अस्तित्व !!!!! (भाग १ )

Submitted by Sujata Siddha on 9 January, 2020 - 06:08

अस्तित्व !!!!!

"परमेश्वराला मानणारे आणि न मानणारे दोन गट आपण नेहेमीच ऐकत आलोय , मानणाऱ्या लोकांची अर्थातच संख्या जास्त आहे , आणि न मानणाऱ्या लोकांपर्यत मला जायचंच नाहीये , पण जे परमेश्वराचं अस्तित्व मानतात त्यांना तरी तो कितपत समजलाय असा प्रश्न मला पडतो . "
"म्हणजे , ?”
" म्हणजे ऐक ,समजा तुला एखाद्या नदीतून पाणी घेऊन जायच आहे , कसं आणि किती नेशील ?"
"हा काय प्रश्न आहे शुभ्रता ? मला जितकं पाणी भरून न्यायचं आहे I mean एखादा-दुसरा हंडा किंवा त्याहून जास्त , तसं घेऊन जाईन ना ? “
“ हं ...आणि पाण्याचं नुसतं निमित्त करून नदीवर जायचं असेल , तर ?”
“ओह …. You mean पाण्याच्या निमित्ताने एखादा छबकडा वैगेरे गटवायचा असेल तर ? तर मग गोष्ट वेगळी ,मग मी रिकामा हंडा घेऊन जुन्या हिंदी पिक्चर मध्ये करायचे ना तसं नाचत गाणी म्हणत किनाऱ्यावर फिरेन , आणि पाणी नेणारच नाही “ !..."
"करे ss क्ट !.. देअर यू आर .... तर परमेश्वर त्या वाहत्या नदीसारखा आहे ,ज्याची जेवढी कॅपसीटी असेल तेवढं भांड त्याने घेऊन यावं आणि भरून न्यावं ,आणि ज्याला नदीवर येऊनही पाणी सोडून दुसरं काहीतरी हवय , तो किनाऱ्या पर्यँत येऊनही कोरडाच घरी जाईल . तेव्हा दोष पाण्याचा नसून आपला आहे . ज्याचं जेवढं potential तेवढा परमेश्वर त्याला समजतो ,थोडक्यात परमेश्वर ही पहायची गोष्ट नसून अनुभवायची चीज आहे . कळलं ?काल आपलं debate चाललं होतं ना क्लास मध्ये तेव्हा मला हे बोलायचं होतं , पण नाही बोलले ” शुभ्रता च्या या स्पष्टीकरणावर मधुरा हात जोडून म्हणाली , "कळलं माऊली, चला ! ,मला एकटीला तावडीत पकडण्यापेक्षा , काल debate च्या वेळेसच बोलला असतात तर समस्त श्रोत्यांना हे श्रवणसुख आणि नेत्रसुख दोन्ही मिळालं नसतं का?एरवी एवढी बडबड करत असता मग काल काय झालं होतं ?आठवतं ना परवाच ‘कृष्णकांत ‘म्हणाला होता शुभ्रता तू प्रोफेसर हो म्हणजे वर्ग सारखा भरलेला राहिल तुला बघायला आणि ऐकायला ? ,
“हाहाहा sss कृष्णकांत पण चम्या आहे एक नंबरचा “
“अगं असे बरेच चमे आहेत आपल्या पाठीमागे पण तू कोणाला लिफ्ट देत नाहीस म्हणून मला पण गप्प बसावं लागतं “
“ए SSS हे बरं आहे हं तुझं आपलं , मी काय तुला धरून ठेवलंय का ? वा रे वा , दे की लिफ्ट तुला ज्यांला द्यायचीय त्याला “
“ नाही यार , मी एंगेज झाले तर तू एकटी पडशील ना ? दोस्ती मी इतना खयाल तो रखना पडता है बॉस !.. “
“ अहाहा SSS हो का ? एखादा मनासारखा छबकडा मिळाला म्हणजे जाशील निघून , मग कोण शुभ्रता आणि कौनसी दोस्ती ?”
