जेडन के स्मिथ (टुकिक)

Submitted by किरणुद्दीन on 18 September, 2018 - 08:49

( अर्पणपत्रिका - स्टोनवादी असंख्य ट्रोल्सना अर्पण )

जेडन के स्मिथ (टुण्णा किरणुद्दीनच्या कथा )
================================

टुन्ना किरणुद्दीन घरातली चेपलेली भांडी (कशी ते विचारू नये ) नीट करण्यासाठी पत्ता शोधत असताना वाकडेवाडी येथे रस्त्याच्या कडेला भाता असलेली एक कोळशाची भट्टी दिसली.

भांडी ठीक करून मिळतील का असे विचारताच त्या लोहाराने आपला भाता सुरू केला. हवा घालून भट्टी चांगली रसरशीत पेटवली. मग त्यात भांडी लालबुंद होईपर्यंत तापवली. लाल तापवलेल्या भांड्यांवर त्याने सपाट लोखंडी पत्रे ठेवून वरून घणाचे घाव घालताच भांड्यांना नवे रूप मिळाले. पैसे अगदी बेताचेच झाले.

टुन्नाच्या डोक्यात मग एक कल्पना चमकली. त्याने कारागिराचे नाव विचारले. जाधवराव लोहार हे त्याचे नाव. फोन बिन काही नाही. टुन्नाने त्याला एक मोबाईल घेऊन दिला. कसा वापरायचा ते शिकवलं. मग त्याने सोसायटीत आपले भांडे दाखवले. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर भांड्याचे पूर्वी आणि आत्ता असे फोटो टाकले.

झालं. त्याच्याकडे भांड्यांची रीघ लागली.
टुन्नाने जाधवरावला फोन केला.
"काम पाहीजे का ?"
जाधवराव खूष झाला. दर कमी केले.
अशा रितीने टुन्नाने लोकांची भांडी चमकवण्याचा उद्योग सुरू केला. मधल्या मधे त्याला भरपूर कमाई होऊ लागली.
दिवसेंदिवस त्याचा धंदा इतका वाढू लागला की त्याने डेक्कन जिमखाना येथे एक राजवाडा बांधला. त्यात रंगमहाल, जलमहाल, नृत्यमहाल, जलतरण तलाव, दरबार महाल, मुदपाकखाना, गाड्यांची पागा अशा सोयी करून घेतल्याच. शिवाय मयसभा ही बनवून घेतली.

राजवाडा बांधून झाल्यावर त्यातल्या छोट्या खोल्या त्याने फॅमिलीवाल्यांना भाड्याने दिल्या. तर मोठे महाल कॉर्पोरेट्स ऑफीसेस साठी भाड्याने दिले. सर्वात वर छताला लागून एक दहा बाय दहाची खोली होती तीत त्याने आपला संसार थाटला.

आता धंदा चौफेर वाढू लागल्याने त्याने शेअरबाजारात गुंतवणूक सुरू केली. रोल्सरॉईस कार सोबतच लॅंबर्गिनी, बुगाटी वेरॉन अशा एक से एक कार्सचा ताफा त्याच्याकडे दिसू लागला. नोकरांसाठी त्याने होंडा सिटी, स्कोडा, फोक्सवॅगन अशा कार्स घेतल्या.

आपल्याकडे स्कूटीवर येणारा टुन्ना रोल्सरॉईस मधे कसा काय येऊ लागला हे जाधवराव च्या काही लक्षात येईना. पण त्याची बायको जितकी दिसायला तरतरीत होती त्याच्या दसपट ती हुषार होती. तिने ताडलं की हे वैभव आपल्याच जोरावर आहे ते.

