचे नेहमीचे खाद्य आहे

Katha avadali. Lol
Pranee khane bhayankar vatate.

याक्स.... मला तर कल्पनाही करवत नाही..
Submitted by अजय चव्हाण on 2 May, 2020 - 12:10

>>>>
@ ऊंदीर खाणे
मुंबई पुण्यातील टू बीएचके फ्लॅटसमध्ये राहणारया, एसी ऑफिसमध्ये काम करणारया,, मॉलमध्ये फिरायला जाणारया जनतेला हे कल्पनेपलीकडचेच आहे.
खरे तर ग्रामीण भगातील लोकांनाही हे सत्य पचवणे अवघड. त्यासाठी वन्यजीवनाचाच अनुभव हवा...

ऊंदीर यात घ्यायला नको होते. ते मी ॲक्चुअली खाल्ले आहेत. ईथल्या आणखीही काही लोकांनी खाल्ले असतील. अर्थात मोठाले रानऊंदीर. कचरापट्टीवरच्या घुशी नाही...

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2020 - 01:16
>>>
तुम्ही काहीही करू शकतात, किंबहुना प्रत्येक धाग्यावर काहीही विषय असो, त्याच्याशी रिलेटेड तुमच्या आयुष्यात नक्की काहींना काही झालेलं असतं... किती रंगीबेरंगी आयुष्य!!!
यावरून आमच्या एका फेकू मित्राची आठवण आली. त्याला एकदा एका मित्राने असाच सुनावला होता.
'कुणी मासे खाल्ले की ते याने चार दिवसापुर्वीच खाल्लेले असतात. कुणी पिक्चर पाहीला बायको बरोबर तर यानेही चारच दिवसापुर्वी पाहीला असतो. कुणाला काही अडचण आली की नेमकी तिच अडचण याला येवून गेलेली असते. कुणी स्वतःची काही खास सवय सांगीतली की तिच सवय याने दोन महिन्यापुर्वीच सोडलेली असते. काहीही म्हणा त्याने ते चार दिवसापुर्वीच केलेले असते.
जर कुणी मुद्दाम काउडंग फ्राईड इन बटर विथ पिपर अशी रेसिपी आपल्या व्हाट्सएप ग्रुपवर टाकली तर हे बावळं निट न वाचताच रिप्लाय देईल आजकाल काऊडंग फ्रेश मिळत नाही त्यामुळे मी खात नाही. Proud '

तुम्ही काहीही करू शकतात, किंबहुना प्रत्येक धाग्यावर काहीही विषय असो, त्याच्याशी रिलेटेड तुमच्या आयुष्यात नक्की काहींना काही झालेलं असतं... किती रंगीबेरंगी आयुष्य!!!

>>>>

त्या दिवशी माझ्यावर आरोप केलात की मी ईतरांच्या धाग्यावर लिहीत नाही Happy

आज म्हणत आहात प्रत्येक धाग्यावर लिहितो Happy

तुम्ही माझा पार शाहरूख करून टाकला आहात Happy

असो,
आपल्या या विधानाने आपल्याच पहिल्या आरोपाचे खंडन झाले आहे.

आता दुसरयाचे मुंडन मी करतो.

तर होते काय, मी लिहितो म्हणून ते दिसण्यात येते आणि काऊण्ट होते.

आता हि हरणे बघा,

मायबोलीवर कित्येक जण प्रवासवर्णन लिहीतात. मला फिरायची आवड नाही. मी सुद्धा ईथे गेलो म्हणून प्रतिसाद देत त्यात ऊतरत नाही.

हेच ट्रेकिंगच्या धाग्यालाही लागू. मी आयुष्यात कधीच ट्रेकिंगला गेलो नाही. ईतकेच नाही तर मला साधी सायकलही चालवता येत नाही. त्यामुळे ईथे एक सायकलचा धागा आहे त्यापासूनही मी दूर राहतो.

चित्रपट आणि राजकारण हे भारतीयांचे जीव की प्राण.
पण मी गेल्या सहा वर्षात मोजून बारा चित्रपट बघितले आहेत. या २०-२० मध्ये सुरुवात केलीय.
राजकारणात तर पडतच नाही. कोणाचाही झेंडा हाती घेत नाचत नाही.

मी वाचनशून्य आहे. त्यामुळे वाचू आनंदे ग्रूपवर जातच नाही.

हेच संगीत गझल गायन वगैरे ग्रूप आहेत माबोवर त्यालाही लागू

लोकं ईथे निसर्गावर चर्चा करतात, वैद्यकीय माहितीची देवाणघेवाण करतात, स्वयंपाकात काय चुकले याची चर्चा करतात, कित्येक जण आपली कला सादर करतात... मी कश्यातच कुठेच नसतो.

मी उपग्रह वाहिनी मालिका बघत नाही ना त्या चर्चेत असतो. ना वेब सिरीज बघतो. ईंग्लिश भाषेतले काही बघणे तर शून्यच आहे माझे.

हि पोस्ट लिहीत बसलो तर मारूतीची शेपटी होईल तिची...

आणि तुम्ही म्हणता माझे आयुष्य अतरंगी सतरंगी आहे??

का माझ्या सरळसोट आयुष्याची टिण्गल ऊडवत आहात..

काय गुन्हा आहे माझा ??

कधीतरी एखाद दुसरा ऊंदीर खाल्ला ईतकाच !!!

मिपावर वाचली.. भन्नाट ewww आहे. पण चिनी लोकं काय काय खातात ते ऐकून आहेच. असं म्हणतात की तिथे गरिबीच इतकी आहे की लोकांना मिळेल ते खाण्याशिवाय पर्याय नसतो. खरं खोटं देव जाणे.

मी बेडूक खाल्ला आहे. पण नंतर खाऊन उलटी केली... त्यामुळे काउंट होणार नाही बहुतेक...
>>>

उलटीतला बेडूक पुन्हा जोडला तर जेवढा आत गेला तेवढाच बाहेर आला याची शक्यता कमी असते.
काऊंट करायला हरकत नाही.
कारण मी सुद्धा काही अख्खा ऊंदीर गिळला नव्हता काऊंट करायला. रानससा समजून खाल्ला, आवडला नाही आणि नंतर कळले रानऊंदीर होता.
नंतर जेव्हा रानससा खाल्ला तेव्हा तो मात्र आवडला.