अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - रंगेबिरंगी बुटपॉलिश "शिंकलास्की पॉलिश"

Submitted by मामी on 2 September, 2017 - 04:12

सेल्ले लॉट्टे, सेल्ले लॉट्टे !!!!!!

बारतामदे पहिल्यांदा च - दुनिया मधे बोलाबाला जालेलं पोलिश शास्त्रज्ञांनी शोधलेलं आफ्रिकेत ल्या रंग बदलत्या सरड्यापासून बनलेल बुट पॉलिश! "शिंकलास्की पॉलिश" - एक डब्बा उघडा अन तुमचे रंगबिरंगी बुट चमकवा.

आफ्रिकेतल्या दाट जंगलातल्या सिर्फ वांटू बगांटू भागात सापडणार्‍या रंग बदलणार्‍या कॅमेलिओना शिंकलास्कीअस (शास्त्रीय नाम) या दुर्मिळ जातीच्या सरड्याच्या शिंकेपासून बनवलेलं हे पॉलिश, तुमच्या रंगिबेरंगी आणि कोणत्याही कोणत्याही रंगाच्या बुटांना नविन चमक आणि किस्मत देणार. काळ्या रंगाचे पॉलिश, कर्णार रंगित बुटांची मालिश.

एक वैधानिक चेतावनी : डब्बा हलूच उघडा. पॉलिशचा रंग देखून घाबरू नका. काळा रंग असला तरी बुटांअना लावले के बाद तो रंग बदलून बुटांचेच रंग धारण करणार. शिंकलास्की वापरा आणि डोळ्यापुढे काजवे चमकवा.

आमची खास स्कीम : फक्त पहिल्या काही नसिबवान ग्राहकांपुरती सीमित. रेग्युलर पॉलिशबरोबर गोल्डन पॉलिश डबिया फ्री!!!!!!

या डिबियात आहे तुमच्या बुटांना गोल्डन करणारं पॉलिश. हे पॉलिश बनलंय या सरड्याच्या मादीपासून. सरड्याची मादी गर्भार असताना अफ्रिकेतल्या प्रखर उन्हामुळे तिच्या अंगातल्या केमिकलचे गोल्डन रंगात रुपांतर होते. त्यावेळी ती शिंकली तर त्यापासून हे दुर्मिळ गोल्डन पॉलिश बनते.

जगातल्या सगळ्या पदार्थापेक्षाही महाग असलेलं हे पॉलिश, केवळ ग्राहकांच्या फायद्यासाठी आमची कंपनी तोटा सोसून आपल्याकरता घेऊन आली आहे. काळं पॉलिश डबा मूळ किंमत रु. १०,००० आता केवळ १९९९.९९ रु.त मिळणार. गोल्डन पॉलिश मूळ किंमत रु. २०,००० आता
रु. २५६७.४८ मध्ये. काळ्या पॉलिशची मागणी नोंदवणार्‍या पहिल्या काही ग्राहकांना गोल्डन पॉलिश फ्री मिळणार.

अधिक माहिती साठी इमेल पाठवा. आणि सोबत आपले बँक अकाउंड डिटेल पिन नंबर सहीत द्या. त्वरा करा. स्टॉक संपत आला आहे.
इमेल : शिंकलातोगंडला४२०@येडाबनाकेपेडा.कॉम

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>कॅमेलिओना शिंकलास्कीअस (शास्त्रीय नाम) या दुर्मिळ जातीच्या सरड्याच्या शिंकेपासून बनवलेलं हे पॉलिश,
भारीच कल्पना आहे..! Happy

जबरी...