रद्दीमोल

Submitted by सुप्रिया जाधव. on 14 November, 2018 - 13:05

आज
खूप दिवसांनी
पुस्तकाचं कपाट आवरायला घेतलं

बरेच दिवसात
आवडत्या पुस्तकांवरचीही
धूळ झटकली गेली नव्हती

तीच होती ती पुस्तके,
विशेषतः आत्मचरित्रे
ज्यांनी पडत्या काळात
निरपेक्षपणे साथ दिली होती
सुयोग्य मार्ग दाखवला होता

कुणी काही सांगितलं तर
पटकन पचनी पडत नाही माझ्या
बहुधा इगो आड येत असावा
किंवा
मुलखाचा हट्टी स्वभाव !

मात्र पुस्तकातल कथानक
त्यांतील पात्रांचे प्रॉब्लेम्स
त्यावर लेखकाने काढलेले
प्रगल्भ तोडगे
त्याबरहुकूम माझ्या अनुभवांना पडताळणे
आणि
ही जी विचारांची बैठक लाभलेली असते
तीच
पुढे-मागे कठीण प्रसंगी
जीवनातले निर्णय घेताना
अतिशय उपयुक्त ठरणे !

आणि अश्या अनमोल पुस्तकांच्या
ह्या दयनीय अवस्थेला माझं दुर्लक्षच कारणीभूत ठरलं होत

ठरवलं !

कुणाच्याही आयुष्यात
आपली गत
ह्या दुर्लक्षित पुस्तकासारखी होऊ द्यायची नाही

जिथली उपयुक्तता संपेल
तिथून
कोणी रद्दीमोल ठरवण्याआधीच...
काढता पाय घ्यायचा

आणि तू विचारतोयस की
अस अचानक काय झालं ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निव्वळ अप्रतिम!

आणि तू विचारतोयस की
अस अचानक काय झालं ?