या रवीवारी घरी साबांच्या काही जुन्या मित्रमैत्रीणींचे गटग ठरले आहे.
ज्यांना साबांनीच कित्येक वर्षे पाहिलेले नाहीये.
सुरुवातीला १० मग १३ मग १७ असा आकडा वाढत चालला आहे.
आधी आम्ही पर्सनलाईझ्ड गिफ्ट्सचा विचार करत होतो.
पण आता नक्की कोण येणार आहे नी कोण नाही हे ठरत नाहीये सो तो ऑप्शन बाद.
त्यामुळे आम्ही ठोक वस्तु देणार आहोत ज्या कोणालाही (इर्रिस्पेक्टेव्ह ऑफ नेम अँड जेंडर) देता येतील.
जास्त संख्येने आणून ठेवणार आहोत जेणेकरुन वस्तु उरल्या तरी इतर कोणाला देता येतील गिफ्ट म्हणून.
शिवाय रवीवारला आता फार शिंग न राहिल्याने घरी कोणाला काही हँडमेड वस्तु बनवणे शक्य नाहीये.
मागे इथे वास्तुशांतीला काय गिफ्ट द्यावे असा धागा वाचल्याचे आठवतेय पण तो सापडत नाहीये.
सो खालील माहितीच्या आधारे गिफ्ट सुचवा.
१. बजेटः रु. ५० ते ६० प्रत्येकी
२. संख्या: १७ ते २५
३. ठिकाणः पुणे (म्हणजे पुण्यातच मिळेल अशी वस्तु सुचवा).
४. वयोगटः ४५ ते ५० (म्हणजे खुप म्हातारे पण नाहीत पण अगदीच तरुण पण नाहीत).
५. कोलाज करायला जुने फोटो वै. उपलब्ध नाहीत.
माहिती अपडेट करत जाईल जसजसे लागेल तसे.
बजेट विचारात घेता ज्यूटच्या
बजेट विचारात घेता ज्यूटच्या बॅग्ज, चांगल्या प्रतीचे रुमाल ,मोठे मग्ज सध्या तरी एवढंच सुचतंय.
छोट्या पर्सेस. बटवे.
हाच धागा काल आला असता तर!
हाच धागा काल आला असता तर!
(जिज्ञासा मतीमंद शाळेतील मुलामुलींनी बनवलेल्या चाळीस, चाळीस रुपयांच्या सुगंधी मेणबत्त्या होत्या. पाहुण्यांनाही सांगता आले असते की अश्या मुलांनी बनवलेली उत्पादने आहेत ही! ही शाळा पुण्याबाहेर आहे. आपण पुण्यातील एखादी अशी शाळा शोधू शकलात तर तेथेही कदाचित असे एखादे उत्पादन मिळू शकेल.)
आणि अर्थातच त्या शाळेलाही मदत होईल
१. व्हाईट मेटलचे अनेक सुंदर
१. व्हाईट मेटलचे अनेक सुंदर प्रकार मिळतात भेटवस्तूंचे. त्यात अगदी सुपारीचे डेकोरेटिव भांडे, छोटा ट्रे, तबक, उदबत्ती घर, निरांजन / दिवा इत्यादींपासून तर्हेतर्हेच्या वस्तू मिळू शकतात. दिसायला व भेट म्हणून द्यायला छान दिसतात, उपयोगी ठरतात.
२. काचेची उपकरणीही छान मिळतात. तीही बघू शकता.
३. कापडी हँडबॅग्ज, फॅन्सी कागदी हँडबॅग्ज, छोट्या पर्सेस (सुट्टी नाणी ठेवतात तशा, बीडवर्क केलेल्या किंवा टिकल्यांच्या / कशीदाकाम केलेल्या)
४. तांब्याची किंवा पंचधातूची वस्तू.
५. सुकामेवा पाकिट
६. अत्तर
७. पुस्तके / पुस्तक.
60 70 रुपायात आज्काल काय येतं
60 70 रुपायात आज्काल काय येतं हो?बजेट वाढवा नाहितर रेप्युटेशन खराब होइल.प्रत्येकी दिडशे करा.