तिने मग शेजारच्या किराणा दुकानातल्या मारवाड्याला मार्केटिंगबद्दल विचारलं. मारवाडी खूष झाला.
त्यालाही मधल्या मधे नफा मिळू लागला. मग तिने काही तरूण मुले कामाला ठेवली.
ही मुलं काम चालू असताना उगीचच झोपडीभोवती घुटमळत असत. ही मुले फेसबुकवर सक्रीय असून मध्यंतरी त्यांची वाचा गेली असताना मोर्चे काढून फेसबुकवर वाह्यात लिखाण करत असत.

त्यांचा म्होरक्या गल्लीतल्या मुतारीच्या गुंड मालकाचा चेला असून त्याच्याच कृपेने मुतारीच्या शेजारील अरुंद बोळातल्या एका शाळेत मुख्याध्यापक होता. त्याच्याकडे येणारी मुले आधी डांबरट होती की शाळेत आल्याने वाया गेली हे नक्की सांगता येत नसे.

या म्होरक्याने टुन्नावर डूख धरला होता. त्याला जळी स्थळी काष्ठी लोहाराची तरतरीत बायको दिसत असे.
टुन्नाचे वारंवार येणे तिच्यासाठीच आहे असा ग्रह त्याने करून घेतला होता. टुन्ना स्कूटीवरून रोल्सरॉईस मधे येऊ लागला हे त्याच्या माठ डोक्यात काही आले नाही.
पण लोहारणीच्याच बोलण्यातून त्याच्या दहा दहा वाजलेल्या डोस्क्यात प्रकाश पडला. त्याच्या चेह-यावर बारा वाजले. दहा वाजताची बाराची माणसं दुस-याला फायदा झाला की अस्वस्थ होत. त्याचा धंदा कसा बंद करता येईल याचा त्याने विचार केला.

मग ही चौकडी एका हुषार कासकराच्या पावरबाज मित्राकडे गेली. तो मित्र म्हणजे मुतारीच्या मालकाचा सख्खा चुलता होता. त्याने सगळं ऐकून घेतलं. यांच्या पोटातली मळमळ त्यास स्वानुभवाने कळाली. पोरं आपलीच आहेत, मदत केली पाहीजे म्हणून त्याने त्यांच्या कानात युक्ती सांगितली...

त्यानंतर..

लोहाराच्या झोपडीचा कायापालट होऊ लागला. लोहाराला (बाहेरील तज्ञांकडून) इंग्लीशचे शिक्षण देण्यात येऊ लागले. पती पत्नीला संगणक व नेटसाक्षर बनवण्यात येऊ लागले.

जाधवरावने मग नेटवर धंदा नेण्य़ाच्या दृष्टीने फेसबुकचा उपयोग करून घेण्याचे ठरवले. पण त्याच्या बायकोस त्याचे नाव काही आवडले नाही.....

आणि सर्वांना मग सर्वांना जेडन के स्मिथ या नावाने फ्रेण्ड रिक्वेस्ट येऊ लागली. मुतारी गॅंग फार खुषीत होती. पण...

अचानक जय संतोषी मा प्रमाणे सर्वांना जेडन के स्मिथ बद्दल सावधानतेचा इशारा येऊ लागला. हा मेसेज सर्वांना पाठवायचा होता. ५००० वाले हैरान झाले........

हे काम टुन्नाचेच किंवा कसे याचा शोध अद्याप दहा दहा वाल्यांना लागलेला नाही. ती ग्यांग नेहमीप्रमाणे खजील झाली हे सांगायला हवे का ?

#टुन्ना_किरणुद्दीनच्या_कथा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा !!
उदंड प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

तुमच्या डिपी तील गाढव ही प्रचंड कन्फ्यूज दिसते आहे. तसेच बाकीच्यांच्या बाबतीत घडले असावे.
हेच कारण असावे कदाचित या धाग्याला एवढा उदंड प्रतीसाद मिळण्यामागे.
असो मी हा धागा मिसला होता. छान उपहासात्मक लिखाण. पुलेशु

Lol

पाफा Lol
कोमल १२३४५६ , डॉ मनाली आभार आपले. उशीराने आभार मानतोय. पण क्षमा असावी...