मणिकर्णिका - एक प्रामाणिक प्रयत्न (चित्रपट रिव्यू )

Submitted by आस्वाद on 27 January, 2019 - 10:17

मणिकर्णिका मूवी बद्दल आणि विशेषतः कंगना बद्दल बरेच वादंग सुरु होते, आहेत. अगदी सुरुवातीपासूनच. डायरेक्टर सोडून जाणे, कंगनानी हातात सूत्र घेणे, मग काही कलाकार प्रोजेक्ट सोडून जाणे इत्यादी... आणि अगदी अलीकडे करणी सेनानी धमक्या देणे तर खूपच हास्यास्पद वाटलेलं. पण हे सगळे केवळ TRP साठी केलेले असू शकते, अशीही शंका होती. त्यामुळे मणिकर्णिका मूवी बघायचाच असं काही ठरवलं नव्हतं. रादर नेटफ्लिक्स/ ऍमेझॉन वर अली कि पाहू, असाच विचार होता. पण काल अचानक जुळून आलं आणि मूवी बघायला गेलो. काहीच अपेक्षा ना ठेवता. पण मनातल्या-मनात, कमीतकमी भन्साळी पेक्षा तरी बरं काही असू दे असं म्हणतच.

आणि मणिकर्णिकाने अपेक्षा पूर्ण तर केल्याच, पण खूप दिवसांनी कोणी प्रामाणिकपणे इतिहास दाखवायचा प्रयत्न केलाय, याचं समाधान दिलं.

कथा तर सगळ्यांनाच माहित आहे, त्यामुळे त्याबद्दल नाही लिहीत. काही काही प्रसंग सोडले - सुरवातीचा वाघाचा प्रसंग, ग्वालियर च्या राजाचा प्रसंग, ती गरोदर आहे ते कळण्याचा प्रसंग आणि आणिक काही दोन-चार प्रसंग सोडलेत तर पटकथा खूप छान लिहिलीय. अतिशय वेगवान आहे. डायलॉग कमी आहेत, आकशन जास्त. अशा मूवी मध्ये मोठेमोठे डिआलॉग्स टाळण्याचं कसं साधलं असेल माहित नाही. पण त्यामुळे मेलोड्रामा कमी आणि फॅक्टस जास्त आहेत.

कंगना हि आजकालची माझी आवडती एक्टरेस. त्यामुळे थोडं biased वाटू शकतो, पण एवढंच म्हणेन की ती कंगना नाही, राणी लक्ष्मीबाईच वाटते. विशेषतः इंटर्वल नंतर. तिनेच फिल्म डायरेक्ट केलीये, त्यामुळे तिचं विशेष कौतुक. बाकी कलाकार पण छान आहेत. गाणी ओके आहेत,
काहीकाही नसती तरी चालली असती.

एकूण कालचा दिवस सत्कारणी लागला माझा.
रेटिंग: ****

डिसकलमेर: मी फिल्म क्रिटिक नाहीये Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा,
छोटासा पण छान रिव्ह्यू,
ट्रेलर मध्ये खटकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष फिल्म मध्ये कशा आहेत हे पहायची उत्सुकता आहे
जसे,
तेव्हा 9 10 वयात लग्न होत असताना ही 18 20 ची दिसणारी घोडनवरी घरी का बसवून ठेवली होती
बाकी सगळ्या मुली बायका नऊवारी साडी नेसून आणि खोपे आंबडे घालून गप गुमान असताना ,मनू एकटीच घागरा चोली घालून भुसाऱ्या सारखे केस सोडून वाडाभर का उधळलेली असते

आताच पाहुन आले आणि येथे धागा असेलच म्हणुन डोकावले.

>>>कंगना हि आजकालची माझी आवडती एक्टरेस. त्यामुळे थोडं biased वाटू शकतो, पण एवढंच म्हणेन की ती कंगना नाही, राणी लक्ष्मीबाईच वाटते. विशेषतः इंटर्वल नंतर. तिनेच फिल्म डायरेक्ट केलीये, त्यामुळे तिचं विशेष कौतुक. ---+१००

खरंच एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

ह्म्म... मुळात नाव मणिकर्णिका होतं का मनकर्णिका ? नाव जर मणिकर्णिका असेल तर त्याचं लघुरुप मनू कसं होइल ?
ठिकाय पण !! पिक्चर पाहिला.. ठिक होता, फार ग्रेट नाही. कंगना वेगवेगळ्या भुमिका चांगल्या निभावू शकते हे नक्की !

