आजचे मावळे

Submitted by संकुल on 20 February, 2019 - 12:12

आज पुण्यनगरी मधील हिंगणे गावातून जाणाऱ्या सिंगल रोडवरून येत असताना मध्ये रोड क्रॉससिंगवर टेम्पो, कार आणि रिक्षा यांच्यामुळे ट्राफिकचा डेडलॉक लागला होता. सर्वजण वैतागून आपआपल्या चार चाकी आणि दुचाकी वर बसून ट्रॅफिक सुटायची वाट बघत होते...

इतक्यात दोन मावळे ज्यांच्या चेहऱ्यावर दाढी, कपाळावर चंद्रकोर आणि गाडीवर भगवा झेंडा असे त्यांच्या बुलेटरुपी घोड्यावर बसून आले.... पण Wrong साईडने

आणि ऐटीत पुढून येणाऱ्या एका चारचाकीला अडवून उभे राहिले... त्या गाडीचे चालक हे वयोवृद्ध होते म्हणून ते काही न बोलता उभे राहिले पण मागील गाडीवल्यानी हॉर्नवरील हात बाजूला केला नाही..

आपण जर मागे गेलो तर हे ट्राफिक लगेच सुटेल आणि महाराज आपल्याला कडेलोटची शिक्षा करतील म्हणून ते आपले कान आणि मन बंद करून तसेच उभे राहिले...

शेवटी काही दुचाकीने थोडे पुढे मागे होत त्यांना आत येण्यास जागा दिली आणि ती समोर अडकलेली चारचाकी मार्गस्थ झाली आणि लगेच ट्राफिक पण मोकळे झाले...

जर असे मावळे जर त्या काळात असते तर कदाचित "स्वराज्य" हा शब्दच मराठीच्या शब्दकोशात नसता..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults