एक खडूस... (आठवणीतली)

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 15 March, 2019 - 07:58

तू आता महिन्याभरातच दुसऱ्या कुणाचा होशील...
हे सारं " फक्त तुझ्याचसाठी" आता असं तिलाच म्हणशील...

खरं सांगू का.. ? हरकत नाहीये.. नव्हतीच कधी.. म्हणूनच तू जातोयस बहुतेक.
कारण ती हरकत हक्काने घेता आलीच नाही कधी कारण योग्य - अयोग्यचा गुंता मीच गुंतवलेला.

तू ठाम होतास... मला हे हे हवंय.. मी मात्र नव्हते.
पण आता हे असलं काहीबाही वाचून पुन्हा विस्कटून जाऊ नकोस...

मला जप मनाच्या कोपर्यात, पुसून मात्र टाकू नकोस.
माझी एक आठवण असूदेत एका कप्प्यात.

कधी चुकलाच काळजाचा ठोका तर आवाज दे मला...

पण आता उठसूट मला आठवू नकोस ,
डोळ्यांत उगाच अश्रू दाटवू नकोस.

जे हवं असतं ते नेहमीच मिळत नसतं ,
तेव्हा जे सापडलंय त्यालाच जपायचं असतं.

शिक आता हे,
संसाराच्या गाडग्यात जबाबदारी महत्त्वाची तितकाच प्रामाणिकपणा...

उगाच सगळंच तिलाही सांगू नकोस, 'आपला माणूस दुसऱ्याचा आहे अजून' हे सत्य स्वीकारणं कठीण असतं.
तेव्हा असा त्रास कोणाला देऊ नकोस.

अति विचार नको आता.. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात,
जे पटतात ते घ्यावे, बाकीचे " कधीतरी" सोडून द्यावेत.

वेळीच सारं समजून घे...
मला मात्र आता जाऊदे...

नवीन माणसाच्या संगतीत नव्या आठवणी उजळुदेत,
जुन्या थोड्या धूसरच होऊदेत...

एक कोडं उलगडलं... मला हवा होता मित्र अन तुला हवी होती प्रेयसी...
आणि इथेच रे थोडंसं गणित विस्कटलं...

अन मग काय एक पायरी चुकली तर उत्तर थोडीच बरोबर येणार...?

आता खरंच जाते ... ज्ञानामृत संपले...

... एक खडूस... (आठवणीतली)

.............©मयुरी चवाथे-शिंदे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chan !

खूप आवडली
रिलेट झाल्यामुळे अजूनच

मीही अशीच एक खडूस विद नो रेग्रेट्स

आवडले. Happy

पण खडूस का म्हणले आहे ते कळले नाही.

मीही अशीच एक खडूस विद नो रेग्रेट्स > Rofl Rofl
समाधी माफी असावी! पण या वाक्यावर हसू आवरले नाही!!! Happy

Chan,

Chan

आभार Happy