AC कुठला घ्यावा ?

Submitted by तनुदि on 29 March, 2014 - 15:37

२८००० ता ३२००० या कीमतीत कोणता चान्गला A C मिळे ला
वर टेरेस आहे रुम मधे उन असत दुपारी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

AC - this tech s well settled n old now. So quality wise all th knwn brands are at par. Ur concern shud b service n support. Any good store close to ur hm is better

खोलीचे घनफळ किती?

लांबी X रुंदी X उंची = घनफळ हे सूत्र वापरून घनफळ काढा. प्रति १२०० घनफूट १ टन या परिमाणाने वातानुकूलन यंत्राची क्षमता ठरवा आणि त्याप्रमाणे खालीलपैकी एखादे यंत्र खरेदी करा.

http://shopping.indiatimes.com/electronics/split-ac/panasonic-pearl-0-75...

http://shopping.indiatimes.com/electronics/split-ac/videocon-split-air-c...

http://shopping.indiatimes.com/electronics/split-ac/videocon-split-air-c...

http://shopping.indiatimes.com/electronics/split-ac/videocon-split-air-c...

http://shopping.indiatimes.com/electronics/split-ac/videocon-split-air-c...

http://www.shopclues.com/panasonic-cs-cu-uc18pky-2-star-split-ac-en.html

हो. खोली जर १२०० असेल तर १ टन क्षमतेचा एसी चांगला. खोली जर वरच्या मजल्यावर असेल तर हे प्रमाण थोडे वाढवलेले चांगले. आजकाल विंडो एसी शक्यतोवर कोणी वापरत नाही. त्यामुळे स्प्लिट प्रकारचा एसी चांगला. ह्याचा आवाज पण थोडा कमी होतो.

२ वर्षापूर्वी मी LG कंपनीचा एसी घेतला होता, अजूनतरी काही त्रास नाही.

२ वर्षापूर्वी मी LG कंपनीचा एसी घेतला होता, अजूनतरी काही त्रास नाही.>>>> माझाही LG कंपनीचा विंडो एसी आहे.१२ वर्षे उत्तम चालतोय.
स्प्लिट प्रकारचा एसी घ्या .चेतन यांनी सांगितल्याप्रमाणे एसी खरेदी करा.

सध्या बरेच चांगले ब्रॅंड्स मिळत असल्याने, एसीची किंमत, किती वीज जळते, वीजेचा दर, वर्षातून किती तास एसी वापरणार, आणि आपण रहातो तिथे कुठल्या ब्रॅंडची सर्व्हिस चांगली आहे या गोष्टींचा विचार करुन कुठला एसी घ्यावा हे ठरवावे (ब्रॅंड आणि एनर्जी रेटिंग).
ज्या खोलीत एसी आहे त्या खोलीच्या घनफळा सोबत, छतावर उन पडते का, तसेच खोलीच्या पश्चिम अथवा/आणि उत्तर भिंतीवर उन पडते का यावरुन एसीची क्षमता ठरवा.
१२०० घनफूटला १ टन.
छतावर उन पडत असेल तर २०% वाढवा
पश्चिम अथवा/आणि उत्तरेच्या भिंतीवर उन पडत असेल तर २०% वाढवा.

खाली एक लेखाची लिंक आहे, माहिती बद्दल . त्यात क्षमता ठरवण्याचे कॅल्क्युलेटर सुद्धा आहे.

https://www.bijlibachao.com/top-ten-appliances/best-air-conditioner-ac-w...

वर्षातून किती तास एसी वापरणार >>> सध्या हवामानाचा काही अंदाज नाही राहिलाय.

माहितीबद्द्ल धन्यवाद Happy

पण कोणीतरी चांगली कंपनीही सुचवा की हो .. किमान कुठल्या कंपनीच्या वाटेलाही जाऊ नका तेवढेच सांगा ..

In Mumbai, if you have Tata Power connection then they offer 5 star AC's with discounted price.
Free installation.

आय एफ बी ब्रँड कसा आहे?? आफ्टर सेल सर्विस कशीये?काही माहिती???

