ती मी आणि बस

Submitted by शुभम सोनवणे सत्... on 6 November, 2018 - 02:48

ती मी आणि बस...

सकाळचे आठ वाजले होते, तरीही माझं उरकलं नव्हतं. आज कॉलेज ला जायला उशीरच झाला होता. ( हा उशीर का होतो असतो हेच मला कळत नाही, सगळं कसं आपोआप वेळेवर व्हायला हवं पण असं काही होत नसत, जाऊद्या) कसबस उरकलं...पाठीवत बॅग टाकली... आईला निरोप घेऊन घराबाहेर पडलो..

" काय सोनोपंत, एवढ्या सकाळी सकाळी कुठे ?"

कॉलेजला चाललेलो आहे हे माहीत असूनही हे मोरे काका दररोज हा प्रश्न विचारतात आणि काळ्या बोक्या प्रमाणे उगाचच दात काढीत माझा रस्ता अडवतात. आज त्यांची जिरवायची या हेतूने मी उत्तर दिलं,

" काही नाही हो मोरे काका, ही कागदपत्राची भरलेली बॅग घेवून भारत-पाकिस्तान प्रश्न सुटतोय का हे पाहायला दिल्लीला चाललोय, येताय का ? "

" कॉलेजला जा आधी वेळेवर, निघाले भारत-पाकिस्तान प्रश्न सोडवायला..."

इथे माझीच जिरली, हे पाहून मी कपाळावर हात मारून घेतला आणि पुढे निघालो.

थोड्या वेळातच मी बस स्टॉप वर पोहचलो. माझ्या सारखे उशीर झालेले अनेक प्राणी बस स्टॉप वर पाहुन माझ्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दाटून आला. काही काळ तो तसाच राहिला . नंतर परिस्थिती ची जाणीव होताच मी पुन्हा बस ची वाट पाहू लागलो.
बस आली. गुळाला मुंग्या चिटकाव्यात तशा पद्धतीने माणसे बसला चिटकली.
कसाबसा मी वर चढलो. दरवाज्यातच मला उभं राहायला जागा मिळाली. हिमालयातील एखाद्या योग्या प्रमाणे मी कसातरीच एका पायावर उभा होतो. कॉलेजला जायला झालेला उशीर आणि बस मधील गर्दी या मुळे मी प्रचंड हैराण झालो होतो.

अशातच एक मंजुळ स्वर कानावर पडला...

"हॅलो.... कुणीतरी बस थांबवा.... हॅलो बस थाबवा....."

आवाजाच्या दिशेने मी बसच्या बाहेर डोकावून पाहिलं. तर एक मुलगी आपले काळेभोर केस हवेत उडवीत, हातातील पुस्तके सांभाळत बस च्या मागे पळत सुटली होती.
काही काळ मी तिला तसच पाहत राहिलो. नंतर भानावर येत अगदी DDLJ च्या स्टाईलने मी तिला हात देऊ केला.
आता ती माझा हात धरेल आणि आणि बस मध्ये येईल असं घडणारच होत, तेवढ्यात ड्रायव्हरने बस थांबवली. माझ्या हाताकडे अजिबात लक्ष न देता, ती बस मध्ये चढली.
निरूपयोगी ठरलेल्या माझ्या हाता कडे पाहत मी माझा हात मागे घेतला...…
बस मध्ये स्थिरावत असताना मी बस मधील इतर लोकांकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर एक दोघे जण कुत्सिक पणे हसताना मला दिसले, मला त्यांचा प्रचंड राग आला.
पण तो राग जास्त काळ टिकला नाही.
कारण माझ्या समोर ती उभी होती.
थोडी सावळी पण तितकीच सुंदर, गालावर आलेले केस मागे सारताना ती भलतीच सुंदर दिसत होती. आणि मी स्वतःला विसरून जात होतो..............

मी तिला पाहत होतो. एवढ्या गर्दीत असूनही फुलावर बसलेल्या फुलपाखराच्या मनात जे भाव असतील ना, तेच भाव माझ्या मनात होते. कॉलेजला झालेला उशीर मी विसरून गेलो होतो, काळ्या बोक्या प्रमाणे वाटणारे मोरे काका मला अचानक गोंडस मांजरी प्रमाणे भासत होते, आणि मला म्हणत होते, "भिडा सोनोपंत.… भिडा"
मी भिडणारच होतो पण इतक्यात माझ्या कार्यक्रमात व्यत्यय आणत कंडक्टर मोठ्याने ओरडला....

" बोला तिकीट..…"

त्यांचा तो रुक्ष आणि तितकाच बसाडा आवाज अंगावर फुलांचा वर्षाव होत असताना मधेच कुणीतरी भुसा टाकावा, तसा वाटला...
त्यांना उत्तर देताना मी त्यांच्याच सुरात सूर मिसळत म्हणलो,

" तिकीट.…"

" काय गंमत करताय का... ? कुठे जायचय ते बोला..." कंडक्टर खेकसत ओरडला.

शिवाजी रोड म्हणत मी कंडक्टर च्या हातावर पैसे टेकवले आणि तिकीट घेतले.
आणि पुन्हा माझा पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण तिनेही शिवाजी रोडचेच तिकीट घेतले होते.
एव्हाना तिच्या लक्षात आलं असावं की , मी तिच्याकडे एकटक पाहतोय ते... कारण आता तीही माझ्याकडे एकटक पाहायला लागली होती. आता मला अवघडल्या सारख झाला. मी उगाच हसत होतो, इकडे तिकडे पाहत होतो.

स्वतःची एक भुवई उडवत तिने मला प्रश्न केला,

" काय चाललंय.... का पाहतोस माझ्याकडे...?

आता मात्र माझी पुरती गाळण उडाली होती. तरीही अंगात होत नव्हतं तेवढं बळ एकवटून मी जरा चाचरतच बोललो...

" काही.... काही नाही... छे... असंच... "

" मग असच पाहायचं असाल ना तर बाहेर पाहायचं , माझ्याकडे नाही ... ok... "
ती अत्यंत तुसड्या स्वरात म्हणाली.

आता मी थांबणार नव्हतो... मी बोलायला सुरुवात केली...

" का हो, तुम्ही अशाच बोलता...?
का कधी कधी हसताही...?"

ती: हसते ना... खूप हसते... आणि दुसऱ्याला रडवतेही...

" काय सांगता काय...? कस जमत हे तुम्हाला..?
मी फक्त कुतुहुला पोटी तिला प्रश्न विचारला .

" हे माझे सँडल पाहिले... "
तिने आपल्या सँडल कडे पाहत मला प्रतिप्रश्न केला..

" व्वा.. खूप सुंदर..." मी कौतुकाचा जणू वर्षावच केला..

" हो ते सुंदर आहेच, पण जेव्हा ते गालावर पडतात ना.. तेव्हा गाल ही सुंदर होतो... आणि माणूस रडायला लागतो... पाहायच कस ते.." तिने जवळ जवळ मला धमकीच दिली होती...

मी थोड नमत घेत म्हणालो... " अहो अस काय करता... आपण बसमेट आहोत.. अशी धमकी देने योग्य नाही.."

" बसमेट... म्हणजे... ?" तिला समजलं नसावं कदाचित म्हणून तीनं मला विचारलं.

