Submitted by विद्या जोग on 26 January, 2020 - 19:45
पाळणा गीत
बाळा जो जो जो , कुलभुषणी , चिन्मय मधुरा नंदिनी ,
बाळा जो जो जो ||धृ ||
अमुच्या घरि आली ,इवलि परी , रांगोळ्या ग दारी ,
सजला पाळणा, सोनेरी , अन चांदीची दोरी,
झुंबर वर हलती, जरतारी , मोदे जमली सारी
बाळा जो जो जो - १
शुभदिन आज असे, योजियला, नामकरण करण्याला
वंदुनी चरणाते , प्रार्थुनिया, आशिश कुलदेवीला
पाचारुन ज्येष्ठा, शुभ वेळा, आशीर्वच देण्याला
बाळा जो जो जो - २
रुणुझुणु नादविसी, लडिवाळे, पायी घुंगुर वाळे
सुमधुर तव बोला, परिसुनिया, सार्थक अवघे झाले
अनुदिनि तुजलागी, यश कीर्ती, सौख्य मिळावे बाळे
बाळा जो जो जो - ३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर!! आपल्या बाळास अनेक
सुंदर!! आपल्या बाळास अनेक आशीर्वाद.
किती सुंदर पाळणा आहे हा.
किती सुंदर पाळणा आहे हा.
छान!
छान!
खूप छान लिहिला आहे. मस्तच!
खूप छान लिहिला आहे. मस्तच!
चिन्मय मधुरा नंदिनी - या ओळीत एक मात्रा जास्त वाटते आहे.