आय एफ बी चा वॉशिंग मशीन आणी क्लोथ्ज ड्रायर उत्तम काम करतंय.. पण ए सी चा काही अनुभव?

इन्वर्तरने वीज बचत होत नाही. तो चार्ज करण्यासाठी नेहमीची वीज खर्च पडते. फक्त वीज गेल्यावर वापरायला वेज उपलब्ध होते हा त्याचा फायदा आहे. उलट वीज गेल्यावर तुम्ही गप्प बसून राहिले असता तर तेवढी वीज वाचली असती.::फिदी:
हे म्हणजे नळ चालू असताना भांडी भरून ठेवायची आणि नळाचे पाणे गेल्यावर भांड्यातले पाणी वापरायचे अशी 'टेक्नॉलॉजी 'आहे Happy

आम्ही पॅनासॉनिक चा घेतलाय. त्यात आतले पार्ट्स कॉपरचे आहेत. कॉपरचे पार्‍ट्स असलेले एसी घ्यावेत. ते लवकर खराब होत नाहीत. शक्यतो स्प्लिट एसी घ्या.

"खामोश! इन्वर्टरभी बिजली बजाता है!" असं ती मुलगी आता रॉबिनहुडच्या स्वप्नात येऊन म्हणेल की काय ? Wink

इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी एसी हा वेगळा कन्सेप्ट आहे रॉबिनहुड.
त्यामध्ये variable speed control असतो.
म्हणजे कॉम्प्रेसरला फक्त ऑन / ऑफ कंट्रोल नसून, तपमानानुसार कॉम्प्रेसर मोटरचा स्पीड कमी जास्त सुद्धा होतो.
त्यामुळे त्यांचे कन्झम्प्शन तुलनेने कमी असते. आवाजही कमी असतो. त्यामध्ये एक VFD (Vairable Frequency Drive) वापरला असतो, आणि सर्वसामन्यांना कळावे म्हणुन इव्हर्टर टेक्नॉलॉजी ही टर्म वापरली असावी.

त्यांची किंमत जास्त असते.
ही जास्त किंमत विजेच्या बचतीने भरुन निघेल की नाही, हे एसी वर्षातून किती तास वापरात असेल यावर अवलंबून आहे.
मुंबई, चैन्नै सारख्या ठीकाणी तर नक्कीच भरुन निघुन बचत होईल.

मानव पृथ्वीकर | 19 October, 2015 - 10:47 नवीन

इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी एसी हा वेगळा कन्सेप्ट आहे रॉबिनहुड. >>
बरोबर. याच टेक्नॉलॉजीचे फ्रिज सुद्धा येतात ज्याने विजेची बचत होते. पण रॉबिनहुडची पोस्ट सुद्धा टेक्निकली बरोबर आहे ज्यात फक्त 'ईन्व्हर्टर' बद्दल लिहिले आहे.

---
कानडा

एल्जी चा विन्डो एसी बदलून वोल्टास चा स्प्लिट एसी घ्यायचे बहुतेक पक्के केले आहे. वोल्टास चे रिव्ह्युज ऐकायला आवडतील. वोल्टास आणि ब्लु स्टार मधे कोणता जास्त चांगला.

Thanks

मीहि वोल्टास पक्के केले होते पण ओफिस मदील एकाचा अनुभव : ६ महिन्यात गस लीक झाल्याने कूलिन्ग नाहि.एक भान्ड्न झाले तेव्हा रिप्लैस करनार असे सान्गित्ले आहे. अजुन रिप्लैस झाला नाहीय.

LG and carrier split AC feedback( in terms of product utility and post installation services) चान्गला आहे.

सर्वच एसीना एक मिनिमम दर्जा असतोच. आपल्या नशीबाने एखादा पीस खट लागतो. आणि दुरुस्त्या आणि तक्रारी यानी जीव रंजीस येतो . बहुतेक एलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा हाच प्रॉब्लेम आहे...

मग यावर एकच उपाय, दसर्‍याचा मुहुर्त बघून एसी घेणे.
आणि मी तेच करायला जात आहे

तरी त्यातल्या त्यात कोणता घेऊ?