" अहो क्लास मध्ये भेटतात ते क्लासमेट अगदी तसच बस मध्ये भेटतात ते बसमेट... So आपण आता बसमेट आहोत...आणि या न्यायाने तुम्ही माझ्याशी निःसंकोचपणे बोलू शकता " मी थोडा भाव खातच बोललो.

तिच्या चेहऱ्यावर अचानक शांतता दाटून आली.. आणि ती बोलली..

" नाही मला नाही बोलायचं.. तसाही बोलून काय उपयोग होणार आहे. जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा मी गप्प होते... आता बोलून काय होणार आहे.."

तिच्या डोळ्यात थोडी आसवं दाटून आली होती.. कुणाला दिसणार नाही अशी ती उभी होती. पण तीच्या डोळ्यातील पाणी माझ्या नजरेतून सुटू शकले नाही...

बस जस जशी पुढे जात होती असतशी बस मधील गर्दी कमी होत चालली होती. आणि आम्ही दरवाजातून थोडं आत आलो होतो. ( बस मध्ये एक बर असत , आपण बस मध्ये कधी बसतो...आत आत कधी जातो आणि नंतर उतरण्यासाठी पुन्हा दरवाजापाशी कधी येतो हे आपले आपल्यालाच कळत नाही... कदाचित हा भारताच्या ऐकून लोकसंख्येचा परिणाम असावा अस माझं भाबड अनुमान आहे ) आत येऊन स्थिरस्थावर झाल्यावर मी माझं लक्ष पुन्हा ती'कडे वळवलं.
पण ती आता माझ्याकडे पाहत नव्हती . ती अजूनही शांत उभी राहून एकटक पाहत होती.
तिच्या डोळ्यातील ती आसवं काही केल्या माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हती म्हणून मीच बोलायला सुरुवात केली...

" केवढी ही शांतताssss...."

तिला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात मी जवळ जवळ ओरडलो. माझ्या आवाजाने तिच्या चेहऱ्यावरील पुसटशी रेषही हलली नाही परंतु माझ्या शेजारच्या माणसाला मात्र जाग आली ,
" ओ महाशय ओरडताय काय ? आणि इथे कसली शांतता वाटते तुम्हाला, जरा म्हणून झोपू देत नाही"
" अहो ओरडलो कुठे मी, फक्त जरा मोठ्याने बोललो... आणि इथे झोपा काढता मग घरी रात्रभर काय टाळ कुटत बसता काय..? " शेवटचे वाक्य मी मनात म्हंटल.

त्या माणसाकडे दुर्लक्ष करत मी तिच्याशी थेट बोलायला सुरुवात केली,

" रागावणार नसाल तर एक बोलू का ? "

" मी नाही म्हंटल तर तू बोलायचा थांबणार आहेस का?" तिनेच मला प्रतिप्रश्न केला.

थोडासा भाव खात मी हसलो आणि बोललो, " काही तरी उपयोग व्हावा म्हणून बोलायचं आणि उपयोग होणार नाही म्हणून बोलायचं नाही या मताचा मी नाही.... आयुष्य कसं स्वच्छंदी हवं... उगाच हसावं... उगाच नाचावं... तसच उगाच कोणाशीही बोलावं... "

" खरं बोलतोस रे तू, पण हे फक्त बोलण्या पुरत असत . खऱ्या आयुष्यात आपल्याला आपल्या मनाप्रमाणे कधीच वागता येत नसत." माझं म्हणणं खोडत ती बोलली.

तेवड्यात बस एका खड्यात खाडकन आदळली, आणि ती माझ्या अंगावर कोसळली...
रस्त्या वरील खड्यांचा आणि आपल्या सरकारचा मला त्या वेळी भयंकर अभिमान वाटला.

" काय मग.. जैसे डाग अच्छे होते हे, तैसे खड्डे पण अच्छे होते हे... काय म्हणता..?"
मी उगाच गंमत म्हणून तिला बोललो.

" वाईट होता" दोन शब्दांत तिने माझ्या सेन्स ऑफ ह्युमरची वाट लावली होती.

" वाईट कसा होता ?, याला तात्विक विनोद म्हणतात आणि हे फक्त थोड्याच लोकांना समजतात.. ok.." मी माझ्या विनोदाचं समर्थन करत म्हणालो.

ती अचानक माझ्याकडे वळत मला म्हणाली, "खड्डे रस्त्यातील असोत किव्हा माणसाच्या मनातील दोनही वाईटच... शेवटी त्रास तर आपल्यालाच होतो..."

तीच बोलणं न समजण्या पलीकडचं होत. तिच्या आयुष्यात काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालेला असावा याची मला आता जणीव झाली होती.
पण ती काही स्पष्ट बोलतच नव्हती. स्वतःच्याच विचारात ती सारखी घडून जात होती.

" खड्डे चांगलेच असतात असं काही माझं मत नाही. पण काही खड्डे हे आपल्याला चुकवता येत नाहीत. त्यातून आपल्याला जावंच लागत. अशा वेळी दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा त्याच्या समोर छातीचा कोट करून उभ राहायचं असत" मी अगदी मनापासून तिला बोललो.

" खूप सुंदर बोलतोस रे तु... आणि तू असाच आहेस का...वेडा... कुणाशीही ओळख नसतानाही बोलणारा..." तिनं माझं कौतुक केलं होतं.
तिचे ते शब्द म्हणजे मला जणू प्राजक्ताचा वर्षावच वाटला...

ती आता खुलत चालली होती. उलगडत चाललं होतं तीच एक एक पान... चेहऱ्यावरील ताण आणि शांतता नाहीशी होऊन थोडस स्मित तिच्या चेहऱ्यावर आरूढ झालं होतं....

चेहऱ्यावरील स्मिताने तिचा चेहरा खुलवलेला होता. खिडकीतून वारंवार आत येणाऱ्या सूर्यकिरणांनी तिच्या डोळ्यांची सारखी मिणमिण सुरू होती. सुंदर हा शब्दही कमी पडावा इतकी सुंदर ती दिसत होती.
मी पुरता हरवुन गेलो होतो. माझं हरलेलं भान पाहून तिनेच भानावर आणत मला विचारलं,

" अरे कुठे हरवलास, मी काही तरी विचारलंय तुला ?"

तिच्या त्या प्रश्नाने मला स्मृतिभ्रंश तर झाला नाही ना ? असा भयानक विचार माझ्या मनात आला. तो तसाच मनात ठेवत मी जरा चाचरतच काय असं म्हंटल.

"अरे अस काय करतोस. मी विचारलं, की तु असाच आहेस का ? कुणाशीही ओळख नसतानाही बोलणारा ?"

एखाद्या चांगल्या जोडीदाराप्रमाणे माझ्या विसारभोळ्यापणावर अजिबात न हसता तिने आपल्याच वाक्याची परत उजळणी केली होती.

" ते व्हय, हो खर आहे ते. जीवनात संवाद असायला हवा. माणसांनी एकमेकांशी आपली सुख दुःख शेअर करायला हवी. त्यासाठी ओळखच कशाला हवी. अनोळखी माणसाशीही आनंदाचे काही क्षण आपण घालवू शकतो, उगाच बोलून.."
मी काहीतरी जीवनाचा गहन अर्थ सांगतोय या अविर्भावात तिला माझ्या व्यर्थ बडबडीचे स्पष्टीकरण दिले.

