महावृक्ष ..

Submitted by गिरिश सावंत on 4 June, 2012 - 06:44

कोकणात आजही झाडांना आपल्यातलं मानल जात ...
देवराया तर भावनिक विषयाशी संबधित आहेत त्यामुळे तिथली झाडे तोडलीच जात नाहीत ..
वड - पिंपळाच्या झाडाखाली 'महापुरुष ' देवाची स्थापना करून हि झाडे वर्ष नु वर्षे जपली जातात ..
कणकवली येथील अशाच महापुरुष देवस्थानाच्या वडाची पूजा करताना सावित्री ..
आणि त्यांना सात जन्मी तोच पती मिळवून देणारा ...
माणसाच्या कित्येक पिढ्या पाहणारा महावृक्ष ...

झाडाच नक्कि वय कुनालच सांगता येत नाही.

IMG_5442 copy

IMG_5464 copy

IMG_5445 copy g

IMG_5439 copy

IMG_5444 copy

अहो सत्यवान ..पुजा झाली हं...
IMG_5452 copy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छानच आहेत सर्व प्रकाशचित्रे..! Happy

>>तरीही पुर्ण वृक्ष नाहीच पकडता आला फोटोत !<<
दिनेशदा, मुळ वृक्ष कधीच नष्ट झाला असावा, या दिसतायत त्या, वटवृक्षाच्या पारंब्या असाव्यात कदाचीत.

ज्या झाडाला फेऱ्या मारल्या जात आहेत तो मुख्य भाग आहे ..

चौकोनातील वर्तुळावरून झाडाच्या विस्ताराची कल्पना होईलच ...
(साभार : विकीमापिया )

mahapurush

तरीही पूर्ण फोटोचा प्रयत्न करीनच ..

बाप रे! केवढा विस्तार आहे!

(एक सावित्री दोरा गुंडाळता गुंडाळता फोनवरून सत्यवानाही गुंडाळते आहे वाटतं. :P)

बराच मोठा आहे... मस्त
रच्याकने, परवाच फेसबुकवर एक सुविचार वाचला...
"आयुष्यभर वडाच्या झाडाला दोरा बांधत फिरण्यापेक्षा एक वडाचे झाड लावले तरी जन्माचे सार्थक होईल"
Light 1

ये मस्त ये.....सुरेख......केवढा प्रचंड असावा तो प्रत्यक्ष पहायला हवाच....... Happy

महाकाय वटवृक्ष अन महाकाय प्र. ची. जबरदस्त आलेत ! << तो प्रत्यक्ष पहायला हवाच.. >>>+१
<<"आयुष्यभर वडाच्या झाडाला दोरा बांधत फिरण्यापेक्षा एक वडाचे झाड लावले तरी जन्माचे सार्थक होईल">> हो हे वाचलय अन भावलं
Happy

मस्त, अफाटच आहे, कुठे आहे हा?

>>>(एक सावित्री दोरा गुंडाळता गुंडाळता फोनवरून सत्यवानाही गुंडाळते आहे वाटतं.>>>अगदी मझ्याही हेच मनात आलं...

सावंतानु, भारी फोटो. Happy
एक सावित्री दोरा गुंडाळता गुंडाळता फोनवरून सत्यवानाही गुंडाळते आहे वाटतं. >>>>:हाहा:

जबरदस्त फोटोज!!
आपण परंपरा (वटपूजा) ही जपतो, नवे (मोबाइल)ही स्वीकारतो. असे सुचवणारा शेवटचा फोटो मला अतिशय आवडला. सणवार, व्रतवैकल्ये यांच्या निमित्ताने निसर्गाचे संवर्धन झाले तर फारच छान, नाही का?