हॉस्पिटलात एल.जी, सॅमसंग व ओ'जनराल वापरून झालेत. अनुक्रमे १२, ७ व १८ वर्षे. बरे चालताहेत. सध्या ४ वर्षांपासून लॉइड नामक कंपनीचा ५* एसी माझ्या बेडरूमला वापरात आहे. हा सगळ्यात सुंदर व पॉवरफुल+इकॉनॉमिकल आहे.

दीड वर्षापूर्वी मी यावर बराच रिसर्च करून माझ्या घरी ब्लू स्टार घेतला. माझी फाईंडीग्ज:
१. ए.सी. घेताना इतर गोष्टींबरोबर "आवाजाची पातळी" हा पण महत्वाचा घटक आहे हे लक्षात घ्या. जास्त आवाज करणारे एसी डोकेदुखी ठरतात (आणि बाहेरचे युनिट जास्त आवाज करणारे असेल तर शेजाऱ्यांची डोकेदुखी).
२. सर्वात रेप्युटेड एसी daikin कंपनीचे. पण ते महाग आहेत.
३. शार्प इन्वर्टर एसी मुळे बाह्य युनिट सारखे चालू-बंद होत नाही म्हणून त्याचे आयुष्य वाढते.
४. किंमत, रेप्युटेशन, युजर रेटिंग, आवाज पातळी इत्यादी सगळ्याचा विचार करून मला स्वत:ला ब्लू स्टार बरा वाटला. दीड वर्षात तरी काहीच समस्या नाही.

टीप: एसी कुठलाही असो फिटिंग करताना बाहेरचे आणि आतले युनिट जोडणारी केबल अखंड असण्याचा आग्रह धरा. हे अतिशय महत्वाचे आहे. माझ्या घरी त्याने मध्ये दुसरी केबल जोडली होती (कारण बाहेरचे युनिट थोडे दूर आहे) आणि कालांतराने जोडाच्या ठिकाणी शोर्ट सर्किट होऊन स्फोट झाला होता. हि खूप जास्त करंट वाहून नेणारी केबल असते. तेंव्हा सावधान.

एसी कम्फर्ट साठी घेतला जातो. कम्फर्टची व्याख्या करणे अवघड आहे. पण अमेरिकन हॅण्डबुक ऑफ हेल्थ प्रमाणे बाहेरच्या तापमानात आणि घरात दहा डिग्रीचा फरक असल्यास कम्फर्ट मिळतोच शिवाय थर्मल शॉकच्या शक्यता कमी होतात. विशेषतः कडक उन्हाळ्यात बाहेरचे तापमान ४० च्या वर असताना घरातले तापमान जर २० डिग्रीच्या आत ठेवले तर पुन्हा बाहेर जाताना त्रास होतो. ते घातक सुद्धा आहे. दहा डिग्रीचाच फरक पटत असेल तर वीजेची बचत देखील होते.

स्प्लिट टाईप एसी घ्यायचा असल्यास घरातले युनिट आणि कॉम्प्रेसर यांच्यात उंचीचा फरक किती असायला हवा हे जाणून घ्या. बाहेरचे युनिट तेव्हढ्या उंचीवर ठेवता येत असेल तर तो एसी चांगला चालतो.

ब्रॅण्डच्या बाबतीत उन्नीस बीस आहे. बरेचसे ब्रॅण्ड्स चांगलेच आहेत. व्होल्टास आता टाटाने खरेदी केलेली आहे. लॉईड्स बेस्ट आहे. एलजी सुद्धा चांगली आहे. बाकीच्यांच्या आफ्टर सेल्सची कल्पना नाही.

२०१८ नंतर काही प्रतिसाद नाही इथे.
नवीन घरात एसी घ्यायचे आहेत. दिवाणखान्यात स्प्लिट एसी व शयनगृहात विंडो एसी.
दोन्ही प्रकारांत गुणवत्ता, आफ्टर सेल्स सर्विस व आर्थिक बचत या निकषांवर कुठला ब्रँड चांगला आहे?