कदाचित तिला ते पटलं नसावं म्हणून ती म्हणाली,
" काहीही, अस काही नसतं. अस कसं उगाचच ओळख नसताना कुणाशीही बोलायचं.. आणि समोरच्याची इच्छा नसेल तर..?"

" इच्छेच काय घेऊन बसला. आता तुमची तरी कुठं होती इच्छा बोलायची, पण बोलताय ना..?
इच्छा तर सर्वांची असते फक्त सुरुवात करणारं कोणी तरी हवं असतं. माणसाच्या जीवनातील बहुतेक प्रॉब्लेमच मूळ हेच आहे की आपण बोलायलाच सुरुवात करत नाही. आपल्याला कायम असच वाटत की, कोणीतरी यावं आपल्याशी बोलावं, आपल्याला समजून घ्यावं. पण माझं म्हणणं या उलट आहे आपणच बोलतं व्हावं. आपल्या समस्या, आपले प्रश्न, आपली दुःख बोलून दाखवावीत. निदान आपल्या माणसांसमोर तरी. मन तर हलकं होतच पण मार्गही सापडतात. आयुष्य हे सोप्प असतं आपणच ते कॉम्प्लिकेटेड बनवत असतो."
मी अगदी मनापासून बोललो.

" खर आहे रे तुझं, पण काही वेळा कितीही ठरवलं तरी आपण बोलू शकत नाही. कदाचित माणूस म्हणून आपल्या त्या मर्यादा असतील. पण त्या प्रत्येक वेळी त्रास हा आपल्यालाच होतो. आता माझच पाहा ना........."

तिच्याविषयी ती काही तरी सांगणार होती. पण तिने तिचे शब्द आवरले. माझी जाणून घ्यायची उत्सुकता वाढली, म्हणून मीच तिला बोलतं करावं या हेतूने विचारलं.,

" बोला ना, का थांबलात... काही घडलंय का तुमच्या आयुष्यात, जे कुणालाही सांगायचं नाही असं ठरवलंय तुम्ही..."

" काही नाही...काही गोष्टी कितीही ठरवल्या तरीही सांगता येत नाही... "
तिनं आपलं गुपित हे गुपितच ठेवायचं या उद्देशाने मला उत्तर दिलं.

बस मधील गर्दी आता थोडी कमी झाली होती.
आम्हाला आता बसायला जागा मिळाली हाती.
( बस मध्ये बसायला जागा मिळणारा माणूस हा भाग्यवंत समजायला हवा. आणि त्यालाच भाग्यवंत का म्हणायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर बस ने एकदा प्रवास कराच..!! आणि मी त्याहून भाग्यवंत होतो कारण माझ्या शेजारी ती बसली होती.)
बराच वेळ शांततेत गेला.. बस थांबत होती, माणसं बसत होती , काही उतरत होती.. कंडक्टर आपल्या बसाड्या आवाजात 'तिकीट, तिकीट' ओरडतच होता. कदाचित तिलाच आता ही शांतता नकोशी झालेली असावी. म्हणून तिनेच बोलायला सुरुवात केली,

" काय झालं तू इतका शांत का..?"

तिने अचानकच बोलायला सुरुवात केल्यामुळे मी जरासा दचकलोच. आणि ती खुदकन हसली.

" अरे वा, खूप सुंदर हसता की तुम्ही."
मी हसतच तिला म्हंटल.

" का मी हसू शकत नाही का...?"
ती जरा डोळे मोठे करतच बोलली.

" नाही नाही.. तस नाही, मगा धरून तुम्ही शांत शांत होता, म्हणून म्हंटल, पण मला आवडेल तुम्हाला ऐकायला... आता तुम्ही बोलावं अस वाटतं.."
मी थेट मुद्द्यातच हात घालायचं ठरवलं होतं.

मी अस म्हणताच ती पुन्हा शांत झाली. पण लगेचच मनाशी काहीतरी ठरवुन ती बोलती झाली,

" मला पटतंय तुझं म्हणणं.. आपण योग्य वेळी बोलायलाच हवं. आपल्या मनातील सल लगेच मोकळी करायला हवी. तो वाट पाहत होता माझ्या बोलण्याची.... आणि मी गप्प होते. "

तिच्या डोळ्यात आसवं दाटून आली होती. पण आता ती लपवत नव्हती. सांगत होती ती, मोकळं करत होती स्वतःच मन आणि सर्वकाही....

सकाळचे नऊ वाजले होते. सकाळचं सकाळ पण जाऊन थोडंस ऊन लागायला सुरुवात झाली होती. त्या उन्हात तिच्या डोळ्यातील ते अश्रू मोंत्याप्रमाणे चमकत होते. ते मोती अलगद निखळणारच होते. तेवड्यात अत्यन्त चपळतेने तिने ते रोखून घेतले. तिच्या आयुष्यातील ते क्षण ती मला सांगणार होती. म्हणून मी आतुर झालो होतो . माझी आतुरता अधिक वाढू न देता तिने बोलायला सुरुवात केली.....

" समीर, समीर त्याच नाव. खुप प्रेम करायचा माझ्यावर. एका मुलीला आपल्या जोडीदारत जे गुण असावेत असे वाटतं ते सर्व गुण त्यात होते. केरिंग होता, शेरिंग होता, समजूतदार होता, खट्याळ होता, मस्तीखोर होता. मीही त्याच्यावर खुप प्रेम करत होते."

मी तीच बोलणं नीट ऐकत होतो. बस मध्ये आता शांतता होती. ओरडून ओरडून कंडक्टर ही दमला असावा कारण मागच्या सीटवर त्याने केव्हाच ध्यान लावलं होत. ती पुढे सांगू लागली,

"छोट्याश्या शहरात आमचं एक छोटंसं घर असाव अस आम्हाला वाटत होतं. दोघांनी कामाला जावं, एकत्र स्वयंपाक करावा , एकत्र खावा. आम्हाला एक मुलगी असावी असं त्याला नेहमी वाटायचं, मी मुद्दामहून त्याला चिडवण्यासाठी म्हणायचे, नाही आपल्याला मुलगाच होणार. तो चिडायचा आणि मी खुप हसायचे. सगळं नीट चाललं होतं. आमचं अफेअर आम्ही आमच्या घरी सांगणार होतो. पण हे सुखाचे दिवस नियतीला मान्य नव्हते. ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. कधीच नाही....."
"तो संपूर्ण दिवस आम्ही एकत्र घालवला. मस्त दिवस होता. माझ्या घरी कुणीच नसल्यामुळं तो घरी आला होता. आम्हाला आवडायचं एकत्र वेळ घालवायला. खुप बोलायचो, हसायचो. पण तो दिवस इतर दिवसांपेक्षा वेगळा होता. एक वेगळीच अनोळखी शांतता जाणवत होती . आणि त्याच शांततेने घात केला. आम्ही आमच अस्तित्व हरवून हरवून बसलो होतो. नजरेतील आतुरता आता संपली होती. वसंताची पालवी फुटत होती. निसर्ग उधळण करत होता आपल्या असीम सौन्दर्याची आणि अफाट ताकदीची. आम्ही दोघे नाहून निघत होतो त्याच्या त्या दैवी सोहळ्यात. श्वास वाढत होते पण दमछाक कुठेच नव्हती. सर्व आकाश मोकळं होत आणि आम्ही सुसाट पळत होतो. एक परमोच्च ध्येय घाटे पर्यंत......