- प्रसन्न

सिम्बा: हो, ट्रेलर्स मध्ये जरा भडक आणि टिपिकल बॉलीवूड मूवी असेल असं वाटतं. पण पूर्ण सिनेमा तसा नाहीये. सुरुवातीचे १५-२० जरा गंडलेत. त्यात तिचे कपडे पण फार ऑड आहेत. घागरा- चोळी नाहीये पण... Happy नंतर मात्र सुंदर आहे कॉस्ट्यूम्स

प्रसन्न: नाव मणिकर्णिकाच आहे.

परीक्षण आवडलं.
हा मूव्ही जोरात चालू आहे आणि खूप दर्जेदार आहे याचा मला आसुरी का कायसा आनंद झालाय.

भन्साळीच्या सिनेमॅटिक लिबर्टीमुळे खुश झालेल्या अनेकांना तोच सेम लिबर्टी घेण्याचा हक्क इतरही डिरेक्टरना आहे हे इतकं का खटकतंय!

मणिकर्णिका - एक प्रामाणिक प्रयत्न हे पटलं. परीक्षण आवडलं.
काहीसं असंच मत, चित्रपट कसा वाटला वर लिहीलं होतं. ते इकडे पण चिकटवतो:-

मनापासून वाट पाहत होतो तो "मणिकर्णिका" काल पाहिला. खूप आवडला. आवर्जुन पहावा असा आहे. इकडे सिनेमा ला रेटिंग १२+ असल्याने (रक्तपाताचे प्रसंग असल्याने कदाचित) मुलाला दाखवता आला नाही, या गोंधळात पहिली साधारण २० मिनिटं चुकली, पण कथा बर्‍यापैकी माहित असल्याने फारसा फरक पडला नाही. शक्य असल्यास मुलांना नक्की दाखवावा असा सिनेमा आहे. कंगना , आणि डॅनी चं काम आवडलं. दोन्ही इंग्लिश अधिकार्‍यांचं काम पण साजेसं होतं. अनेक प्रसंगांना, संवादांना उस्फूर्त पणे दाद दिली गेली. ऑव्हरऑल मस्त पॅकेज!

स्पॉयलर अलर्ट:-
मध्यांतराच्या आधीच्या भागात फारच गोष्टी खटकल्या . मनु करारी, ठाम न वाटता अनेक ठिकाणी उद्धट वाटली. कपडेपट, सतत मोकळे सोडलेले केस, पदर न घेणे वगैरे गोष्टी मनु च्या स्वभावतली बंडखोरी न वाटता उद्दाम पणा कडे झुकल्या सारख्या वाटल्या. अंकिता लोखंडे बाईंचं गाणं का घ्यावंसं वाटलं हा प्रश्न पडला. मुळात सिनेमॅटीक लिबर्टी च्या नावाखाली असलं दाखवून वाद निर्माण होणारच अशी परिस्थिती का निर्माण करतात समजत नाही. ऐतिहासिक सिनेमा तयार करताना या बाबतीत सूट घ्यावीशी का वाटते ! मध्यांतरा नंतर सिनेमा एकदम वेग घेतो आणि आधीच्या ह्या गोष्टी, नंतर सादरीकरण, संवाद, कंगनाचा स्क्रिन प्रेझेन्स यामुळे विसर पाडायला भाग पाडतो !
झाशीच्या किल्ल्यातल्या लढाईच्या वेळी, छोट्या दामोदरला मारायला/पकडायला आलेल्या १०-१५ इंग्रजांशी लढतानाचा आवेश आणि पाठी मागे देवीची उग्ररुपाताली मोठ्ठी मूर्ती असलेला प्रसंग सिनेमा पाहताना अंगावर काटा आणतो ! त्याच प्रमाणे त्या इंग्रज अधिकार्‍याला रणांगणात फरफटत नेण्याच्या प्रसंगात नकळत.. शाब्बास म्हणत मूठी आवळल्या जातात..

परीक्षण आवडलं.
मनकर्णिका असंच लहानपणापासून वाचत आले होते.

तेव्हा 9 10 वयात लग्न होत असताना ही 18 20 ची दिसणारी घोडनवरी घरी का बसवून ठेवली होती
>>>राणीचे 14 वय होते लग्न झाले तेंव्हा.