ओ जनरल, छान अनुभव आहे आमचा. एकदम स्मूथ हवेचा फ्लो. कळतही नाही एसी चालू आहे, पण वातावरण सुखद होतेय.

. दिवाणखान्यात स्प्लिट एसी व शयनगृहात विंडो एसी>>>

शक्य असल्यास शयनगृहातही स्प्लिट एसी घ्या. थोडा महाग पडेल पण efficiency जास्त असते आणि noise level खूप कमी. कारण त्याचा compressor outdoor unit मध्ये म्हणजे पूर्णपणे बाहेर असतो. विंडो एसी नवीन असताना शांत वाटत असला तरी काही वर्षांनी compressor चा खूप आवाज करतो जो शयनगृहात त्रासदायक वाटू शकतो.

मी एसी वापरत नाही. गरज लागलीच तर कूलर आहे.
पण १५ वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी गरज असल्याने ११ एसी बसवले होते. व्होल्टास, व्हिडीओकॉन आणि फेडर्स लॉईड असे होते. यातले फेडर्स लॉईडचे एसी सर्वात चांगले निघाले. व्होल्टास आणि व्हिडीओकॉनच्या सर्विसला कधी कधी प्रॉब्लेम येतो. जेव्हां बसवले तेव्हां मला फार डोकं खर्च करावे लागले नाही. पण दर उन्हाळ्यात एसीच्या मेन्टेनन्समुळे चांगलेच लक्ष घालावे लागले. आता फेडर्स लॉईड अस्तित्वात आहे कि नाही कल्पना नाही. पण लॉईड आहे. आता ५ स्टार एसी आलेत. त्याने वीजबिल कमी येते.

पोर्टेबल एसीज बाजारात आहेत. मिनी पोर्टेबल पण आले आहेत. त्यांचे रिव्ह्यूज अद्याप उपलब्ध नाहीत. पण आख्खी रूम थंड करण्यापेक्षा आपल्याला थंड वाटेल एव्हढी आजूबाजूची हवा (ब्रीझ) थंड करावी असा हा कन्सेप्ट आहे. याने वीज सुद्धा वाचते. काही वर्षांनी संपूर्ण रूम थंड करण्यासाठी एसी हा प्रकार कायद्याने बाद होईल असे ऐकण्यात आहे (आपल्याकडे नाही). सध्याचे पोर्टेबल एसीज या कन्सेप्टनुसार आहेत कि नाहीत याची कल्पना नाही.

AC घ्यायचा होता तेंव्हा (म्हणजे झाली आता चार वर्षे) नेट वर बराच रिसर्च करून बसलो होती. Daikin आणि BlueStar ह्या दोन कंपन्या AC तंत्रज्ञाना मध्ये आघाडीवर आहेत असे लक्षात आले होते. पैकी मी BlueStar निवडला. अजूनही तो टकाटक आहे. काहीच समस्या नाही. एकदा पॅनल काढून धूळ झटकून सेल्फ सर्विस केली इतकेच.
आवाज न येणे हा एक महत्त्वाचा निकष असतो. त्यामध्ये Daikin बेस्ट आहे असे म्हणतात.

जाता जाता: कोणताही एसी असो. बाहेरचे युनिट आणि आतले युनिट यांना जोडणारी केबल अखंड लावली जाईल हे पहा. माझ्याकडे आलेला टेक्निशियन बेअकली होता. त्याने मला चांगलाच उद्योग लावला. केबल पुरत नव्हती म्हणून सेलोटेप ने जोडून बाहेरच्या युनिट पर्यंत दुसरी केबल लावली. नन्तर एसी मध्येच अचानक बंद पडू लागला. नंतरचे टेक्निशियन येऊन आतला सर्किट बोर्ड बदलून गेले. कशामुळे होतंय काय वगैरे समस्येच्या मुळाशी जाण्याचे आजकाल कोणीही कष्ट घेत नाहीत. पाट्या टाकायच्या बस्स. अखेर मीच शोध घ्यायचे ठरवून निरीक्षण केले असता लक्षात आले की जिथं सेलोटेपने केबलचे जोडकाम केले होते तिथे स्पार्क होऊन एसी बंद पडायचा. अतिशय जास्त विद्युत प्रवाह वाहणारी ही केबल असते. सेलोटेप ने चिकटवू नये. केवळ नशीब चांगले की खिडकीच्या ग्रील मधून तो प्रवाह उतरला नाही!