अंधशाळेच्या विद्यार्थिनी अनेक
अंधशाळेच्या विद्यार्थिनी अनेक वस्तू बनवून विकत असतात. जेल मेणबत्त्या, फॅन्सी बॅग्ज वगैरे. बजेटनुसार तेही घेता येईल.
वरचे सर्व पर्याय मस्त आहेत.
वरचे सर्व पर्याय मस्त आहेत. अजून काही
१. वेल्व्हेटची बस्करं (आसनं) रविवारात सत्तरला किंवा साठ ला एक मिळेल. पूजेसाठी, खास जेवणाच्या पंगतीत फार उपयोगी येतात. कितीही असतील तरी फरक पडत नाही.
२. अक्षरधाराच्या प्रदर्शनात एकावर एक पुस्तक मोफत मिळतंय. तेही ट्राय करा. लोकांना चॉईस ठेवा. अत्रे सभागृहात आहे बहुतेक.
३. Travel kit त्यात छोटा साबण, रूमाल, पावडर, अमृतांजन (गिफ्ट पाहिल्यावर पहिला याचाच वापर होऊ नये अशी माफक अपेक्षा :फिदी:) वगैरे बरंच काही ठेवता येईल.
४. विणलेले रूमाल इथे अवल सारखे टाकत असते तसे.
मेणबत्ती हे ऑप्शन चांगले आहे.
मेणबत्ती हे ऑप्शन चांगले आहे.
गुलाब किंवा तत्सम रोप. ५० /
गुलाब किंवा तत्सम रोप. ५० / ६० रु मधे येते.
वेल्वेटच्या बस्करांची आयडीया
वेल्वेटच्या बस्करांची आयडीया मस्त आहे. जोडीसुद्धा देता येईल.
खाद्यपदार्थ, जसे की, मेतकूट /
खाद्यपदार्थ, जसे की, मेतकूट / सुपारीशिवायची सुपारी / मुखवास हेही देता येईल.
मोबाईल ठेवायचे खणाचे किंवा भरजरी शालूच्या पदराच्या डिझाईनचे / बुट्ट्याचे रेशमी बटवे (कदाचित ऑर्डर द्यावी लागेल)
प्रवासी पाऊचेस
बुकमार्क्स्
कॅडबरी / होममेड चॉकलेट्स् (फ्रोझन दिलीत तर जरा कमी वितळतील!
) / फालुदा मिक्स / पदार्थाची रेडी मिक्स पाकिटे - कधीतरी घाई असताना उपयोगी पडू शकतात.
पांढरे शुभ्र, सुती व आकाराने मोठे हातरूमाल.
कित्येक वर्षांनी भेटणा-या
कित्येक वर्षांनी भेटणा-या लोकांच्या गटगला भेटवस्तू ठरवणे हे तितकेसे सोपे नाही. त्यातून बजेट पन्नास साठ असेल तर आव्हानच आहे. अशा गटग ची भेटवस्तू अशी असावी जिच्यामुळे आठवणही राहील, खूप चीप वाटणार नाही, त्यामुळे नेहमीच्या वापराचे दे ण्यात काही अर्थ नाही. एखादं रोपटं दिलं तर त्यामुळे अनेक उद्दीष्टं साध्य होतील असं वाटतं..
२ बीएच्केच्या फ्लॅटमधे त्या
२ बीएच्केच्या फ्लॅटमधे त्या रोपट्याचं काय करणार?
@ इब्लीस राखून ठेवलेली वनं
@ इब्लीस
राखून ठेवलेली वनं असतात. रोप दत्तक घेणा-या संस्था असतात. काही रोपवाटीकां मधून रोपं स्विकारली जातात.. इच्छा तेथे मार्ग.
Can anyone please give me
Can anyone please give me contact details of Mr./ Mrs. Vishal Kulkarni?
I think she sales some silver plated gift articles.
बाळूभौ, देणार्याने स्वस्तात
बाळूभौ,
देणार्याने स्वस्तात 'हिप' दिसेल असं काही 'भेट' द्यायचं अन मग मी हे पुढचं बाळंतपण निस्तरत बसायचं, हा उद्योग कशासाठी?