त्याच आनंदात असताना अचानक दरवाजाची बेल वाजली आणि आम्ही त्या विलक्षण जगातून थेट वास्तवाच्या दरवाजावर धाडकन आदळलो."

तिचे ते शब्द मी अमृताप्रमाणे कानात साठवत होतो. पण अचानक आलेल्या Twist मुळे मीही थोडा घाबरलो.
ती पुढे सांगू लागली......

" दरवाजाची बेल वाजल्यामुळे आम्ही सावरलो. आम्ही आवरा आवरी करायला सुरुवात केली. दरवाजाची बेल वाजताच होती. दरवाजा उघडला जात नाही म्हंटल्यावर दरवाजावर जोरजोरात थापा पडायला लागल्या. त्याच गडबडीत तो कुठेतरी लपला. त्याला लपलेलं पाहून मी दरवाजाच्या दिशेने धावले. दरवाजा उघडला दरवाजात दादा उभा होता. मी प्रचंड गोंधळलेली आणि घाबरलेली होते. माझी ती अवस्था आणि तो अवतार पाहून दादाला शंका आली.

इतका वेळ दरवाजा उघडायला का लागला ? कोण, होत कोण घरात ? काय करत काय होती तू घरात ?.... दादाने एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्या त्या प्रश्नांनी मला दरदरून घाम फुटला. मी गोंधळात काय बोलत होते माझं मलाच कळत नव्हतं. मागून आई बाबा ही घरात आले. त्यांना काय होतंय हे कळण्याच्या आतच समीर दादाच्या हाताला लागला. कसलाही मुलाहिजा न ठेवता दादाने त्याला फरपटतच हॉल मध्ये आणलं. लाथा बुक्क्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. जिवाच्या आकांताने तो ओरडत होता. मीही दादाला नाकोरे मारू त्याला म्हणून विनवणी करत होते. पण दादा थांबत नव्हता. आई बाबांच्याही एव्हाना सर्व प्रकार लक्षात आलं होता. माझा हात धरून मला ओढतच आई ने माझ्या रूम मध्ये नेलं आणि बंद केलं.
जिवाच्या आकांताने दरवाजा उघडा म्हणून मी ओरडत होते. बाहेरून समीरचा काळीज पिळवटून टाकणारा आवाज येत होता. बराच वेळ तो आवाज येत राहिला नंतर तो बंद झाला.
आणि माझ्या रूम चा दरवाजा खाडकन उघडला. दादाची भेदक आणि तितकीच लालबुंद रागीट नजर माझ्यावर खिळली. माझ्याकडं सरसावत दादाने माझ्या दोन तीन कानशिलात भडकवल्या. संपूर्ण अंग थरथरून कापू लागलं.
कोण होता तो मुलगा ? काय करत होतो आम्ही ? असा कुठलाही प्रश्न न विचारता दादाने मला मार-मार मारले.
त्यानंतर बराच वेळ एक भयानक शांतता पसरली. आता सगळं शांत होईल नीट होईल असं मला वाटलं, पण....

दादाने कुणाला तरी फोन लावला. समोर पोलीस असावेत याची मला दाट शंका आली. आणि घडलही तसच.
दुसऱ्या दिवशी दादा मला घेऊन पोलीस स्टेशन ला गेला. आणि समीरच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केला.मी पार कोलमडून पडले होते. दादा पुढे माझं काहीच चालत नव्हतं.
नंतर समीरला अटक झाली अस कळलं. पोलीस घरी आले. मला नको नको ते प्रश्न विचारून भांबरून सोडलं. माझ्या स्त्रीत्वाला लाजवणाऱ्या काही टेस्ट ही झाल्या . सगळं आमच्या विरोधात जात होतं. मी काहीच करू शकत नव्हते. संपवून टाकावं हे आयुष्य असा विचारही मनात आला पण तेव्हढीही ताकद आता माझ्यात उरली नव्हती.

काही दिवसांनी कोर्टात केस उभी राहिली. दादाने त्या आधीच मला धमकावलं होत. मी जर समीरच्या बाजूने बोलले तर तो त्याला मारून टाकणार होता. दादाची ती धमकी माझ्या काळजात खोलवर घुसली होती. माझ्या मनात प्रचंड गोंधळ सुरू होता काय करावं तेच कळत नव्हतं.
वाद झाले प्रतिवाद झाले, तपासण्या झाल्या उलट तपासण्या झाल्या. आमच्यात झालेल्या त्या निसर्गदत्त सोहळ्याची माणसातील जनावरांनी बलात्कार म्हणून हेटाळणी केली होती.
तीन ते चार महिने आमच्या नात्याची चिरफाड त्या न्यायदेवते समोर सुरू होती. आम्ही सहन करत होतो ते अत्याचार त्या नजरा आणि सर्व काही...

शेवटच्या दिवशी जजसाहेबांनी समीरला शेवटचं विचारलं होत. विचारला होता शेवटचा जबाब. आहे का मान्य तुला तुझ्यावरचे आरोप म्हणून. तेव्हा समीर उत्तरला होता.

'माझं तिच्यावर निस्सीम प्रेम आहे. आम्ही काही चूक केली असे मला वाटत नाही. प्रेम करणे ही जर चूक असेल तर ती मी एकाच काय हजार जन्मात करेल. आमच्यात झालेल्या प्रणयाला रानटी मानसिकतेने बलात्काराच रूप जरी दिल असलं तरी त्या निर्विकाराला आमच्यात झालेल्या त्या सहज सुंदर प्रणयाची जाणीव आहे. त्यामुळे आपण आपला निर्णय द्यावा तो मला मान्य असेल.'

किती प्रेम करत होता समीर माझ्यावर . याही परिस्थिती त्याच माझ्यावरील प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं. समीरच उत्तर घेऊन जजसाहेबांनी मला प्रश्न विचारला, माझही त्याच्यावर प्रेम आहे का म्हणून.
मी गोंधळले अचानक काय बोलावे तेच समजेना. समीर माझ्या कडे टक लावून पाहत होता. आहे माझंही त्याच्यावर प्रेम या उत्तराची तो अपेक्षा करत होता. त्याची ती प्रेमाने भरलेली नजर मला त्याच्याकडे खेचून नेत होती. मी सांगणार होते सर्वांना ओरडून की, माझंही समिरवर खुप प्रेम आहे म्हणून.
पण तेवढ्यात माझं लक्ष दादा कडे गेलं. दादा रागाने लालबुंद झाला होता. त्याची ती आग ओकणारी नजर मला जाळून टाकत होती.