“ छबकडा मिळू तर दे आधी मग बघू , आणि ‘शुभ्रता माऊली ‘आता उठा ..कॉलेज आहे उद्या सकाळी ,घरी जाऊन उद्याच्या जर्नल सबमिशन चं पण बघायचंय “
"अय्या हो की ...मी विसरूनच गेले गं ss " दोघी कपडे झटकत उठल्या आणि चालायला लागल्या .
“Excuse me !... “
दोघीनी हाकेच्या दिशेने पाहिलं , पाठीमागून एक साधारण 25-26 वर्षांचा ,सहा फुटांपेक्षा थोडी अधिक उंची , ब्लॅक T शर्ट आणि लाईट ब्लू कलरची levise ची जीन्स घातलेला तरतरीत आणि देखणा तरुण झपाझप चालत आला ,
“सॉरी , तुम्ही ओळखत नसाल मला , “
“नसाल म्हणजे नाहीच ओळखत आम्ही तुम्हाला , तुम्ही काय सेलेब वैगेरे आहात का? “ मधुरा तशी जरा फटकळच होती , ,शुभ्रता ने तिच्या हाताला चिमटा काढला . त्याच्या चाणाक्ष नजरेने ते पटकन टिपलं , “ नाही तसं नाही ,actually मी नेहेमी आश्रमा च्या शेतात फिरताना तुम्हाला बघतो ,तुम्ही ज्या विहिरीच्या कट्ट्यावर बसता ,गप्पा मारता तिथेच पलीकडे मीही कधी कधी असतो ,त्यामुळे मला वाटलं कि तुम्हीसुद्धा मला ,........ ” यावर दोघीनीं मोठे मोठे डोळे करून एकमेकींकडे बघत नाही नाही अशी मान हलवली.
“Anyway , माझा परिचय करून देतो, ‘मी ‘ नील भार्गव , “
“Oh ,nice to meet you !.. “
“ yes same here..!.. मी इथल्या विद्यापीठात एका research साठी admission घेतली आहे .” त्याच्या आवाजात मार्दवता आणि भारदस्त पणा याचं एक सुंदर कॉम्बिनेशन होतं .
“बरं मग ? “ इति मधुरा ,
“मग काही नाही …”त्याने खांदे उडवले आणि शुभ्रता कडे वळून बघत म्हणाला ,” “मघाशी तुम्ही परमेश्वराबद्दल जे काही बोललात ते ऐकायला बरं वाटलं ,कधीतरी या विषयावर चर्चा करायला मला नक्कीच आवडेल “ ती मनात चमकली ,“. ,bye the way can i give you a compliment ? .’ आणि मग तिच्या च्या होकाराची वाट न बघता तो पुढे म्हणाला “. you are a flawless beauty , and in your smile i see something more beautiful than the stars !.. .” अचानक असं काही तो बोलेल याची कल्पना न आल्यामुळे शुभ्रता गडबडून गेली ,आणि तिचा चेहेरा आरक्त झाला , ते नोटीस करून तो हसला आणि आला तसा झपाझप निघून गेला .
“काय वाक्य पाठ करून आला होता का ग हा ? “ तो गेला त्या दिशेने पहात मधुरा म्हणाली .
“ नाहीतर काय ? आणि आपल्या गप्पा कधी ऐकल्या याने ? आपल्याला कळलं पण नाही .”
“बघ की, तुला किंवा मला पटवायचं असेल ,पण काही म्हण , चिकणा होता नाही दिसायला ?” मधुरा डोळे मिचकावत म्हणाली “ killing personality ! मी तर एकदम फ्लॅट झाले , नाही शुभ्रता ?… ”, शुभ्रता ..? ओहो ss गाल बघा कसे लाल झालेत एका ‘Flawless beauty ‘चे ,काय बाई खरं नाही आता ,खल्लास केलं ग बाई निळ्याच्या च्या कॉम्प्लिमेंट ने ! मधुरा खिदळली तशी तिच्या पाठीवर गुद्दे मारत शुभ्रता ओरडली
