खडतर आयुष्य ! तीच

Submitted by रिना वाढई on 13 September, 2019 - 03:33

मनातल्या भावनांची जेव्हा कुणाला कदर नसते , किंवा कदर असूनही ,कोणाला काही करता येणार नाही, अशी भावना जेव्हा आपल्या मनात घर करते, तेव्हा आयुष्यात समोर जाण्यावाचून पर्याय नसतोच !

तिच्या जीवनात असचं काहीसं घडलं होत , त्यामुळे आता तिला समोरचा प्रवास खूप जपून करावा लागणार होता . तिने ठरवलं कि , आता आपल्या आयुष्यात कोणाला च जागा द्यायची नाही .. किमान आपला शिक्षण पूर्ण होत पर्यंत तरी !
असेच विचार घेऊन ती निघाली होती आपल्या घरातून, हॉस्टेल वर जाण्यासाठी . पॉलीटेकनिक ला नंबर लागला त्यामुळे तिला आपलं घर सोडून बाहेरगावी जाऊन राहावे लागणार होते . तसा जिल्हा बदलला नाही , तरी एका जिल्ह्यातली गावे काही फार दूर अंतरावर नसतात असं काही नाही! !तिच्या आई-वडिलांच्या गावापासून - शिक्षणासाठी राहावं लागणार गाव चांगलं ४-५ घंट्याचा प्रवास होता आणि समजा एखादी बस चुकली कि लागले मग ७-८ घंटे त्या प्रवासाला .
बाबा,तिच्या खूप जवळचे . म्हणतात ना कि ”मुलांना आई आणि मुलींना बाबा जास्त प्रिय आणि जवळचे वाटतात.” ती सुद्धा तिच्या बाबांची खूप लाडकी होती , एकुलती एक म्हणून सगळे खूप लाड करायचे तिचा ,आणि दिसायला सावळी असल्यामुळे चिडवायचे सुद्धा . ती लहान असताना जरा चिडक्याच स्वभावाची होती ,कोणी जरा चिडवलं कि , लगेच तिचा राग नाकावर दिसायचा , आणि तो नाकावरचा राग सगळे भापत अजून च तिला चिडवायचे , आणि सांगायचे कि तू , आरशात बघ एकदा तुझा नाक किती फुगलंय ! तिचे भाऊ , आत्या ,आत्याचे मुलं -मुली ,मामा असा भला मोठा आप्त-परिवार होता तिचा ,मात्र त्यांच्यामध्ये ती एकटीच सावळ्या रंगाची .

बरं ! लहान असताना कधी जाणवलं नव्हतं तिला, कि आपण सावळे आहोत, कारण रंग जरी सावळा असला तरी बाकी सगळ्या गोष्टींमध्ये ती अव्वल असायची . अभ्यासात हुशार असल्यामुळे सगळ्या शिक्षकांच्या आवडीची होती , तसेच खेळणे ,नृत्य -गाणे या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात ती नेहमी असायची . नुसतं भाग घ्यायची म्हणून नाही तर , नेहमी पहिला क्रमांक तिने तिच्या शाळेला मिळवून दिला होता .

एकदा तिच्या शाळेमध्ये सावित्री बाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम होता ,कुठलेही कार्यक्रम शाळेत राहिले कि, “ती भाषण द्यायला नेहमी समोर असायची “, पण आज मात्र तिने भाषणाची काही तयारी केली नव्हती . तिची आदल्या दिवशी तब्येत बरी नसल्याने तिला भाषणाची तयारी करता आली नव्हती . ती शाळेत जाऊन प्रार्थनेच्या वेळी मागेच उभी राहिली ,तितक्यात एका शिक्षकाने तिला हाक मारली , तिला समोर यायला सांगितले , ती निमूटपणे समोर गेली आणि त्या शिक्षकाला सांगितले कि "सर,आज माझी तब्येत बरी नाही म्हणून मी भाषण देऊ शकणार नाही ,काल मी भाषणाची काहीच तयारी केलेली नाही . " पण त्या शिक्षकाने तिला म्हटले कि "बोल दोन तरी शब्द , तुला अशाच भाषणाच्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा बक्षीस दिला होता मी ,छान भाषण देते तू ,एकदा हाती माईक घेऊन बोलून तर बघ . "त्यावेळेस लहान मुलं हातात कागद घेऊन भाषण देत होते (लहान असल्यामुळे त्यांना पाहून भाषण द्यायची मुभा होती. )पण तिने भाषण सुद्धा कागदावर लिहून आणलं नव्हतं , पण त्या शिक्षकांचा विश्वास तिला बळ देऊन गेला , ती हातात माईक घेऊन बोलायला सुरुवात केली , भाषण संपलं आणि टाळ्यांचा कडकडाट कानी पडला तिच्या ,आणि वाटलं कि खरंच पाहून भाषण देण्यापेक्षा मनातले शब्द बाहेर बोलून दाखवावे , सगळ्यांना तिचा भाषण आवडला होता .

