एक ओझं, माझं कि तुझं

Submitted by सिद्धेश्वर विला... on 17 September, 2018 - 06:03

आज थोडं थकल्यासारखं वाटतंय

एक ओझं, माझं कि तुझं

तो वरचाच जाणे

माझ्याच खांद्यावर आल्यासारखं वाटतंय

ते पाप होतं कि पुण्य होतं

तेपण तोच जाणे

पण त्या श्रापांच्या दग्धअग्नीत

मलाच जळाल्यासारखं वाटतंय

बोलतोय मी , पाहतोय मी

आजूबाजूला घडणारे सारे

ओळखतोय मी ते बदल कालानुरूप होणारे

करतोय मीमांसा मी माझ्याच अस्तित्वाची

बोट दाखवूनही पलीकडं ,

सारं माझ्याकडेच आल्यासारखं वाटतंय

मी थकलोय, तरीही उठतो अन अखंड शोधतो मलाच स्वतःला

शोध घेऊनही सापडत नाही

आत खोलवर कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय

आठवणींची मशाल पेटवूनही काहीच आठवत नाही

वणव्यात सारं काही जळाल्यासारखं वाटतंय

फक्त हे शरीर उभे नावाला

बाकी सारं काही संपल्यासारखं वाटतंय

आज थोडं थकल्यासारखं वाटतंय ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

Group content visibility: 
Use group defaults

=)) मी आराम करतो , ठीक आहे . मग बाकीच्यांना काय लांब करायला सांगताय ? ह्ही ह्ही ह्ही ह्ही