ओॲसिस!

Submitted by अज्ञातवासी on 15 September, 2019 - 16:40

ओॲसिस!

नेहमीप्रमाणे पाऊस पुन्हा सुरू झाला.
काळा अंधार, काळेकुट्ट ढग, काळा पाऊस, काळा रस्ता!
आणि रस्त्यावरून वाहणारं पाणी, चमचम करणारं...
कात टाकलेल्या सापासारखा चमचम करत होता रस्ता!
"एक्स्क्यूज मी!"
मी आवाजाच्या दिशेने मान वळवली. काळा सूट घातलेली एक मुलगी होती.
"लायटर आहे का तुमच्याकडे?"
मी नकळत लायटर काढून तिच्या हातात टेकवलं.
"थँक्स." तिने सिगारेट पेटवली, आणि लायटर माझ्याकडे दिलं.
"या वेळेला बसेस फार कमी असतील ना?"
"हो... आता शेवटची बस." मी उत्तरलो.
"ओह गॉड. सिरियसली?" तिने विचारले.
मी मान डोलावली.
पाऊस वाढला होता, त्यातल्या त्यात ती ओलीचिंब झाली होती.
तिने एक नंबर फिरवला. बराच वेळ बोलत बसली.
"माझा मित्रही आज येणार नाही, आणि बसचीही काही चिन्हे नाहीत. ती म्हणाली."
"माझा इथे जवळच फ्लॅट आहे." मी धैर्याने म्हणालो.
ती क्षणभर थबकली, मग माझ्याकडे बघून हसली.
बरंच चालून गेल्यावर आम्ही फ्लॅटवर गेलो. मी तिला टॉवेल दिला. माझेही ओले कपडे बदलले.
"मी कॉफी करते," ती म्हणाली.
"ओके."
मी थोडावेळ तसाच डोळे मिटून सोफ्यावर बसलो.
"साहेब, कॉफीला साखर नाय घरात." ती माझ्यासमोर आली.
काळी साडी, काळ ब्लाउज, काळा ठसठशीत बुक्का.
"मी आणतो," तिला म्हटलं.
"आणा की मग, संगेच कॉफी पिऊ. ती हसली..."
माझ्या मनात चलबिचल झाली.
"लवकर यावा, मी वाट बघल."
मी बाहेर पडलो, पाऊस मुसळधार चालूच होता.
कोपऱ्यावरच सुपरमार्केट अजून चालूच होतं.
मी आत घुसलो.
"काय हवंय?" तिने मला विचारलं.
ब्लॅक टॉप, ब्लॅक जीन्स.
"साखर."
"गोडव्याची आवड आहे वाटतं तुम्हांला." ती हसली.
"हो, गोड खावंसं वाटतंय."
"अच्छा!" ती खट्याळ हसली.
तिने पाव किलो साखर पॅक केली.
"इथे जवळच माझा फ्लॅट आहे."
"अरे वा! माझीही शिफ्ट संपतेय."
मी बाहेर निघालो.
तीही माझ्यामागे निघाली.
शटर डाऊन करून.
मी फ्लॅटवर पोहोचलो. तीही माझ्याबरोबर आली.
"मी कॉफी करते," ती म्हणाली.
"ओके."
मी थोडावेळ तसाच डोळे मिटून सोफ्यावर बसलो.
"साहेब, कॉफीला साखर नाय घरात." ती माझ्यासमोर आली.
काळी साडी, काळ ब्लाउज, काळा ठसठशीत बुक्का.
मी साखर घ्यायला निघालो, आणि मॉलला जाण्यासाठी बस स्टॉपवर थांबलो.
"एक्स्क्यूज मी!"
मी आवाजाच्या दिशेने मान वळवली...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडीफार कळली...
कथेतला नायक एका कालचक्रात अडकला आहे..
आणि तो खुप black obessed आहे म्हणून त्याला प्रत्येक मुलगी काळ्या कपड्यातच दिसते...आणि एका ठराविक संयत कालचक्रात अडकल्यामुळे परत परत तेच घडतय..पण एक ट्विस्ट आहे प्रत्येक मुलीचे घरी आल्यानंतर कपडे बदलतात म्हणजे काळा सूटचं काळी साडी होणं..
हे कसं ते कळलं नाय ब्वा..