,” शी ए ..गावठी !... निळ्या काय अगं ? जीव देईल तो, त्याच्या नावाची अशी वाट लावल्यावर “
“ मग काय म्हणू ,तुझा छबकडा ?“ “
“माझा ? ई .SSSSS ....काहीही …” शुभ्रता आणि ती मग खो खो हसत बसल्या.
‘हिरव्यागार वनश्रीने नटलेली निसर्गोपचार आश्रमाची ऐसपैस वास्तू , त्या वास्तू च्या आवारात ‘ आणि त्या पाठीमागे कित्येक एकरावर पसरलेल्या आश्रमाच्या शेतात सर्वाना मुक्त प्रवेश होता , सकाळी आणि संध्याकाळी बरेच लोक त्या शेतातल्या पायवाटेवर फिरायला यायचे ,शुभ्रता आणि मधुराचा देखील कॉलेज सुटलं कि रोज संध्याकाळी शेतात फिरायला जायचा परिपाठ होता , शेताच्या उजव्या बाजूला एक छोटी टेकडी होती , वर चढून गेलं कि एक मोठ्ठं डेरेदार आंब्याचं झाड होतं , आणि त्याच्या खाली एक प्रशस्त विहीर होती , मावळत्या सूर्याचं दर्शन घेत त्या प्रशस्त विहिरीच्या कट्ट्यावर , आंब्याच्या झाडाखाली बसून ,भरघोस गप्पा मारणे हा त्यांचा आवडता छंद होता . कॉलेजच्या गॉसीप वरून सुटलेल्या त्यांच्या गप्पांची गाडी, सगळ्या स्टेशनवर फिरून यायची , आजूबाजूचं भानही नसायचं इतक्या गप्पा रंगायच्या त्यांच्या , ते वयच असं असतं , कधी विषय सापडला नाही असं झालंच नाही , आणि आपल्या गप्पा कुणी interest घेऊन ऐकल्या असतील असं त्यांना चुकूनही वाटलं नव्हतं. त्या दिवशी ‘नील’ भेटून गेल्यानंतर आता हल्ली त्या दोघींची नजर आपसूकच त्याचा वेध घ्यायला लागली आणि तोही न चुकता त्यांना दिसायला लागला, आश्रमाच्या शेतातच नाही तर गावात कुठेही दिसायचा ,त्याचं लक्ष गेलं कि तो हसायचा , खरं तर त्याने शुभ्रताला जी compliment दिली होती ती त्यालाच सूट होत होती , खूप दिलखेचक हसायचा , बऱ्याच activities हि करताना दिसायचा , कधी त्यांना शेताजवळच्या मोकळ्या पठारावर ज्येष्ठ नागरिकांचे प्राणायामाचे वर्ग घेताना दिसायचा , कधी शाळेच्या मुलांना exercise शिकवताना दिसायचा , तर कधी आश्रमातल्या डॉक्टरांच्या टीमबरोबर ,हर्बल टी घेतां घेता आयुर्वेदिक झाडांबद्दल चर्चा करताना दिसायचा ,बऱ्याचदा कॉलेजच्या इतर मुलींबरोबर flirt करतानाही दिसायचा , शुभ्रताला नवल वाटायचं , हा नक्की काय काय करतो ? पण जाऊ दे आपल्याला काय करायचंय ? बघावं ते नवल !...

क्रमशः 

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरवात...
पु.भा. प्र!!
शुभेच्छा

मस्त सुरवात!
नदीकिनारा, हंड्यातलं पाणी ते जरा माझ्यासाठी डोईजड झाल.. लवकर कळेचना.. Lol
असो. पुभाप्र! Happy