खाओ सोइ (थाय पदार्थ)

Submitted by स्वप्ना_राज on 1 December, 2012 - 00:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तेल, बारीक चिरलेली लसूण, २ टेबलस्पून रेड करी पेस्ट, बोनलेस चिकनचे तुकडे, नारळाचं दूध, १ चिकन क्यूब, हळद, सोया सॉस, साखर, मीठ, लिंबाचा रस, राईस न्यूडल्स किंवा साध्या न्यूडल्स, तळलेले लसणाचे बारीक तु़कडे, कांद्याचे पातळ लांब काप (तळलेले), चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना, दाण्याचं कूट, चिली प्लेक्स, कांद्याची पात बारीक चिरून

क्रमवार पाककृती: 

तेल गरम करा, त्यात बारीक चिरलेली लसूण घालून परता. रेड करी पेस्ट घालून १-२ मिनिटं परता. त्यात बोनलेस चिकनचे तुकडे घाला. पेस्टसोबत ब्राऊन होईपर्यंत, शिजेपर्यंत परता. मग नारळाचा दाट दूध घाला. चिकन क्यूब पाण्यात विरघळवून ते मिश्रण ह्यात ओता. मिक्स करा. हळद, सोया सॉस, साखर आणि मीठ घाला. एक उकळी काढा. गॅसवरून उतरवून लिंबाचा रस घाला.

न्यूडल्सच्या पाकिटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे त्या शिजवा (कुठलाही मसाला न घालता). त्यातल्या काही न्यूडल्स तेलात डीप फ्राय करून घ्या (कुरकुरीत).

मोठ्या बाऊलमध्ये तळाला शिजवलेले न्यूडल्स घाला. त्यावर चिकनची करी घाला. वरती तळलेले न्यूडल्स, तळलेले लसणाचे बारीक तु़कडे, कांद्याचे पातळ लांब काप (तळलेले), चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना, दाण्याचं कूट, चिली प्लेक्स, कांद्याची पात बारीक चिरून घाला. लिंबाचा रस घालून गरमगरम सर्व्ह करा.

अधिक टिपा: 

१. न्यूडल्स शिजवताना सुट्या होण्यासाठी त्यात थोडं तेल घाला.
२. चिकन क्यूब खारट असतात. त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालावं. त्याऐवजी चिकन स्टॉक घातला तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
(http://www.food.com/recipe/chiang-mai-curry-noodles-kao-soi-192829 वर स्टेप ३ पर्यंतची कृती चिकन ग्रेव्ही करायला वापरली आहे. पुढली सजावट न्यूडल बार मध्ये ही डिश सर्व्ह करतात त्यावरून घेतली आहे)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, स्वस्तातला फोन आहे गरिबाचा. Happy पण रेसिपी अगदी हाटेलातल्यासारखी होते एव्हढं नक्की. घरच्यांकडून प्रशस्तिपत्रक मिळालंय आपल्याला. Proud

नंदिनी, khao swe असंही नाव आहे ह्या डिशचं.

मुंबईत हाय स्ट्रीट फिनिक्स मध्ये पॅलेडियममधल्या न्यूडल बार आणि Asia 7 अश्या दोन्ही ठिकाणी खाल्ली आहे.

काय सही पाककृती आहे! आणि योगायोग असा की काहीतरी थाई पदार्थ करून बघायला म्हणून ही रेडकरीपेस्ट आणली आहे. तेव्हा लवकरच करून बघितल्या जाईल.

थँक्स स्वप्ना!

मस्त सजावट आणि चवही खास असणार.
तळण्यासाठी म्हणून वेगळ्या नूडल्स मिळतात. बहुतेक बीन थ्रेडस म्हणतात त्यांना. मूगाच्या असतात. मस्त कुरकुरीत होतात. या शिजवलेल्या नूडल्स तळायला थोडा वेळ लागतो.

असा उच्चार आहे काय याचा ? मी खाए सुए असे म्हणत होतो. करणे लांबच, खाऊन पण पाहिला नाहीये अजुन. Sad
नोनवेज न घालता करता येते का शाकाहारी लोकांसाठी ?

मृण्मयी, थॅन्क्स काय त्यात? आवडली तर नक्की कळव मला. Happy

दिनेशदा, आमच्या घराजवळच्या सुपरमार्केटमध्ये राईस न्यूडल्स नाही मिळत. बीन थ्रेडस काय मिळणार Sad

महेश, शाकाहारी मध्ये पनीर किंवा मग गाजर, फरसबी, बटाटा वगैरे घालून करता येईल कदाचित.

त्या हॉटेलमधल्या अमेरिकन चॉप सुई मधे वरुन टाकलेल्या असतात ना , त्या. असे वर्णन ( हिंदीत) केल्यावर मिळतील कदाचित Happy