प्रेम

Submitted by Dev13 on 24 September, 2018 - 07:48

हवं हवं वाटणार प्रेम कधी कधी नको वाटते
इतरांच्या डोळ्यातले पाणी पाहून आपल्या ही डोळ्यात पाणी दाटते
प्रेमासाठी वाटेल ते करणारी couple पाहिली
प्रेमासाठी जीव देणारी नि जीव घेणारी ही पाहिली
व्यक्ती प्रेम आयुष्यभर करण्याचं वचन देते
खूप प्रेम करणारी व्यक्ती
तीच व्यक्ती काही काळानंतर अर्ध्यावर सोडून निघून जाते
काहींची परिस्थिती काहींची जात~पात
आडवी येते
प्रेमाची दोरी मध्येच तोडली जाते
जी व्यक्ती सावरते
दुःखाला आवरते
ती सुखी राहते
पन जी सावरू शकत नाही
स्वतःला आवरू शकत नाही
ती मात्र जीवाशी मुकते
आणि जी जिवंत राहते
ती जिवंत असूनही मेल्यात जमा असते
म्हणून वाटतं नको प्रेम आयुष्यात
जे रडवणार असेल
जीवाशी खेळणार असेल
जर असेलच प्रेम आयुष्यात तर आयुष्याच्या
शेवटपर्यंत असावं
नाहीतर प्रेम हे आयुष्यात च नसावं...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users