मी थांबले आणि विचार करू लागले. काय करावं हेच सुचत नव्हतं. जजसाहेब पुन्हा पुन्हा विचारत होते. मी गप्प होते, विचारांचं द्वंद्व माझ्या मनात सुरू होतं.
सांगावं का सर्वांना की माझं समीर वर खुप प्रेम आहे म्हणून. आणि दादाने त्याला काय केलं तर...... मी प्रचंड घाबरले. डोकं फुटायची वेळ आली. एकीकडे दादाची आग ओकणारी नजर तर एकीकडे समीरची प्रेमाची आस लावून बसलेली नजर... डोक्यात हलकल्लोळ माजला होता. मी माझं डोकं दोन्ही हाताने घट्ट दाबून धरलं आणि मटकन खाली बसले. ढसाढसा रडू लागले. समीर की दादा, दादा की समीर काही कळत नव्हते. दादाची धमकी मला आठवू लागली. आणि मी आणखीनच घाबरले. दादा समीरला मारून टाकेलं म्हणून माझं मन घाबरू लागलं सैरावैरा पळू लागलं. आणि मी सर्वांना ओरडून सांगितलं, नाही माझं प्रेम समीर वर.... नाही प्रेम..
आणि खूप रडले....

माझं हे वाक्य ऐकताच समीरच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ते मी स्पष्ट पाहिले. त्याच प्रेम नाकारूनही त्याच्या डोळ्यात मला माझ्या विषयी कसलाही राग दिसत नव्हता. दिसत होतं फक्त प्रेम काळजी आणि दया...

न्यायालयाने त्याला तीस वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. प्रेमाला मी बलात्कार म्हणून सिद्ध केलं होतं. गुन्हा मी केला आणि शिक्षा तो भोगत होता आणि तरीही माझ्यावर प्रेम करत होता. अगदी खरं...... मनापासून.....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तीच बोलणं संपलं होत. तिची ती करून कहाणी ऐकून माझ्याही डोळ्यात आसव दाटून आली होती.बरच वेळ शांततेत गेला. अचानक माझ्याकडं वळून तिने बोलायला सुरुवात केली.

" सांग यात माझं काही चुकलंय का ? त्याच्या जीवाला कसलाही धोका नको म्हणून मी बोलले. मला त्या वेळी तोच पर्याय योग्य वाटला. नाकारलं मी त्याच प्रेम. नाही बोलता आलं खरं. खरंच खरं बोलणं सगळ्यात अवघड असत.

" नाही.... तिथं तुमचं चुकलं किव्हा समीरच चुकलं अस मला वाटत नाही. परिस्थितीच अशी होती की तिथे दोष कुणालाच देता येत नाही. " मी स्वतःला सावरून तिला उत्तर दिलं.

" तिथं खरं बोलणं गरजेचं असतानाही मी बोलले नाही.त्याच काय ? ती तर माझी चूकच होती ना ? " ती.

" नाही मला नाही वाटत. माणूस नेहमी परिस्थिती पाहून वागतो तुम्ही तेच केलं. पण एक मात्र खरं आहे. परिस्थिती कुठलीही असो आपण बोलायला हवं. खुप प्रश्न सुटतात." मी समजुतीच्या सुरात म्हणालो.

" खरं बोलतोस तू. आपण बोलायला हवं. तीन वर्षे झालीत या घटनेला.तेव्हा पासून हे दुःख मी माझ्या उरात दाबून टाकलं होतं. पण तुझ्याशी बोलल्यामुळे मोकळं मोकळं वाटतंय. दररोज वाटायच संपवून टाकावं हे जीवन पण आता जगायचंय. वाट पहायचीय समीरची. त्याला सांगायचंय माझं त्याच्यावर खुप प्रेम आहे म्हणून."

तिच्या त्या निश्चयाने मला भरून आलं.माझ्या बोलण्याच्या वेडा मूळ एका मुलीला तिच्या जगण्याचं कारण मिळालं होतं. मी माझीच पाठ जरा थोपटून घेतली.

बस थांबली.. आणि कंडक्टर ने शिवाजी रोड म्हणून आरोळी ठोकली. आमचा स्टॉप आला होता आम्ही उतरलो. तिने माझ्याकडं पाहून स्मित केलं आणि अचानक काहीतरी आठवल्या सारख करत ती बोलली...
" आपण इतका वेळ बोललो पण आपल्याला आपली नावेच ठाऊक नाहीत."

तिच्या या प्रश्नाने मलाही हंसु आलं. मी म्हंटल,
" हो ना... पण ठीक आहे. नको सांगायला आपण आपापली नावे एकमेकांना. लक्षात ठेवूया आपला हा बस प्रवास, आयुष्यभर....!!!

माझ्या म्हणण्याला तिने मानेनेच संमती दर्शविली आणि दोनच शब्द पुटपुटली....
" वेडाच आहेस..."

ती आणि बस दोघीही निघून गेल्या. मी तिथेच होतो उभा....त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्या न्याहळत......

समाप्त...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Special Thanks: Vikas Sable, My lovely Family and My all friends.

.......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा:! मस्तं लिहिलंय. आवडलं. शेवटपर्यंत कथेमध्ये खिळवून ठेवलंय. सोनोपंतांचं कॅरेक्टर जाम आवडलं. थोडाबहुत वपु टच जाणवला. मस्तं!!!

धन्यवाद नरेनजी...
30 वर्ष आपणास चुकीची वाटत असतील तर मार्गदर्शन करावे. आपले मार्गदर्शन माझ्यासारख्या नवोदिताला प्रेरणा देईल.
पुनःच धन्यवाद

मी वकील / न्यायाधीश / पोलीस नाही परंतु गुन्हेगारीच्या बातम्या वाचून असे निदर्शनास आले आहे की गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार खालीलप्रमाणे शिक्षा दिल्या जातात.

खून - जन्मठेप - १४ वर्षे कारावास
अनेक खून (मल्टीपल मर्डर्स) / खून करताना क्रौर्याची परिसीम / दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा - फाशी

बलात्काराच्या घटनेत क्रौर्य / प्रचंड शारिरीक इजा पोचविणे असे घडले असेल तर त्यालाही खुनाप्रमाणेच मानून फाशीची शिक्षा देण्याची शिफारस नव्याने करण्यात आली आहे. अर्थात तुमच्या कथेत नमूद केल्याप्रमाणे आधी दोघांनी मर्जीने संबंध ठेवले आणि नंतर मुलगी नाकबूल झाली असे असल्याने मुलीच्या अंगावर शारिरीक इजा नसतील व त्यामुळे केवळ फसवणूकीने बलात्कार (किंवा कुठलेतरी अमिष दाखवून) असा गुन्हा सिद्ध होईल किंवा भाऊ / वडील अशा घरच्या मंडळींनीच मुलीला मारहाण करुन त्याचेही बिल मुलावरच फाडले तरीही ती हिंसा फार मोठी असणार नाही (म्हणजे शस्त्राचे वार इत्यादी).

त्यामुळे तुम्ही कथेत लिहिलेल्या गुन्ह्याकरिता आपल्या देशातील न्यायव्यवस्था फारतर ७ वर्षांची शिक्षा देईल.

{{{ " सांग यात माझं काही चुकलंय का ? त्याच्या जीवाला कसलाही धोका नको म्हणून मी बोलले. मला त्या वेळी तोच पर्याय योग्य वाटला. नाकारलं मी त्याच प्रेम. नाही बोलता आलं खरं. खरंच खरं बोलणं सगळ्यात अवघड असत.