इतकं डोक लावत बसलो असतो तर upsc crack केलं असतं... Happy
हलके घ्या...

फक्त काळी साडीवाली बाई त्याची मोलकरीण बाई असावी...असा अंदाज आहे..

बाकी हा.ब.आणि हा.अ. आहेच की....

अजयदा Lol
अज्ञा.. अरे कधीतरी कळायला सोप जाईल असं लिही...
एकदिवस डोक्याचा भुगा होईल नायतर.. Happy

सगळेच भ्रम आहेत का त्याचे, ओऍसिससारखे? एकही स्त्री खरी नाहीय.

> ..पण एक ट्विस्ट आहे प्रत्येक मुलीचे घरी आल्यानंतर कपडे बदलतात म्हणजे काळा सूटचं काळी साडी होणं..
हे कसं ते कळलं नाय ब्वा..

फक्त काळी साडीवाली बाई त्याची मोलकरीण बाई असावी...असा अंदाज आहे.. > तू बाहेर कितीही सुटबूट-सिग्रेट-फाडफाड इंग्रजी-मित्र (किंवा टॉपजीन्स-ब्लुकॉलर नोकरी) असली तरी घरी येऊन साडी-कुंकू -कॉफी बनवणे-सेक्स करणे हा रोल निभावला पाहिजे!

अजयदा तुमच्या प्रतिसादामुळे बाकिची कथा कळली. माबोवर येनार्या शशक आणि बाकिच्या कथा मी सध्या मुक्ता बर्वे सारखं प्लेनच वाचतो समजली तर ठीक नाही तर बाकीचे आहेतच एक्सप्लेन करायला.

मला आपली असंभव मधली मागच्या जन्मांतली चंद्रावती(का काय नाव होतं) ती आठवली ती काळी साडी वाली बाई वाचून.लगेच मनाने अश्विनी कळसकर किंवा नंदिता दास कास्ट पण करून टाकली.
(पण कथा मला कळली नाहै हे सांगायला संकोच नाही.हळूहळू प्रतिसादातून कळेलच.)

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.
काळ रात्री बराच वेळ झोप येत नव्हती. म्हणून एक श्श्श....कोई है चा जुना एपिसोड बघायला घेतला. त्यावरून ही कल्पना सुचली. मग आले मनात, उतरले लिखाणात.

@Time Travel वरती आहे का?
Submitted by @च्रप्स on 16 September, 2019 - 02:१५
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
नाही, ही संकल्पना नव्हती मनात, पण ती शक्यता धरली तरी मजा येईल.

थोडीफार कळली...
कथेतला नायक एका कालचक्रात अडकला आहे..
आणि तो खुप black obessed आहे म्हणून त्याला प्रत्येक मुलगी काळ्या कपड्यातच दिसते...आणि एका ठराविक संयत कालचक्रात अडकल्यामुळे परत परत तेच घडतय..पण एक ट्विस्ट आहे प्रत्येक मुलीचे घरी आल्यानंतर कपडे बदलतात म्हणजे काळा सूटचं काळी साडी होणं..
हे कसं ते कळलं नाय ब्वा..
इतकं डोक लावत बसलो असतो तर upsc crack केलं असतं... Happy
हलके घ्या...
फक्त काळी साडीवाली बाई त्याची मोलकरीण बाई असावी...असा अंदाज आहे..
बाकी हा.ब.आणि हा.अ. आहेच की....
Submitted by अजय चव्हाण on 16 September, 2019 - 03:५४
>>>>>>>
मस्त संकल्पना. हो, इन्फिनिटी लुपची आयडिया माझ्याही डोक्यात होती. पण आताच जव्हेरगंज यांनी ती वापरल्याने मी तो विचार डोक्यातून बाहेर काढून फेकला.
ब्लॅक ऑब्सेशन, पॉईंट है! Happy

