कार्ल्याची रस्साभाजी

Submitted by कुंद on 11 August, 2019 - 11:59

कारल्याची रस्साभाजी
(( कार्ले आवडणाऱ्यांसाठी आहे.))
फोटो

साहित्य
एक कपभर कार्ल्याचे काप. (उभे आडवे चिरून)
दोन कपभर कच्चे/हिरवे ( आंबट)टोमॅटो काप.

मसाला
एक मोठा चमचा लसुण चटणी,
एक मोठा चमचा किसलेले सुके खोबरे भाजून,वाटून.
एक मोठा चमचा तेल.
हळद,मोहरी,मीठ,साखर/गुळ.

कृती
१) तेल गरम करून फोडणी करून त्यात लसुण चटणी थोडी परता.
२) कार्ल्याचे काप टाकून थोडे मऊ झाल्यावर टोमॅटो काप टाकून परता.
३)पाणी घालून शिजवा. सुके खोबरे कीस टाकल्याने रसाला थोडा दाटपणा येईल.
४) चवीला मीठ. साखर/गुळ किंचीत टाका.

तिखट,आंबट,किंचित कडू अशी रस्साभाजी पुरी/पोळी बरोबर पावसाळ्यात चविष्ट लागेल.
आंबट टोमॅटो आणि लसुण चटणी कार्ल्याचा कडूपणा घालवते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो मस्त! सोपी पाककृती आहे. करुन बघेन.
आंबट टोमॅटो आणि लसुण चटणी कार्ल्याचा कडूपणा घालवते.>> कडूपणा पण चांगला लागतो Happy

छान आहे रेसिपी . मला ही रस्सा भाजी खुप आवडते. चपाती पेक्षा भाता बरोबर गरम गरम भात तुप आणी कारल्याचा रस्सा यम्मी. आमच्या कडे करताना आई टोमॅटो नाही घालत यात. सुक्के खोबरे आणी कांद्या चे वाटण घालते आणी गोडा मसाला.
या कृतीने ही करायला सांगेन आता तिला.

धन्यवाद सर्वांना.
आता बाजारात कार्ली आणि हिरवे टोमॅटो विकायला येतात त्यामुळे करता येते.
(दुसरी एक लोकप्रिय रस्साभाजी म्हणजे शिमला मिरची अधिक टोमॅटो, नारळ घालून.)

छान