मला ऑन अॅव्हरेज दर महा २ रोपटी तरी गिफ्ट मिळतात. यातली बरीच बाहेरगावी. गाडीच्या डिकीत ठेवून, दोन दिवस त्यांना पाणी टाकून घरी आणून लावायचा उद्योग सुरुवातीला केला. एका रोपट्यासोबत भलतीच चिकट उधई आली होती, तिच्या पेस्ट कंट्रोलचा खर्चही केला.
आता आयोजकांनाच ती रोपटी, नारळ, बुके परत देतो, अन सांगतो पुढच्या गेस्टसाठी रिसायकल करा. नांव असलेले मेमेंटो फक्त घरी आणतो.
५० रुपयात बसणार्या या गोष्टी
५० रुपयात बसणार्या या गोष्टी सुचताहेतः
१. गुलकंदाची / मोरावळ्याची बरणी
२. अक्षरधारा मध्ये ५० रुपयांना १० बुकमार्क्सचा संच आहे. चांगला आहे.
सहकार नगर भागात एक जण
सहकार नगर भागात एक जण चाफ्याच्या फुलाच्या आकारात अत्तराच्या छोट्या कुप्या बनवुन देतात...ते ही छान वाटेल..आणि जुनी लोक भेटणार आहेत हा संदर्भ लक्षात घेता..
ओह रविवारीच कार्यक्रम आहे
ओह रविवारीच कार्यक्रम आहे का..
मागच्या एका ट्रिपमध्ये ६५ रु
मागच्या एका ट्रिपमध्ये ६५ रु सुंदर कैंडल स्टैंड्स आणल्या होत्या. (सत्यम गिफ्ट मधून) तसेच साधारण याच रेंज मध्ये नंदादीप आणले होते सोबत वातीचा एक गुंडा. डी मार्ट मधून.
एकदा डी मार्ट मध्येच छान पिशव्या पण मिळाल्या होत्या. किमन्त तू दिलेल्या रेंज पेक्षा जास्त होती. प्रत्येक वेळी मी नाशिकच्या hankey कार्नर या दुकातून स्ट्रोल्स/ डोक्याला बांधायचे मोठे रुमाल आणते. शंभर पर्यन्त मिळतात. (तुला ह्या वस्तु आणि ठिकाण उपयोगी नसली तरी फक्त माहिती म्हणून लिहिले आहे)
हो. हल्ली सगळंच फास्ट आहे ना
हो. हल्ली सगळंच फास्ट आहे ना !!
बेफिकीर यांनी सुचवलेली
बेफिकीर यांनी सुचवलेली अंध-अपंग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू हि कल्पना छान आहे.
पण ते शक्य नसल्यास,
चॉकलेट्स ट्राय करा .. गेटटूगेदर चालू असतानाही वाटा आणि घरी न्यायलाही द्या.. या वयात कोणी चॉकलेट्स देणे हे अप्रूप वाटू शकते.. तिथे कोणाशी शेअर न करता अख्खे चॉकलेट खाण्यात मजा वाटू शकते.. घरी न्यायचे चॉकलेट नातवंडाना देऊन त्यांनाही खुश करू शकतो.. आणि ती खुशी बघून आपला आजचा दिवस मजेत गेला हा आनंद द्विगुणित करू शकतो
यावरून आठवले,
त्यांच्या सुनांच्या उपयोगी पडेल अशीही वस्तू देऊ शकता. एखादी फॅशनेबल गोष्ट. त्यांनी स्वतः नाही वापरली आणि आपल्या तरुण सुनेला दिली तर ती खुश .. तुमची एक गिफ्ट सासू-सुनेचे नाते भक्कम करायला मदत करू शकते
४५ ते पन्नास वयोगट ज्ये
४५ ते पन्नास वयोगट ज्ये नागरिक? >>>
दुरुस्ती केली आहे.
वयोगट वाचला नव्हता
टिंगरे नगरला निवांत ही अंध
टिंगरे नगरला निवांत ही अंध मुलांना स्वावलंबी करणारी संस्था आहे. त्यांनी बनवलेली भेटकार्डे, चॉकलेट्स, हॅण्डमेड पेपर्सच्या वस्तू आणि अन्य काही वस्तू आहे पन्नास -साठ रूपयात येऊ शकेल असं. सीनीयर लोक असल्याने आणि अनेक वर्षांनी भेटत असल्याने आधी सुचवलं नव्हतं....
