Submitted by बिपिनसांगळे on 14 February, 2019 - 10:59
व्हॅलेंटाईन डे हवा कशाला
---------------------------------------------------------------
ती होती नाजूक चाहूल
जेव्हा आयुष्यात माझ्या
पडले तुझे गं पाऊल
तो बहरला निशिगंध
की दरवळली रातराणी
कोणास ठाऊक काय ते
पण झाली सुरु कहाणी
लागले पिसे मनाला
जिवाला नवीनच भूल
ती होती…
दिवस जाहले सोनेरी
अन् निशा निशा चंदेरी
तलम जाहले वस्त्र मनाचे
ल्यायले नक्षी गं जरतारी
जळी स्थळी चेहरा तुझा
जिवाला नवीनच खूळ
ती होती…
ही वाटचाल मोठी
संगतीने चालावयाची
साथ असता तुझी
काय तमा भयाची
व्हॅलेंटाईन डे हवा कशाला ?
जेव्हा अर्पिले तू प्रेमाचे
जिवाला नवीनच फूल
----------------------------------
बिपीन सांगळे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे...
छान आहे...
श्रद्धा आभारी आहे
श्रद्धा
आभारी आहे
छान आहे...
छान आहे...
छान कथा
छान
कथा/कादंबरीकोमल धन्यवाद
कोमल
धन्यवाद
डुडायडू ,
डुडायडू ,
धन्यवाद .
कविता चुकून कथा विभागात लावली गेली
आणि मग पुन्हा कविता विभागात दुसऱ्यांदा ,
क्षमस्व .
छान आहे . वॅलेंटाईनचा
छान आहे . वॅलेंटाईनचा रेफर्न्स नसता तरी चाललं असत.
सीमा ,
सीमा ,
आभार .
तो संदर्भ वगळूनही लिहिता आली असती खरं तर .
पण मी ती कविता त्या दिवसा साठी लिहिली होती .