आवाज न येणारा एसी ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे लेटेस्ट तंत्रज्ञान आहे का हे पहायचे. या एसी मधे रेसीप्रोकेटिंग कम्प्रेसर ऐवजी स्क्रोल कम्प्रेसर असतो. त्याचा आवाज अजिबात येत नाही आणि व्हेरीएबल स्पीड, लोडला तो स्मूथ काम करतो. टीएक्सवी (थर्मोस्टॆटिक एक्स्पान्शन व्हाल्व) मुळे कूलन्टचे पूर्णपणे व्हेपर होते. यामुळे कुलिंग क्षमता वाढते. व्हेरीएबल स्पीड मोटर (इव्हर्टर कंट्रोल) कितीही व्हेरीएबल लोड असला तरी उत्तम काम करतो. हे सगळे पार्टस असलेले एसी सर्वात चांगले.

आमच्या विंडो ए सीने फार त्रास दिला, पाच वर्ष वापरला, खर्च करत. नंतर व्होल्टासचा स्प्लिट ए सी बेडरुम मधे घेतला (१ टन), तो पीस चांगला निघाला त्यानंतर पाच वर्षांनी हॉलमधे व्होल्टास (आता टाटा) स्प्लिट इन्व्हर्टर ए सी (१.५ ट्नचा) बसवला. तीन वर्ष चांगला चालला, नंतर फार त्रास देतोय, सतत बिघाड आणि खर्च.

असा आमचा मिश्र ए सी अनुभव.

हे सर्व ए सी बँक कृपेने मिळाले. मुळ घेताना पैसे बँकेने दिले म्हणून घेतले.

इथे छान माहीती मिळतेय, पुढे ए सी घ्यायच्या वेळी उपयोगी पडेल.

शांमा छान माहिती

बादवे माझी हीच पोस्ट आहे या धाग्यावर पहिल्या पानावर. देवा, चार नाही आठ वर्षे होवून गेली माझ्या AC ला? Lol कुणीतरी थांबवा रे घड्याळाला Proud

मस्तच, चालूदे अजून.

आमच्याकडचा हॉलमध्ये आहे त्याला चार वर्षे झाली. बेडरूममधला स्प्लिट नऊ वर्ष झाली, एकदा 3 हजार खर्च करावा लागला, पण तो साडेसात वर्षानंतर, सर्व्हिसिंग खर्च होतो तोच. एक दोनदा कपॅसिटर बदलावा लागला. तो त्यातल्यात्यात गुणी निघाला.

अतुल धन्यवाद
पहिले पान >> मला एकच पान दिसतेय. त्यात अमित एम यांचा प्रतिसाद सर्वात वर दिसतोय.

आमच्या आधीच्या घरात शयनगृहात वोल्टासचा विंडो एसी बसवला होता २००५ मध्ये. ४ वर्षांपूर्वी एकदा सेंटरला न्यावा लागला..... हीट एक्स्चेंजर नळ्या आतून बाहेरून स्वच्छ केल्यावर पुन्हा काम करायला लागला. बाकी दरवर्षी घरी रेग्युलर सर्विसिंग व्हायचे तेवढेच. अजूनही तो एसी काम करतो आहे.
एसी चा आवाज म्हणाल तर पंख्याच्या आवाजासारखाच वाटला. म्हणजे झोपमोड कधी झाली नाही त्यामुळे.

