मायबोली गणेशोत्सव २०१८ - व्यक्तिचित्रण (स्पर्धा)

Submitted by संयोजक on 5 September, 2018 - 23:57

IMG_20180906_170132_665.jpg
कोणत्याही कलेचा प्रामाणिक हेतू हा माणसाचे जीवन आनंदी बनवणे, आयुष्याच्या प्रवासातील दुःख हलके करून त्याची उर्जा टिकवून ठेवणे हेच असतं. पु. ल. देशपांडे यांनीही त्यांच्या असंख्य कलेच्या माध्यमातून हेच केले. जीवनात रंगत आणली, जगण्याची उर्मी दिली. पुलं यांच प्रत्यक्ष दर्शन २१ व्या शतकात जन्मलेल्या कोणाला झालेलं नसलं तरी ते आपल्याला त्यांच्या अष्टपैलू कलाकृतीतून अप्रत्यक्ष भेटतच आले आहेत. मग ते साहित्यातले पुलं असो वा संगीतकार, गायक, नाटककार, कथाकथनकार, कुशल नट, समाजसेवक, दानशूर व्यक्ती ह्या आणि अश्या अनेक रुपात ते आपल्याला अजूनही भेटत असतात. अजुनही कंटाळा आला की कित्येकांचं मन पुलं यांच्या विश्वात जातं, कधी ते बटाट्याची चाळीमध्ये रमते तर कधी व्यक्ती आणि वल्ली मधील पात्रं सोबत करतात, असा मी असा मी करत गणगोत गोळा करावासा वाटतो.

पु.ल. देशपांडे यांना जसा सखाराम गटणे भेटला, अंतुबरवा भेटला, रावसाहेब भेटले तश्याच काही वल्ली तुम्हाला तुमच्या आयुष्यात भेटल्या असतीलच. मग तो मित्र/मैत्रीण असू शकतो, वाटाड्या किंवा कोणीही ज्यांच्याबद्दल खूप काही लिहण्यासारखं आहे. अश्याच तुम्हाला भेटलेल्या वल्लींबद्दल तुम्हाला लिहायचंय.
नियम
१. कोणत्याही विषयाचे बंधन नाही.
२. एका प्रवेशिकेमध्ये एकाच व्यक्ती वरलेख असावा.
३. लेखाला शब्दमर्यादा नाही.
४. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता १३ सप्टेंबर २०१८ ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
५. 'मायबोली गणेशोत्सव २०१८' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
६. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१८ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
७. प्रवेशिका देण्यासाठी गणेशोत्सव - २०१८ ह्या ग्रुपचे सदस्यत्त्व घेऊन, त्यात 'लेखनाचा धागा' काढावा. धाग्याचे शीर्षक <<<स्पर्धेचे नाव>>> - <<< आयडी >>>> ह्या प्रमाणे द्यावे.
८. एका आयडीने कितीही प्रवेशिका देता येतील.
९. प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, १३ सप्टेंबर २०१८ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, २३ सप्टेंबर २०१८ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
१०. स्पर्धेचा निकाल मतदान पद्धतीने काढला जाईल.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा वर आणण्यासाठी !
कोणी पाहिलं आहे की नाही हे ?
"माझ्यासाठी नवीन " मध्ये गणेशोत्सवाचे धागे दिसत नाहीत. त्यासाठी मायबोलीवर नवीन उघडावे लागतेय. त्याचा एखाद वेळेस कंटाळा होत असेल. गणेशोत्सवाचे धागे सगळयांना by default दिसतील अस काही करता येईल का ?