सरड्यांना ...

Submitted by अमर ९९ on 20 August, 2019 - 11:56

सरड्यांना त्यांनी लाजवले
असे पुढारी बनेल झाले
परवा होते एका पक्षात
आज गेले भलत्या पक्षात
परवा ते असतील ज्यात
तो पक्षच नसे ठाऊक
जिकडे सुगी पाखरे तिकडे
कार्यकर्ते करती तोंड वाकडे
रंग त्यांनी झटपट बदलले
सरड्यांना त्यांनी लाजवले

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अगदी खरंय
मला काही चार ओळी सुचल्या.....

राजकारण हे राजकारण असतं
थोड अवघड अन् किचकटच असतं
वरवर सोप्प सोप्प दिसत असल तरी
वरून मुकुट पण आतून काटेरी असतं

धन्यवाद यतीन जी. राजकारण पैसा आणि खुर्ची च्या हावेमुळे पुढाऱ्यांनी फारच किचकट केले आहे. किचकट म्हणण्याऐवजी घाणेरडं केले आहे.
बोकलत भाऊ धन्यवाद!