बाजारात ज्याला नाव आहे तो ब्रँड सोडून वस्तू विकत घेणे असला प्रकार मी करतो .आणि तो निर्णय चुकीचा पण ठरत नाही.
त्या मुळे जास्त सर्च न मारता .गोदरेज चा स्प्लिट एसी आहे.तीन वर्ष झाली .मस्त चालत आहे.अजून तरी त्याची कोणतीच तक्रार नाही.
नेहमी २४ वर च असतो.तेवढे cooling मस्त वाटत.
तो पण २४ वर २४ चाच फील देतो २५ ,२६ च देत नाही.
स्कूटर सर्व activa चीच घेत होते तेव्हा मी मास्टरो घेतली.
पाच सहा वर्ष झाली.काहीच तक्रार नाही ना कोणता servicing सोडून खर्च आला आहे.

20220416_125020.jpg20220416_124955_0.jpg20220416_125020_1.jpg

फ्लॅट ऐवजी स्वतःची झोपडी असेल तर खिडकीत exhaust fan ( 40 वॅट 250 mm चे ब्लेड) उलटे लाऊन गरिबांच्या AC चा अनुभव घेता येईल .
हा प्रयोग मी सलग आठ वर्षे झाले असतील करत आहे .

Exhaust fan उलटे लावल्या मूळे बाहेरील थंड हवा आत मध्ये ओढली जाऊन खोलीचे तापमान सुसह्य होते .
हॉल मधील दोन खिडक्यांना दोन exhaust लावले आहेत , दोन्ही खिडक्यांच्या खाली सुदैवाने सावली असते .
दोन बेडरूम आणि हॉल मिळून 36 वॅट चे चार exhaust ( 24 तास चालू असतात ) लावल्या मुळे lightbill मध्ये 1000 रु वाढलेले दिसले .
टेरेस ला दोन वर्षांपूर्वीच शेड केलेली असल्यामुळे टेरेस तापण्याचा त्रास बिलकुल नाही . पण उन्हाळ्यात बऱ्याच वेळा हवा वाहती नसल्यामुळे खोलीत उकाडा भयंकर असतो .
सिलिंग फॅन चे बटन 1 वर जरी ठेवले तरी exhaust मूळे बाहेरून येणारी थंड हवा सर्वत्र पसरते .
घरी येणाऱ्या बऱ्याच पै पाहुणे आणि मित्रांनीही हा जुगाड यशस्वी केला .
एक फॅन ची किंमत 1300 रुपये !

लॉईड (LLOYD) कम्पनीचा एसी स्वस्त अन मस्त आहे. १२ वर्षं झाली बेडरूमचा एसी शून्य मेन्टेनन्सवर सुरू आहे. पॉवर कन्झम्प्शनही कमी आहे. (अजून एक सेम कम्पनीचा घेतला, तो गेली २ वर्षे चाम्गला सुरू आहे, पण दरम्यानच्या काळात ही कंपनी हवेलीराम उर्फ हॅवेल्स वाल्यांनी घेतल्याचे ऐकले आहे. हवेलीरामच्या इतर इलेक्ट्रिकल्स चा माझा अनुभव छान नाही.)

बेडरूमला 'स्वस्त पडेल म्हणून' विंडो एसी नको. खूप आवाज येतो, झोप खराब होते. कबुतरांना घरटी करायला विंडो युनिट फार उपयुक्त असते. एसी चा आवाज नसला तरी हिवाळ्यातही कबुतरांचा आवाज वात आणतो.

सॅमसंगच्या इतर उत्पादनांचा माझा अनुभव खूप चांगला आहे. पूर्वी मी सगळे फ्रीज केल्व्हिनेटर किंवा व्हर्लपूलचे घ्यायचो. पण आता ते उपलब्ध नसल्याने सॅमसंगचे दोन घेतले आहेत. दोन्हीही छान चालतात. त्यांचा एसी कदाचित चांगला असू शकेल. आर अ‍ॅण्ड डी वर मेहनत घेतात ते.

Daikin चा डीड टन इन्व्हर्टर एसी एकदम बेस्ट मी गेली आठ वर्षं वापरत आहे एकदा ही बिघडला नाही माझी रूम सुद्धा तिसर्या मजल्यावर आहे सुर्य उगवल्या पासून सूर्यास्ता पर्यंत उन्हातच असते पण Daikin मुळे अजून पर्यंत तरी उन्हाळा जाणवला नाही ....

Pages