जगण्यासाठी

Submitted by यतीन on 24 August, 2019 - 06:42

मरता मरता जगणे सहन होत नाही
रडता रडता हसणे आता जमत नाही

पावलो गणिक परिक्षा अन् जिंकण्याची ओढ
हरता हरता कौल लावून जिंकणे जमत नाही

माना वाकवून मतलबी होणं झालय सोप्प
यश टिकेल असे कोणाला जिंकायचे नाही

उफराटा बोलणं म्हणजेच झालय हुशार
वाकड्यात शिरुन उलटे बोलण जमत नाही

साध् सरळ जगणं म्हणजे अशिक्षीत नाही
न बोलणं म्हणजे वैचारिक गोंधळ ही नाही

यश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! क्या बात है!
शेवटचा शेर खुप आवडला..आणि पटलासुद्धा.