" नाही.... तिथं तुमचं चुकलं किव्हा समीरच चुकलं अस मला वाटत नाही. परिस्थितीच अशी होती की तिथे दोष कुणालाच देता येत नाही. " मी स्वतःला सावरून तिला उत्तर दिलं. }}}

हे पटलं नाही. खोटी साक्ष देण्याचं लंगडं समर्थन केल्यासारखं वाटलं अगदी समीरच्या जीवाला धोका असला तरीही. कुठलाही पुरुष बलात्काराच्या गुन्ह्याबद्दलची शिक्षा आणि मृत्यू यात निवड करायची झाल्यास मृत्यूचाच पर्याय स्वीकारेल. त्यामुळे तिने न्यायालयात खरीच साक्ष द्यायला हवी होती. दादाने समीरचा खून करण्याची धमकी दिली असली तरीही. शिवाय दादाने खून करायची धमकी दिली म्हणजे त्याने तसे केले असतेच असे नाही कारण त्यालाही तुरुंगवासाची भीती वाटणारच ना? पण शिक्षा भोगून आलेला समीर आयुष्यातून कायमचा उठलेला असेल. मेलं कोंबडं आगीला भीत नाही त्याप्रमाणे प्रेम आणि प्रतिष्ठा गमावलेला आणि तुरुंगवासाची सवय झालेला समीर मात्र तिचा आणि तिच्या घरच्यांचा खून करु शकेल.

शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोषाला शिक्षा होता कामा नये हे तत्त्व केवळ आरोपीच्याच फायद्याचं नसून ते पाळलं जाणं फिर्यादीकरिताही तितकंच गरजेचं आहे. बलात्कार केलेला नसतानाही तो सिद्ध होऊन तुरुंगवास भोगावा लागलेल्या समीरची कथा वाचणारा वाचक पुढच्या प्रत्येक बलात्काराच्या फिर्यादीकडे संशयाच्या नजरेने पाहील हे जास्त धोकादायक आहे.

सॉरी, पण अगदीच सुमार कथा आहे. मी लेखन आवडलं नाही तर निगेटिव्ह प्रतिसाद लिहीत नाही, पण इथे सगळे मस्त कथा आणि अगदी वपु टच वगैरे लिहिताहेत म्हणून मला वास्तवाची जाणीव करून द्यावीशी वाटली, जेणेकरून पुढच्या लिखाणात सुधारणा करता येतील.

1. हा काही ट्रेन किंवा फ्लाइट प्रवास नाही की खूप तासांच्या ओळखीत सहप्रवाशांशी गप्पा चालू होतील आणि मन मोकळं केलं जाईल. कॉलेजपर्यंतचा बस प्रवास म्हणजे असून असून किती असेल? 30 ते 45 मिनिटं? अगदी 1 तास. तेवढ्या वेळात कोणी मुलगी अनोळखी मुलाला एवढं मोठ सिक्रेट सांगेल?
2. गर्दीने भरलेल्या बसमध्ये अशी सिक्रेटस कोणी शेअर करेल? ऐकलं नाही तरी मागच्या पुढच्या लोकांना सगळ्या गप्पा ऐकू जात असणार, तिथे एवढी महत्वाची गोष्ट बोलणं अशक्य
3. काही मिनिटांचा बसप्रवास सोडा, पण दूर अंतराच्या काही तासांच्या प्रवासात सुद्धा शक्यतो दोन भिन्न लिंगी व्यक्ती पटकन मैत्री करत नाही ( आपल्याकडे भारतात तरी). एकवेळ स्त्री स्त्रीकडे मन मोकळं करेल पण प्रवासातल्या थोडक्या ओळखीवर एवढं मोठं सिक्रेट एक मुलगी एका अनोळखी मुलाकडे नक्कीच बोलणार नाही
4. बाकी कोणी सांगितलं नाही म्हणून आवर्जून लिहिते की शुद्धलेखनाच्या खूप चुका आहेत ( एकच उदा : किव्हा × - किंवा √)

<<<<सॉरी, पण अगदीच सुमार कथा आहे. मी लेखन आवडलं नाही तर निगेटिव्ह प्रतिसाद लिहीत नाही, पण इथे सगळे मस्त कथा आणि अगदी वपु टच वगैरे लिहिताहेत म्हणून मला वास्तवाची जाणीव करून द्यावीशी वाटली, जेणेकरून पुढच्या लिखाणात सुधारणा करता येतील.

1. हा काही ट्रेन किंवा फ्लाइट प्रवास नाही की खूप तासांच्या ओळखीत सहप्रवाशांशी गप्पा चालू होतील आणि मन मोकळं केलं जाईल. कॉलेजपर्यंतचा बस प्रवास म्हणजे असून असून किती असेल? 30 ते 45 मिनिटं? अगदी 1 तास. तेवढ्या वेळात कोणी मुलगी अनोळखी मुलाला एवढं मोठ सिक्रेट सांगेल?
2. गर्दीने भरलेल्या बसमध्ये अशी सिक्रेटस कोणी शेअर करेल? ऐकलं नाही तरी मागच्या पुढच्या लोकांना सगळ्या गप्पा ऐकू जात असणार, तिथे एवढी महत्वाची गोष्ट बोलणं अशक्य
3. काही मिनिटांचा बसप्रवास सोडा, पण दूर अंतराच्या काही तासांच्या प्रवासात सुद्धा शक्यतो दोन भिन्न लिंगी व्यक्ती पटकन मैत्री करत नाही ( आपल्याकडे भारतात तरी). एकवेळ स्त्री स्त्रीकडे मन मोकळं करेल पण प्रवासातल्या थोडक्या ओळखीवर एवढं मोठं सिक्रेट एक मुलगी एका अनोळखी मुलाकडे नक्कीच बोलणार नाही >>> + १११११

मी तर कथा अर्धी सुद्धा नव्हती वाचली, पण किल्ली अन सचिनजींचा प्रतिसाद वाचुन पुर्ण वाचली अन मलादेखील नाही आवडली अन पटली तर बिलकुल नाही. पण ईतर प्रतिसाद पाहता अन लेखक नविन आहे बघुन निगेटीव्ह प्रतिसाद देणे टाळत होती. बरे झाले तुम्ही ते लिहीले Happy

अजुन एक, जेव्हा एखादी मुलगी एखाद्याला आपली चप्पल दाखविते तेव्हा ईतक्या लगेच तीचे मत बदलणे निव्वळ अशक्य आहे अन तेही ओळख नसताना फ्लर्ट करणार्या बाबत तर नाहीच नाही. अन एकवेळ केली ओळख वा मैत्री तरी आयुष्यातील ईतकी खाजगी बाब सांगणे तेही सार्वजनिक ठिकाणी तर नाहीच नाही

मीरा च्या प्रतिसादाला +१,
कथा मुंगेरिलाल के हसिन सपने मधुन आल्यासारखी वाटली. शेवटच्या पॅरात तो झोपेतुन जागा होतो असं काही आलं तर...?
रच्याकने कथा नायक रुन्म्या सारखा वाटला. Wink

वीबी> >>>>+१
मी पण प्रतिसाद देत नव्हते. पण सगळे इतकी तारीफ करताहेत बघुन आश्चर्य वाटलं.
काही मिनिटांचा बसप्रवास सोडा, पण दूर अंतराच्या काही तासांच्या प्रवासात सुद्धा शक्यतो दोन भिन्न लिंगी व्यक्ती पटकन मैत्री करत नाही ( आपल्याकडे भारतात तरी). एकवेळ स्त्री स्त्रीकडे मन मोकळं करेल पण प्रवासातल्या थोडक्या ओळखीवर एवढं मोठं सिक्रेट एक मुलगी एका अनोळखी मुलाकडे नक्कीच बोलणार नाही >>> +१

सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार.

