औषध म्हणून घ्यावी

Submitted by द्वैत on 25 January, 2020 - 02:14

औषध म्हणून घ्यावी

वाटेल काय कोणा चिंता कशा करावी
केव्हातरी जराशी औषध म्हणून घ्यावी

आम्ही न त्यातले हो आम्हा व्यसन न ह्याचे
सोबत म्हणून केवळ मित्रास साथ द्यावी

जाईल तोल थोडा हलतील पावले ही
होऊन धीट पुन्हा ग्लासामध्ये भरावी

दुःखात साथ देई करते मनास हलके
एकेक वेदना ह्या प्याल्यात विरघळावी

आयुष्य व्यर्थ त्यांचे ज्यांनी ना स्पर्श केला
त्यांना कुठे कुणाची संवेदना कळावी

Group content visibility: 
Public - accessible to all site users