Submitted by अभय आर्वीकर on 24 July, 2019 - 10:01
माकडांच्या पुढे नाचली माणसे!
पाहता पाहता काय झाले असे?
माकडांच्या पुढे नाचली माणसे!
या हवेला कुणाची हवा लागली?
चित्त कामामध्ये ना तिचे फारसे
त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे
मेघही वागती की पगारी जसे
नित्य येणे तिचे वादळासारखे
मग लपावे हृदय हे कुठे नी कसे?
व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती
तू अभय बोल तू, तू हवे तू तसे
गंगाधर मुटे 'अभय'
==०==०==०= =०==०==०==
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पाहता पाहता काय झाले असे?
पाहता पाहता काय झाले असे?
माकडांच्या पुढे नाचली माणसे!
आवडला....
झाडे लावणे मेघांचा वाढ भत्ता आहे
त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे
मेघही वागती की पगारी जसे
खूप दिवसांनी... तुमचे शेती विषयावर लिखाण आवडते...
नमस्कार मुटे साहेब.
नमस्कार मुटे साहेब.
मस्तच!
मस्तच!
झाडे लावणे मेघांचा वाढ भत्ता आहे... ... हे आवडले.
सर्व प्रतिसादकांना नमस्कार
सर्व प्रतिसादकांना नमस्कार आणि धन्यवाद.
या हवेला कुणाची हवा लागली?
या हवेला कुणाची हवा लागली?
चित्त कामामध्ये ना तिचे फारसे
<<<
मस्त शेर!
मक्ता जरा पंगू वाटला
धन्यवाद बेफीजी
धन्यवाद बेफीजी