मी माझ्या कथेचे कुठल्याही पद्धतीने लंगडे समर्थन करणार नाही. कथेत अनेक तांत्रिक दोष आढळतात. जसेकी समीर ची शिक्षा, काही मिनिटांच्या ओळखीत एका मुलीने आपल्या जीवनातील इतकी खाजगी गोष्ट सांगणे, आणि शेवटी कथेच्या नायकाने तिचे समर्थन करणे. या गोष्टी कुणालाही न पटण्या सारख्याच आहेत. आपणा सर्वांच्या सूचना मला आयुष्यभर प्रेरणा देत राहतील . आपण दिलेल्या प्रतिसादामुळे स्वतःतील दोष समजण्यास खूप मदत झाली त्या बद्दल आपले मनापासून आभार.

हलकं फुलकं आणि रोजच्या जीवनातील कथा मला लिहायला आवडतात. त्या लिहीत असताना आपल्या सूचना मी कायम लक्षात ठेवेल. आपण सर्वांनी कथा वाचली त्या बद्दल आपले मनस्वी आभार...

<<<शिक्षा भोगून आलेला समीर आयुष्यातून कायमचा उठलेला असेल. मेलं कोंबडं आगीला भीत नाही त्याप्रमाणे प्रेम आणि प्रतिष्ठा गमावलेला आणि तुरुंगवासाची सवय झालेला समीर मात्र तिचा आणि तिच्या घरच्यांचा खून करु शकेल.>>>

यावर मात्र लिहूशी वाटत, मला नाही वाटत कि समीर इतकं टोकाचं पाऊल उचलेल. समीरला शिक्षा होते तेव्हाही त्याच्या डोळ्यात नायिके विषयी प्रेमच असत . आणि खर प्रेम करणारी कुठलीही व्यक्ती आपल्या प्रेमाचा खून करूच शकत नाही. त्यामुळे सन्मान पूर्वक बिपनजी आपला हा मुद्धा खोडून काढत आहे. बाकी आपल्या इतर मुद्यांना मी आयुष्यभर लक्षात ठेऊन लिहीत राहील.

मिराजी, अग्निपंख , सस्मित आणि VB आपलंही धन्यवाद.

एवढ्या सगळ्यात सकारात्मक कॉमेंट करणाऱ्या सर्वांचे मनस्वी आभार.

कथेतील तांत्रिक मुद्धे बाजूला ठेऊन कथेच्या मूळ भावनेवर सूचना आल्या तर त्या अधिक आवडतील.

उदा . समीरचे प्रेम, नायिका बरोबर कि चूक, सोनोपंतांचे कॅरॅक्टर.

धन्यवाद ........!!!!

न्यू एडमिशनची शाळा घेणे सुरु झाले Light 1

Submitted by डूडायडू on 12 November, 2018 - 15:53 >>>. ओ डुडायडु, अहो कधीतरी सकारात्मक विचार करा जरा. ईथे जे निगेटिव्ह प्रतिसाद आहेत ते फक्त कथेसाठीच आहेत . मलातरी कुणाचाच शाळा घेण्याचा सुर वाटला नाही. अन प्रत्येकाने मांडलेले मुद्दे काही चुकीचे नाहियेत ना , मग

असो

ऊलट लेखकाचे कौतुक वाटते, कारण त्यांनी किमान ज्या चुका ईतरांना दिसल्या , त्या निदान मान्य तरी केल्या

ऊलट लेखकाचे कौतुक वाटते, कारण त्यांनी किमान ज्या चुका ईतरांना दिसल्या , त्या निदान मान्य तरी केल्या। >>>> अगदी खरं. कौतुक आहे फीडबॅक सकारात्मकरीत्या घेतल्याचं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

हलकं फुलकं आणि रोजच्या जीवनातील कथा मला लिहायला आवडतात. त्या लिहीत असताना आपल्या सूचना मी कायम लक्षात ठेवेल. >>>
येस दॅटस द स्पिरिट, पुढचि कथा येउद्या लवकर आणी खात्री आहे की ती चांगली असणार..

{{{ यावर मात्र लिहूशी वाटत, मला नाही वाटत कि समीर इतकं टोकाचं पाऊल उचलेल. समीरला शिक्षा होते तेव्हाही त्याच्या डोळ्यात नायिके विषयी प्रेमच असत . आणि खर प्रेम करणारी कुठलीही व्यक्ती आपल्या प्रेमाचा खून करूच शकत नाही. त्यामुळे सन्मान पूर्वक बिपनजी आपला हा मुद्धा खोडून काढत आहे. }}}

कथेचा नायक तुम्ही रंगवता तेव्हा तो पूर्ण कथाभर एकसारख्याच स्वभावाचा असतो / असू शकतो. प्रत्यक्षात माणूस विशीनंतर त्याचे एक व्यक्तिमत्त्व आकाराला आल्यावरदेखील पुढे काही वर्षांत त्याला आलेल्या अनुभवांनी बराच बदलतो / बदलू शकतो. अश्रूंची झाली फुले नाटकावर पुढे मशाल नावाचा सिनेमा बनला तो पाहिलाय का? सत्यवादी दिलीपकुमार त्याची प्रामाणिकपणाची फार मोठी किंमत चुकवितो. दारुच्या भट्ट्या, जुगाराचे अड्डे चालविणार्‍या अमरीश पुरी विरोधात वर्तमानपत्रातून आवाज उठविल्याबद्दल त्याचे वर्तमानपत्र बंद पडते. राहत्या जागेतून त्याला हाकलले जाते. रात्री उशिरा रस्त्यावर तब्येत ढासळलेल्या त्याच्या पत्नीला तो इस्पितळात नेऊ शकत नाही. त्यानंतर तो पुढे जे काही म्हणतो ते सिनेमात नक्की पाहा / ऐका - तो म्हणतो आजवर या शहरात चालत असलेले जुगाराचे अड्डे ह्या दारुभट्ट्या उद्यापासूनही तशाच चालतील पण फरक इतकाच असेल की त्या अमरीश पुरीच्या नसतील तर माझ्या असतील. पन्नाशी ओलांडलेल्या एका तत्वनिष्ठ संपादकाचा एका रात्रीत एक सराईत गुन्हेगार बनतो.