अरोमाथेरपी बाथ किट. किंवा
अरोमाथेरपी बाथ किट. किंवा मेडिटेशन किट. उदबत्त्या, धूपदान, ऑइल व रीड डिफ्युजर,
किंवा बाथ सॉल्ट्स, सोप्स, पण बजेट खूप कमी आहे ह्या साठी. हँड टावेलचे सेट. प्लेस मॅट्स. ( टेबलावर घालण्यासाठी.
छत्री. - पावसाळा येतोच आहे.
ह्या वयाच्या लोकांना वस्तू
ह्या वयाच्या लोकांना वस्तू पेक्षा आठवणीचे जास्त अप्रूप वाटेल. एक तर असा ग्रुप वरचेवर भेटत नाही.( आत्ता कितीही ठरवलं तरी )
भेटवस्त देण्या एवजी ह्याच गेटटूगेदरचे फोटो , काही ग्रुप फोटो आल्याआल्या काढा. जेवण संपेपर्यंत त्याची प्रिंट
आणून एका फ्रेम मध्ये लावून द्या. फोटोफ्रेम तयार ठेवा . एखाद्या टीन एजर कडे हि जबाबदारी सोपवा . जमले तर कोलाज वैगरे करा. नाहीतर एक फ्रेम आणि बाकी साधे फोटो एका पाकिटात टाकून द्या.
टिंगरे नगरला निवांत ही अंध
टिंगरे नगरला निवांत ही अंध मुलांना स्वावलंबी करणारी संस्था आहे. त्यांनी बनवलेली भेटकार्डे, चॉकलेट्स, हॅण्डमेड पेपर्सच्या वस्तू आणि अन्य काही वस्तू आहे >>>>>>>>
हेच लिहिणार होतो.
माझ्या मुलाच्या वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट म्हणून निवांत मधुन आणलेले चॉकलेटचे बॉक्स दिले होते.
पॅकिंग बघुनच वेडे व्हाल ईतके सुंदर असते. चव थोडीफार डार्क चॉकलेट सारखी असते. बाजारात मिळणर्या चॉकलेटस सारखी
अतीगोड नसते.
सर्वाना अतिशय आवडले.
पुस्तक द्यायचे असल्यास
पुस्तक द्यायचे असल्यास चंद्रशेखर गोखले ची मी माझा, पुन्हा मी माझा वगैरे देता येईल. स्वस्त सुंदर टिकाउ.
पतंजली चा फेसवॉश पण चांगला
पतंजली चा फेसवॉश पण चांगला आहे गिफ्ट द्यायला.
पतंजली चा फेसवॉश पण चांगला
पतंजली चा फेसवॉश पण चांगला आहे गिफ्ट द्यायला >
४५ ते ५० ला ज्येष्ठ नागरिक का
४५ ते ५० ला ज्येष्ठ नागरिक का म्हणतायत सगळे???
उद्या रहस्य कळेल, काय भेट
उद्या रहस्य कळेल, काय भेट दिली ते.
४५-५० ला सिनीयर, या वयात असे
४५-५० ला सिनीयर, या वयात असे शब्द वापरलेले पाहून अंमळ मौजच वाटली.
४५-५० चे लोक म्हणजे पेन्शनर्स/ सिनीयर/ ज्ये ना यातले काहीही नाही.
हो ना. 'वह एक अधेड उम्र का
हो ना.
'वह एक अधेड उम्र का आदमी था', असं ज्याला कॉलेज काळातील "उपन्यास"मधे वाचलेलं आठवतंय तो एज ग्रूप आहे तो
बोहरी आलीतून (Can't type L)
बोहरी आलीतून (Can't type L) गणपतीच्या मुर्ती घेतल्या.
काचेच्या केसच्या आत बंदीस्त केलेल्या.
४० रु. ला एक याप्रमाने.
सर्वांचे आभार.
मला सर्वांच्याच कल्पना खुप आवडल्या. परंतु अंतिम निर्णय साबांचा होता.
