तू

Submitted by विनोद. on 18 February, 2019 - 12:52

*तू*

लाल गुलाब पांढरा चाफा आहेस तू
ग्रीष्म ऋतूत चिंब करणारा वर्षाव तू
तू इंद्रधनू सप्तरंगी तारका चंद्राची
तू कोमला राज्ञी मदानाची...देवी इंद्राची

तू यौवना माया सुंदरी अप्सरा
तू मेघना अवतरे या धरा
तू चंचला विदुल्लाता शुभ्र कांती
तू निर्जरा मनीची अतीव शांती

रमणीय देखणे सडोल मूर्त तू
दैवी कोरलेले एक देखणे शिल्प तू
तू कौमार्य देहाची एक उर्वशी
देखणी रेखीव रंभा ती होती जशी

श्वेत कांती मलमली त्वचा
केश गहिरे बोलक्या डोळ्यांची तू ऋचा
भुवई कमान धनुष्यबाण
ओठ बुंद कपाळ रुंद देखणी छान

Group content visibility: 
Use group defaults

सारा अली देखणी आहे पण ओठ बुंद म्हणजे कसे ते कळले नाही. कपाळ रुंद हे बरोबर आहे. सिंबामध्ये मला ती आवडली. केदारनाथ पाहिला नाही.

कविता छान आहे.

ही कविता सारा अली खान साठी लिहिलेली आहे?
मला तर कवितेत उल्लेख मिळाला नाही.

बहुतेक कवींनी आधी शेवटच्या ओळीत छान ऐवजी खान लिहिलं होतं. त्यावरून चिनूक्स सारा अली खान पर्यंत पोचले असावेत.