तुमच्या कथेचा नायक समीर तर तरुण आहे. सात वर्षे (किंवा तुमच्या कथेप्रमाणे ३० वर्षे) तुरुंगात क्रूर कैद्यांबरोबर घालविल्याने आणि तुरुंगातुन सुटल्यावर कपाळावर बलात्कार्‍याचा शिक्का बसल्याने कोणी नोकरी / लग्नाकरिता मुलगी न दिल्याने, आईबापांनी घरात न घेतल्याने / मधल्या काळात सामाजिक उपेक्षा अप्रतिष्ठा यामुळे आईवडिलांचे काही बरेवाईट झाल्याने समीर पूर्वीइतकाच मृदू स्वभावाचा राहील काय?

>>>>सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार.

मी माझ्या कथेचे कुठल्याही पद्धतीने लंगडे समर्थन करणार नाही. कथेत अनेक तांत्रिक दोष आढळतात. जसेकी समीर ची शिक्षा, काही मिनिटांच्या ओळखीत एका मुलीने आपल्या जीवनातील इतकी खाजगी गोष्ट सांगणे, आणि शेवटी कथेच्या नायकाने तिचे समर्थन करणे. या गोष्टी कुणालाही न पटण्या सारख्याच आहेत. आपणा सर्वांच्या सूचना मला आयुष्यभर प्रेरणा देत राहतील . आपण दिलेल्या प्रतिसादामुळे स्वतःतील दोष समजण्यास खूप मदत झाली त्या बद्दल आपले मनापासून आभार.>>>>>
@ शुभम सोनवणे.....प्रथम तुम्ही कथा लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन...नवीन लेखन करताना चुका होतात पण प्रयत्न करणे महत्त्वाचे...तुम्ही सर्वांच्या प्रतिक्रिया सकारात्मक रीतीने घेतल्यात आणि पुढे चुका सुधारून चांगले लेखन करणार हे पाहून आनंद झाला...येवू द्या पुढं च्या कथा.....पू ले शु

शुभम , कथा वरती दोघा तिघांनी लिहिल्यासारखी - पटलीही नाही आणि आवडली ही नाही पण तुमचा हा जो आटिट्युड आहे ना प्रतिसदांकडे बघायचा, तो तुम्हाला एक दिवस फार मोठं करुन सोडेल Happy शुभेच्छा!

हीच कथा वर्षानु वर्ष एकाच ऑफिसमधे काम करणार्‍या पण वेगळ्या डिपार्ट्मेंट मधे असणार्‍या २ व्यक्तींबद्दल लिहिली, ज्यात ते ट्रिप ला गेलेत आणि चुकुन रात्री चांदण्या रात्री शेजारी बसुन गप्पा मारतायेत टाईप्स वातावरण आहे असे काही बदल झाले तर (म्हणजे हेच नाही, अशा अर्थाचे) अनेकांना आवडू शकते.

कथेतल्या तांत्रिक गोष्टीच वातावरण निर्मितीला हातभार लावतात, वातावरण निर्मिती झाली की कथा डोळ्यासमोर येते आणि मग त्यात इंटरेस्ट येतो.

बिपिनजींच्या दोन्ही पोस्ट्स चांगल्या ( कथेला खरंच सुधारण्यात मदत करणार्‍या)

तुमची लिखाणाची शैली छान आहे, सतत लिहित आणि वाचत राहिलात तर दर्जा खुप सुधारेल ( हे मी तुम्हालाच नाही स्वतःला पण सांगतेय)

रियाजी आणि उमानु आपले मनःपूर्वक आभार. आपल्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. बिपिन सरांचेही आभार.. सर तुम्ही सांगितलेल्या आणी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार मी माझ्या पुढील कथांत आवश्यक ते बदल केलेले आहेत. तुम्हा सर्वां मुळे कथेतील चुका शोधण्याची दृष्टी मला मिळाली. मीच माझ्या कथा पुन्हा पुन्हा वाचल्या आणि त्यात बदल केले. आपले आणि पर्यायाने मायबोलीचेही या निमित्ताने मी आभार मानतो . मायबोलीचं हे व्यासपीठ नवोदित लेखक आणि कवी घडवण्याचं व्यासपीठ आहे असं मी मानतो. त्याबद्दल मायबोलीला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत.

कथेचा मूळ गाभा कितीही चांगला असला तरीही कथेतील वातावरण निर्मिती साठी कथेच्या तांत्रिक बाबींकडेही बारकाईने लक्ष द्यावे लागते हे मला यानिमित्ताने समजून आले.

हि शिकवण लक्षात ठेवून लवकरच माझी नवीन कथाही आपल्या समोर परीक्षणासाठी ठेवेल . त्याही कथेचं असच विश्लेषण करून मला सुधारण्याची संधी द्यावी हीच नम्र विनंती...

खूप खूप धन्यवाद...

धन्यवाद रीया.

कथेत सुधारणा वगैरें असं काही डोक्यात आलं नव्हतं फक्त चूक दाखविली होती पण आता तुम्ही सुधारणेचा विषय काढलाच आहे तर एक सुचविता येईल.

बसमधल्या सहप्रवाशाशी बोलल्यावर नायिका आपलं मत बदलते आणि पुन्हा न्यायालयात जाऊन खरी जबानी देण्याचा विचार करते जेणेकरुन समीरची निर्दोष मुक्तता होऊ शकेल असा एक शेवट सुचवितो. मौन सोडा (चूप्पी तोडो) असा सकारात्मक संदेश देखील देता येईल.

तुमचा हा जो आटिट्युड आहे ना प्रतिसदांकडे बघायचा, तो तुम्हाला एक दिवस फार मोठं करुन सोडेल Happy शुभेच्छा! >>>

अनुमोदन

पुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत

बसमधल्या सहप्रवाशाशी बोलल्यावर नायिका आपलं मत बदलते आणि पुन्हा न्यायालयात जाऊन खरी जबानी देण्याचा विचार करते जेणेकरुन समीरची निर्दोष मुक्तता होऊ शकेल असा एक शेवट सुचवितो. >
>>>>
हे नाही पटलं मला.. कथेचा शेवट काय असावा हे पूर्णपणे लेखकाचं मत असायला हवं (मी फक्त थिंकिंग लाऊड करतेय) प्रत्येक कथेचा शेवट चांगला हवा, त्यातून काही संदेश जायलाच हवा असं नाही आजिबात.
ही कथा मला वातावरण निर्मिती मध्ये फेल गेली असं वाटतंय, लेखकाने रिराईट करायची ठरवली तर कथेचा गाभा बदललाच पाहिजे असं मुळीच नाहीये.
उलट तुम्ही म्हणताय तो शेवट एकदम टिपिकल फिल्मी वाटून लोकांना बोअर झालं असं ही होऊ शकतं,

मला मान्य आहे की जगातल्या एकूण एका व्यक्तीला आवडेल असं साहित्य निर्मिली जाणं अशक्य आहे म्हणूनच ज्याला जर सुचतं त्याने ते लिहावं(कथेचा गाभा किंवा सार)

रियाजी धन्यवाद,

मी ही माझ्या कथेच्या मूळ गाभ्यात बदल करणार नाही.
कथेत तांत्रिक दोष आहेत ते मी मान्य ही केलेले आहेत त्यात बदल होऊ शकतो. आणि तो बदल मी करणार ही आहे.
आपली वाचन साथ अशीच राहुद्या