>>>परंतु अंतिम निर्णय साबांचा
>>>परंतु अंतिम निर्णय साबांचा होता.<<<
हे लेखातील पहिले वाक्य असायला हवे होते.
अनेक लोकांचा वेळ घालवल्याबद्दल तुमच्या साबांना त्या सगळ्या लोकांना आता पन्नास पन्नास रुपयाची गिफ्ट द्यायला सांगा. त्यांना गिफ्ट सुचवू नका. त्यांना त्यांच्या मंडळात कोतबो कोतबो करूदेत.
चान्गली आहे कल्पना!
चान्गली आहे कल्पना! त्यानिमित्ताने चर्चा होवुन कितितरी उपयोगी आयडिया सुचवल्या गेल्या ज्या इतराना उपयोगी येतिल .. मला अत्तराच्या कुपिची आयडिया सगळ्यात आवडली, ..
साबाना एन्जोय करायला शुभेच्छा! इतक्या मैत्रिणी इतक्या दिवसानी भेटणार .. मस्तच!
माझा college friend जो आता
माझा college friend जो आता dentist आहे, त्याच्या स्वतः च्या dental clinic चे येत्या रविवारी (12 Oct) उदघाटन आहे. त्यानिमित्त त्याला काय भेट वस्तू देऊ शकतो? त्याच्या
हे तुम्हाला त्याच्यासोबत
हे तुम्हाला त्याच्यासोबत क्लिनिकमधील त्याच्या पहिल्या दिवशी दातांची तपासणी केल्यास त्याला अधिक आनंद होईल.
कॉलेज फ्रेंड डेंटिस्ट झाला तर
कॉलेज फ्रेंड डेंटिस्ट झाला तर आता तुम्ही काय झाला आहात?

सॉरी पर्सनल प्रश्न आहे .. उत्तर नाही दिले तरी चालेल.. एक कुतूहलाचा किडा असतो आपल्या अंगात त्याला शांत करायला म्हणून विचारावे वाटले
dental clinic चे उद्घाटन ?
dental clinic चे उद्घाटन ?
मी असा टेबल वास दिला असता 👇
Such fun things become an immediate conversation starter.
फारच मस्त, अनिंद्य!
फारच मस्त, अनिंद्य!

कुठे मिळाला हा ?
मस्त आहे. डेंटिस्टला नव्हे तर
मस्त आहे. डेंटिस्टला नव्हे तर एरवीसुद्धा
एकदम भारी अनिंद्य
एकदम भारी अनिंद्य
नाहीतरी डेंटीस्टकडे 'दाती तृण' धरुन च जायला लागते
फारच सुंदर आणि कल्पक अनिंद्य
फारच सुंदर आणि कल्पक अनिंद्य
डेंटीस्टकडे 'दाती तृण' धरुन …
डेंटीस्टकडे 'दाती तृण' धरुन … 😀
सर्वांना थँक्यू.
छल्ला, सिरेमिकच्या वस्तू विकणाऱ्यांकडे असतात असे काही अतरंगी प्रॉडक्टस.
भेटवस्तूंचे मोल लावू नये, त्या अनमोल असतात. पण साधारण ₹ ५०० च्या आत येईल असा वास. फायबरचा असेल तर त्याहून कमी किंमतीत.
Such fun things become an
Such fun things become an immediate conversation starter.
Submitted by अनिंद्य on 10 October, 2025 - 09:32>>>आयडिया छान आहे अनिंद्य, पण त्या वास मध्ये फुलं/गवत टाकून द्यायच्या ऐवजी एखादं लहानसं निवडुंगाचं रोपटं लावून द्यावं असं वाटतंय....दातांत कॅव्हिटी झाली म्हणजे निवडुंगाचे काटे टोचल्या प्रमाणे वेदना होतात त्याचे रूपक.....
वास... दाती तृण.. निवडुंग
वास... दाती तृण.. निवडुंग
निवडुंगाचं रोपटं
निवडुंगाचं रोपटं 😀
हाहाहा. वास आयडिया भारीच.
हाहाहा.
वास आयडिया भारीच.
Pages