टरबुज ज्यूस

Submitted by BLACKCAT on 12 April, 2020 - 03:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टरबूजे , लिम्बु, संतरे गर
साखर
मीठ
चाट मसाला
आले किसुन
पाणी

क्रमवार पाककृती: 

3 टरबूजे घेतली
वरुन छोटीशी स्लाइस कापून घेतली.
आतील बिया काढून टाकल्या.
चमच्याने सगळा गर काढून घेतला. अर्धा लिम्बु पिळला.
एक संतरेही ढकलुन दिले.
मिक्सरमध्ये गर , साखर , मीठ, आल्याचा किस, अर्धा चमचा चाट मसाला घालून फिरवले, अगदी किंचित पाणी घातले.

टरबूजाच्या वाटीतच ज्यूस ओतुन घेतला.
चियर्स

IMG_20200412_130415.jpg

टरबुज ज्यूस

Screenshot_2020-04-12-13-13-16-454_com.android.chrome.png

वाढणी/प्रमाण: 
2-3
अधिक टिपा: 

आंबयाची फोड़ही खपेल

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! मस्त प्रयोग.

पण आय डाऊट फोटोत मला खरबूज दिसतयं..

तुमच्या इथे ह्या फळाला टरबूज म्हणतात का?
आमच्या इथे टरबूज म्हणजे कलिंगड आणि फोटोत दिसतय ते खरबूज..

चांगलं वाटतंय सरबत. अलीकडे लॉक डाउनात दाराशी भाज्यांचा टेंपो बोलवतात सोसायटीवाले. त्यात कलिंगडापेक्षा टरबुजंच जास्त करून असतात. आता ती घेऊन असा रस करून बघायला पाहिजे.

हे तर खरबूज(muskmelon)आहे. टरबुज/कलिंगड वेगळं आहे. एनीवेज ह्याच्या बिया फेकून न देता साफ करून वाळवून,कुटून खात जावा. चांगल्या पौष्टिक असतात.

छान दिसतंय
मागे ज्या फळाची भाजी केली होती ते टरबुज.
आत्ताच फोटोत दिसतंय ते खरबुज.