मित्र-मैत्रिणी असा मोठा ग्रुपचं होता त्यांचा ,रंग जरी देवाने सावळा दिला असला तरी बाकीच्या गोष्टी मात्र भरभरून दिल्या होत्या तिला . म्हणून तिला कधी तिच्या रंगाची खंत नाही वाटायची . १० वि मध्ये पहिल्या क्रमांकाने पास होऊन १२ वि विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता . गाव खूप छोटा नव्हता तिचा पण त्यावेळेस मात्र विज्ञान शाखा नव्हती तिथे ,म्हणून १२ च शिक्षण तिला बाहेर गावी राहूनच करावं लागलं होत .

प्रेम ! आई-बाबा , आत्या ,मामा ,आजी - आजोबा ,भाऊ असा सगळ्यांचा प्रेम भरभरून मिळालं होत तिला ,पण त्याचा ? त्याचा मात्र नाही,जीवापाड प्रेम करायची ती त्याच्यावर, त्याला नकळत . त्याच्याकडून काही अपेक्षा हि नव्हत्या तिला , फक्त वाटायचं कि आयुष्याच्या या वाटेवर तो फक्त सोबत असावा . क्षितीजाच्या रंगासारखी प्रत्येक पहाट त्याच्याबरोबर व्हावी . आणि रोज एक-एक पाऊल मावळताना हे आयुष्य त्याच्यासोबत जगावं .
नोकरी ! कितीही शिक्षण घ्या पण जर तुमच्याकडे चांगली नोकरी नसेल तर तुम्हाला कोणी विचारणार नाही , हे एक कडू सत्य आहे . असच झालं होत तिच्यासोबत , नोकरी नाही तर त्याला आपल्या घरचे कधीच आपला जीवनसाथी म्हणून मान्य करणार नाही , हे तिला चांगलं माहिती होत . अंधश्रद्धा , यावर तिचा विश्वास नव्हता पण देवावर कायम निष्ठा होती . एकदा तिच्या काकूंनी तिला सांगितलं कि , काही व्रत करायचे असतात जे आपल्या साठी चांगले असतात , आपल्या मनातले संकल्प पूर्ण होतात जर आपण निर्मळ मनाने ते केले तर !
आता ह्या बाई ला काय पाहिजे होत... मनातील गोष्टच तर पूर्ण करायची होती , मग त्यासाठी तिला उपवास , तापास काहीही मान्य होते . तिने महालक्ष्मीचे व्रत करण्याचा निर्णय घेतला , दोन इच्छा देवाजवळ रोजच सांगत होती ती, १-त्याला चांगली नोकरी , २-(सांगायची आवश्यकता नाही तरी .. ) तो आपल्याला मिळो .
पहिला शुक्रवार आला , तिने उपवास केला होता त्या दिवशी , मनात काही संकल्पना सुद्धा ,त्या दिवशी ती कॉलेज मधून लवकर येऊन घरी जात होती , घर लांब असल्यामुळे पायी जात होती , घरी लवकर पोहचून सायंकाळची पूजा करायची होती तिला . ती भराभरा चालत होती , कॉलेज मधून घरी पायी जाणे हे रोजचच होत , आणि रोज तिला वाटायचं कि आपण असच एकटे या रस्त्यावरून जावे आणि कधीतरी तो आपल्याला समोर भेटावे . आज हि तिला असच वाटत होत , तो आपल्याला आज तरी भेटेल काय ? कस शक्य आहे हे ? तो तर इथे आहेच नाही मग ! पण जर तो आपल्याला भेटला तर ?त्याला विचारायचं का त्याला आपल्याबद्दल काय वाटते ते? हो . विचारायचंच त्याला ... छे काहीतरीच हे आपले विचार .... एवढा विचार करतच ती जागच्या जागी थांबली ,तिच्यासमोर एक गाडी येऊन थांबली , हाताने ब्रेक मारतच तो तिच्यासमोर गाडीवर होता . ... बापरे .. देवाने खरंच आपलं ऐकलं कि काय असं झालं होत तिला , आता काय करावं हे सुचतच नव्हतं . आपण ठरवल्याप्रमाणे विचारायचं का त्याला ? नको ,आज नको, भेटेल तो पुन्हा कधी तर विचारू तेव्हा . तिचा मन तिला स्वस्थ राहू देत नव्हतं . तिची आपल्याच मनात घालमेळ चालू होती , आणि तोच त्याने बोलायला सुरुवात केली .