झाशीच्या राणीचं आडनाव नेवाळकर असताना सिनेमात मात्र दोनदा नवलकर असा उल्लेख झालाय. इतकी अक्षम्य चूक कशी काय करतात.

झलकारी बाईचा आणि सोबत राणीसाचा नाच बघून सुडोमि झालं.

१०० करोड क्लबमध्ये प्रवेश! कंगनाचे अभिनंदन!!!

यामुळे काहींच्या जोरदार पोटात दुखणार आहे त्यांनी काय ते आपापलं औषध गोळ्या घ्या!

देवा, आज यातली 2 3 गाणी यु ट्यूब aap मध्ये प्ले लिस्ट मध्ये आली,
त्या शितावरून केलेली या भाताची परीक्षा,
1) कंगना कास्टिंग सगळ्यात खटकले

2) मनुबाई कुठेही केस मोकळे सोडून फिरताना दिसतात, एक लायब्ररी मधले गाणे, दुसरे आयटम सॉंग दोन्हीकडे राणीसाहेब केस मस्त मोकळे सोडून आहेत

3) त्या लायब्ररी मधील गाण्यात गोल्डन एम्बोसिंग केलेल्या कव्हर असणाऱ्या पुस्तकांची रांग दिसते, तेव्हा इतक्या सर्रास छापील पुस्तके उपलब्ध होती का?

4) कंगना एक पुस्तक उघडते त्यात छापील रंगीत चित्र दिसते

5) विधवा झाल्यानंतर पण राणीच्या कपाळावर चंद्रकोर दिसते.

6) राणीचा मुलगा दामोदर याची मुंज झाल्याचे उल्लेख आहेत, म्हणजे टक्कल घेरा शेंडी असणे अपेक्षित आहे, इकडे तो मस्त झुलपे वाढवून दिसतो

7) तेव्हा काडेपेटीत मावतील इतक्या तलम साड्या बनायच्या हे खरे, पण म्हणून राणी शिबंदी ची पाहाणी करायला जाताना पण तितक्याच तलम साड्या नेसून फिरते हे आउट ऑफ प्लेस वाटते. तिच्या पथकातील सगळ्याच बायका एकंदरीत काळाच्या मनाने फार तलम कापड नेसतात. (आणि विचित्र पद्धतीने नेसतात)

8) त्या गोतावळ्यात कोणत्याच बाईची 9वारी साडी ब्राह्मणी पद्धतीची वाटत नाही

9) स्त्रियांना तलवारबाजी शिकवताना त्यांचे पवित्रे केरळी मार्शल आर्ट्स सारखे वाटले.

10) मध्येच कोणत्या तरी दृश्यात कंगना घोड्यावर बसून दौडत जाते आहे आणि मागे 4 मीटर पदर उडतो आहे असा सीन आहे.

11) गाण्यात दाखवलेला राणी चा अंत म्हणजे जखमी राणी आगीवर उभी राहते आणि भर रणांगणात उभी पेटते.
जर असाच शेवट चित्रपटात दाखवला असेल तर अशक्य चिडचिड आहे, विशेष: राणीच्या अंताबद्दल ठोस माहिती असताना असे नाट्यकरण करायला नको होते.

3 गाण्यात इतकी चिडचिड तर 3 तासाच्या चित्रपटात काय पोटेनशिअल असेल डोके फिरवायचे....

हो मी प्राइम वर आला तेव्हा हा सिनेमा पहायचा प्रयत्न केला. १५-२० मिनिटापेक्षा जास्त बघू शकले नाही. कंगना मॉडर्न दिसते आणि बोलते. केस, कपडे सगळे मॉडर्न दिसते. स्थळ/ काळ/ संस्कृती काहीही अभ्यास करायची तसदी न घेता बनवलेला चित्रपट आहे.

सिमबा, पूर्ण ऍग्री.
कुठेतरी सर्व खोटं वाटत राहतं.कलाकार म्हणून अशी भूमिका मिळणं, आपण त्यात बेस्ट देणं असं वाटणं साहजिक आहे.पण कथा कथा न राहता एका सुंदरीला विविध फॅन्सी ड्रेस घालून मिरवता यावं म्हणून बनलेलं महाग व्हेंचर वाटतं.हेअर स्टाईल,कपडे सगळीकडे बाई न चुकता सुंदर दिसत राहतात.पण झाशीची राणी वाटत नाहीत.