पुनर्भेट

Submitted by Sanjeev.B on 17 July, 2019 - 05:23

पुनर्भेट ©

दरवळला जेव्हा तोच ओळखीचा सुगंध
वाढले हृदयाचे स्पंदन आणि मन जाहले बेधुंद

चौफेर उधळत होतं तोच अवखळपणा आणि तोच निरागसपणा
तोच नखरा तोच लडिवाळपणा

तिला पाहुन युगे लोटली होती
कोजागिरी च्या चंद्रा पेक्षा ही ती सुंदर दिसत होती

पाहता क्षणी मज मृगनयनी ने
मन ही काबीज केले मनमोहिनी ने

काहीच दिसेना एक तिच्या शिवाय माझ्या नयनी
झर झर आल्या होत्या समोर सार्‍या आठवणी

संपल्या होत्या त्या खोटे रुसवे फुगवे पाहता क्षणी
राहिले होते आता त्या फक्त गोड आठवणी

काय आणले आहे माझ्यासाठी
मीच परतले आहे इथवर तुझ्याचसाठी

- संजीवकुमार रा. बुलबुले
(१७०७२०१९)

Group content visibility: 
Public - accessible to all site users