कॉलेज सुटलं वाटते ?
ती –हो
थोडं इकडे तिकडेच बोलून झाल्यावर तिने त्याला म्हटलं
मला काहीतरी विचारायचं होत तुला .
तो - विचार ना
ती - माझ्या हातावर मी एक प्रश्न लिहिते , त्याच उत्तर हवं आहे मला . देशील ?
तो - हो देईल कि .
तिने आपल्या हातावर एक वाक्य लिहिलं "Do you love me?"
त्याला जणू हे अपेक्षितच होत , जराही विलंब न करता तो उत्तरला " हो ".
तिला मात्र खात्री नाही वाटली म्हणून तिने अजून विचारलं - खरंच ?
त्याने अजून एकदा हो म्हणत खात्री पटवून दिली .
त्याला उशीर होत होता , आणि रस्त्यावर असं बोलणं तिलाही अवघडल्या सारखं वाटलं म्हणून लवकर गेला तो . पण तिच्या मनात मात्र खुशीला काही मर्यादाच नव्हती . नाचावं कि उड्या मारावं हेच कळेना झालं तिला ..
घरी आल्यावर तिच्या मैत्रिणी आधीच येऊन होत्या तिच्याकडे पूजेसाठी.
पण तिची एवढी ख़ुशी पाहून त्यांना न राहवून त्या विचारल्याचं तिला कि "काय झालं ग तुला वेडाबाई ?"
रस्त्या - बिस्त्यात तो तर नाही ना भेटला ? खिल्ली उडवून त्या विचारत होत्या तिला . आणि तिने जोरात हो म्हणत त्यांना गोल फिरवू लागली . तिला एवढ्या खुशीत बघून तिच्या मैत्रिणींना पण खूप आनंद झाला होता .
तिच्या मनात तो केव्हापासून होता हे त्यांना माहित होत , फक्त त्यांनाच नाही तर हे त्याला देखील माहित होत . तो तिला नेहमी भेटायचा , बोलायचा , पण आपल्या मनातलं कधी बोलून दाखवत नव्हता . हिच्या मनातलं कित्येकदा त्याला सांगून झालं होत , हि तर त्याच बोलणं म्हणजेच आपल्या प्रेमाची कबुली असे गृहीत धरली होती , पण त्याच्याकडून स्पष्ट होकार कधी मिळाला नव्हता . तिच्या मैत्रिणींना थोडी भीती वाटत होती कि तीच हे प्रेम फक्त एकतर्फा तर नाही ना! म्हणून त्या तिला नेहमी विचारात असायच्या कि, त्याने कधी तुला तसं बोलून दाखवलं का ?
त्याच तुझ्यावर प्रेम आहे कि फक्त असाच?
आणि या गोष्टीमुळे ती दुखावली होती .
तिला त्याच्याकडून स्पष्ट उत्तर हवं होत आणि ते उत्तर तिला आज मिळालं होत .
त्याचा उत्तर हो च असणार हे नक्की होत ,पण आपल्या मैत्रिणीचं बोलणं सुद्धा तिला पटलं होत .
आज त्याच्या होकाराने तर जणू तिच्यावर जगातल्या सगळ्या सुखांचा वर्षाव च केला होता ...
To be continue….

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२ वी नन्तर polytechnic??
१० वी नन्तर असतं हो ते

चांगला प्रयत्न Happy

thank you

काही पॉलिटेक्निक कोर्सेस फक्त 12 वी नंतरच असतात.त्याला 10 वी नंतर जाता येत नाही.बाकीचे 10 वी नंतर असले तरी 12 वी नंतर पण 10 वी मार्क बेसिस वर जाता येते.
कथा चांगली आहे, लिंगांचा जरा घोळ आहे.