अजयदा Lol
अज्ञा.. अरे कधीतरी कळायला सोप जाईल असं लिही...
एकदिवस डोक्याचा भुगा होईल नायतर.. Happy
Submitted by मन्या ऽ on 16 September, 2019 - 07:५०
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अगर सबकुछ आसान होता, तो मजाही क्या आता लिखणे में. Wink

सगळेच भ्रम आहेत का त्याचे, ओऍसिससारखे? एकही स्त्री खरी नाहीय.

> ..पण एक ट्विस्ट आहे प्रत्येक मुलीचे घरी आल्यानंतर कपडे बदलतात म्हणजे काळा सूटचं काळी साडी होणं..
हे कसं ते कळलं नाय ब्वा..

फक्त काळी साडीवाली बाई त्याची मोलकरीण बाई असावी...असा अंदाज आहे.. > तू बाहेर कितीही सुटबूट-सिग्रेट-फाडफाड इंग्रजी-मित्र (किंवा टॉपजीन्स-ब्लुकॉलर नोकरी) असली तरी घरी येऊन साडी-कुंकू -कॉफी बनवणे-सेक्स करणे हा रोल निभावला पाहिजे!

Submitted by ॲमी on 16 September, 2019 - 10:२०
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
बँग ऑन. भ्रमच्या ऐवजी मनोरुग्णाची फॅन्टसी म्हणा, पण ती फॅन्टसी पूर्ण नाहीये होत. त्याच चक्रात तो अडकलाय. आणि त्याच्या फॅन्टसीही बदलतायेत. त्याला क्षणात एक मॉड हवी असते, क्षणात एक गावठी बाई. सच अ पर्व्हर्ट Wink पण त्याला त्या क्षणाला पोहोचण्याआधीच काहीतरी अडथळा येतोय. त्याच चक्रात तो अडकलाय, तरीही तो त्यामागे धावतोय.
बाय द वे, रात्री २ वाजता मला तुझा एखादातरी प्रतिसाद सापडवावा लागला. ओॲसिस मधला 'ॲ' लिहिण्यासाठी. सो, कथेला तुझा हातभार आहेच. Lol
तू बाहेर कितीही सुटबूट-सिग्रेट-फाडफाड इंग्रजी-मित्र (किंवा टॉपजीन्स-ब्लुकॉलर नोकरी) असली तरी घरी येऊन साडी-कुंकू -कॉफी बनवणे-सेक्स करणे हा रोल निभावला पाहिजे!>>>>>>>>>>>
जस्ट वन थॉट, मोस्टली हे उलट असतं. तू घरात कितीही मॉडर्न राहा, शॉर्ट्सवर वावर, स्लिव्हलेस टॉप घाल, इंग्लिश फिल्म्स बघ माझ्याबरोबर, माझ्या फॅन्टसी फुलफील कर, पण बाहेर जाताना साडी किंवा सलवार कमीज घालूनच जा, पुरुष मित्र नको. कपाळाला टिकली, गळ्यात मंगळसूत्र, मोबाईलवर नवर्यासोबतचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवलाच पाहिजे.
घरात ड्रिंक्स घेत असताना घे एखादा पेग हवंतर, पण बाहेर 'नाही, मी घेतच नाही.' हा डायलॉग फेकता आलाच पाहिजे.
Lol

अजयदा तुमच्या प्रतिसादामुळे बाकिची कथा कळली. माबोवर येनार्या शशक आणि बाकिच्या कथा मी सध्या मुक्ता बर्वे सारखं प्लेनच वाचतो समजली तर ठीक नाही तर बाकीचे आहेतच एक्सप्लेन करायला.

