प्रेम कि मैत्री? भाग ४

Submitted by मनवेधी on 20 September, 2019 - 01:14

तीचा तो राग पाहून सार्थक अवाक झाला.... व श्रेया च्या पाठीपाठी गेला.... श्रेया त्याच जिन्यावर जाऊन बसली जिथे अगोदर सार्थक बसला होता.... श्रेया बाहेरूंन कितीही strong असल्याचं भासवत असली तरीही ती खूपच हळवी होती... तिचा राग अजूनही कमी झाला नव्हता....

"मला आता कळालं कि वेदांत असं का म्हणाला होता कि , हिच्यापासून जपून रहा...खूप danger आहेस तू. ..", सार्थक खाली मान घालत बोलला...

"गप्प रे सार्थ्या....", असं म्हणून ती थोडीशी हसली... सार्थक ने नीट पाहिल्यावर त्याला कळालं कि ती रडत होती...

"अरे बापरे.... हि lady don रडूबाई देखील आहे वाटत...", सार्थक तिच्या शेजारी बसत म्हणाला.... तशी ती जास्तच रडायला लागली ....

"सार्थ्या.... i am so sorry.... ती माझीच मैत्रीण होती आणि मीच तिला ग्रुप मध्ये आणलं होत.... मीच तुम्हाला चिडवायला सुरवात केली.... तुला ह्याबद्दल विचार करायला लावला.... हे सगळं माझ्यामुळं झालं.... माझं असं काहीच इंटेंशन नव्हतं.... plz मला माफ कर....", श्रेया खूपच guilty फील करून घेत होती....

"पण माती मीच खाल्ली ना... आणि जाऊदे... तशीपण ती थोडीच मला आवडत होती... तू केलंस ते बरोबर च केलंस, तुला माहित आहे न किती हॅण्डसम आहे मी.... आता handsome मुलांसोबत होत च असत हे....", सार्थक हसत बोलला....

"शी.... काय बोकडा सारखं दिसतोय...ती काय बोलली ऐकलंस ना.... तोंड.....",ती बोलता बोलता मध्येच थांबली...

"असुदे ग... तीच काय ... ती कुठे अप्सरा आहे.... आणि मन मोठं हवं माणसाच... तिला तर ते नाहीच... आणि मी छान दिसतो बर का... मला माझी आई बोलते....", तो तिला सावरत बोलला....

'प्रत्येकाची आई हेच बोलते बाळ... चल आता... lecture नाही करायचे का ?", सार्थक बोलला....

"अग रडूबाई वाजले किती बघ... लंच ब्रेक होईल आता....", ह्यासगळ्यात किती टाइम गेला कळलंच नाही.... इतक्यात वेदांत आणि रोहित आले..... सार्थक आणि श्रेया ला हसताना बघून त्यांना थोडं हायसं वाटलं.... त्यांनी विषय बदलत विचारलं...

"सार्थ्या, श्रेया ..... उद्या friendship day आहे.... काही प्लॅन करायचा काय....", रोहित बोलला...

"पन्हाळ्याला जाऊया का???", वेदांत बोलला... मित्र, बाईक ,पन्हाळा, आणि रंकाळा हे जणू कोल्हापूर च समीकरण च आहे...

"हो ....." सगळी एकदम बोलली.... ह्यावेळचा friendship day हा त्यांच्या कॉलेज लाइफ चा पहिला friendship day होता....

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी बाइक घेऊन पन्हाळ्याला गेली.... बुधवार पेठेतून जातानाच पन्हाळ्याची थंडी जाणवू लागली.... ऑगस्ट महिना असल्यामुळे... थोडीशी पावसाची रिपरिप आणि सगळीकडे हिरवळ होती.... पन्हाळा तसा प्रत्येक ऋतूमध्ये छान असायचा... पण पावसाळ्यात तो खूपच मनाला भावायचा....पन्हाळ्याला ऐतिहासिक महत्व खूप आहे तसेच तिथला निसर्ग देखील अप्रतिम आहे...

हा सगळा ग्रुप खूप हिंडला..... फोटोस काढले... झुणका भाकर, कणीस , गोळा ह्यावर ताव मारला...खूप मस्ती केलं. .. तीन दरवाजा, अंबरखाना, पुसाटी पॉईंट, अंधारबाव, ह्या सगळ्यांची माहिती श्रेया ने सगळ्यांना दिली... ते फिरत फिरत पावनगड ला गेले... श्रेया तिथल्या एका कड्यावर बसुन समोरचा निसर्ग, धुकं न्याहाळत होती.... थोड्यावेळाने श्रेया डोळे मिटून शांत बसली होती... नेहमीची ती बडबडणारी, नेहमी दंगा करणारी श्रेया आणि आता शांत बसलेली श्रेया खूपच वेगळी भासत होती....

"श्रेया अग ए.... कुठे हरवलीस... आणि इतक्या कडेवर बसू नको... तोल जाऊन पडशील खाली..." सार्थक काळजीने बोलला ....

"तू पण ये ना इथे... बस आणि हा थंड वारा हे धुकं अंगावर घे. .. खूप रिलॅक्स वाटत ... try तरी कर ", श्रेया बोलली ...

"येतो... पण तू ढकलून देणार नाहीस ना मला? ", सार्थक चेष्टेत बोलला.... श्रेया फक्त हसली.... ते दोघे ते क्षण एन्जॉय करत होते... इतक्यात रोहित ने हाक मारली.... "ये चला यार.... अंधार पडायच्या आत घरी जाऊया....", व इच्छा नसतानाही ते घरी जायला उठले....

हा दिवस खूप च छान गेला.... काल जे काही झालं ते विसरून माईंड फ्रेश करून ते घरी गेले....

.

.

क्रमश :

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users