Submitted by Akku320 on 16 September, 2019 - 08:५५
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
काय कोटी, काय कोटी... Lol

नायक झपाटला आहे, असा आपला माझा मीच अंदाज लावला.... तेव्हा आवडली. Rofl Rofl

Submitted by 'सिद्धि' on 16 September, 2019 - 10:२३
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अंदाज बरोबरच होता. Lol

Kahich kalal nahi ... Terrific

Submitted by Urmila Mhatre on 16 September, 2019 - 10:२५
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Lol

मला आपली असंभव मधली मागच्या जन्मांतली चंद्रावती(का काय नाव होतं) ती आठवली ती काळी साडी वाली बाई वाचून.लगेच मनाने अश्विनी कळसकर किंवा नंदिता दास कास्ट पण करून टाकली.
(पण कथा मला कळली नाहै हे सांगायला संकोच नाही.हळूहळू प्रतिसादातून कळेलच.)

Submitted by mi_anu on 16 September, 2019 - 11:००
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Lol
बाकीच्या कास्टिंग्स?

रच्याकने ओॲसिस हे खरंखुरं असते ना. आणि मृगजळ (mirage) हा भास असतो.
की माझ्या अल्पबुद्धीला कळले नाहीये?

मला आधी इंफिनिटी लूप वाटलेला, मग वाटलं भ्रम असेल, स्वप्न असेल, पण बऱ्याच शक्यता आहेत.
रच्याकने, आजकाल तुझ्या लेखनावर जीए यांचा प्रभाव पडतोय असं वाटतंय. तुझं लेखन वाचून त्यांचीच आठवण येते.
आणि नाशकातला पाऊस कसा असेल, हे कळलं पहिला पॅरा वाचून!

काळ रात्री बराच वेळ झोप येत नव्हती. म्हणुन श्श.... कोई है चा जुना एपिसोड बघायला घेतला.त्यावरुन हि कल्पना सुचली. आले मनात, उतरले लिखाणात.
>>>>>
अज्ञा,अरे पाय कुठे आहेत तुझे?? Biggrin Biggrin

काळ रात्री बराच वेळ झोप येत नव्हती. ............त्यावरून ही कल्पना सुचली. मग आले मनात, उतरले लिखाणात. >> ते आले ध्यानात Biggrin फुल टाईमपास Biggrin

मस्त!

बहुरुपी कथा आहे.....
चौथी मिती- काळ- रत्नाकर मतकरी यांच्यासारखी कालमितीतल्या एका चक्रातही फिरते असाही निकष असू शकतो.

पण मला तो व्यक्ती मनोरुग्ण वाटला.
खरी गोष्ट एकच आहे की घरातल्या मोलकरणीने साखर नसल्याने सांगितल्याने तो साखर आणायला बाहेर पडला. आणि विभ्रमाचे जाळे त्याच्याभोवती पसरले. कधी मॉलकरता बस स्टॅंडवर जातोय तर कधी दुकानात. पण तो साखर विकत घेतचं नाहीये. आधी मॉलला जाताना त्याला दिसलेल्या मुलीशी बोलायची कल्पना त्याने केली आणि नंतर दुकानातल्या मुलीशी. सोबत कुणीच आले नाही कारण तो सत्यात त्यांच्याशी बोललाच नाही. बहुदा मुलींशी बोलून त्यांना घरी इनव्हाईट करणे हे त्याचं स्वप्न आहे जे पूर्ण होत नाहीये. म्हणून आभासी जगात तो तरुणींशी बोलून त्यांना घरी बोलावतो. पुढे काय? त्याला माहिती नाही. कारण तो प्रत्यक्षात घराबाहेरच आहे. घरी पोचलाच नाही. मग का? मनाने कारण शोधले म्हणून त्याला परत पहिला प्रसंग आठवतो, कॉफी बनवायला ती (मोलकरीण) आत गेली व तिने साखर नाहीये सांगितल्याचा आणि तो वेगळा option शोधत पुन्हा दुसरे दुकान शोधत फिरतो......

अर्थात, हा माझा दृष्टीकोन आहे.