नैवेद्यम् समर्पयामि

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 10:24

nevaidya_0.jpg

गणपती घरी आले की त्यांच्या कोडकौतुकात घर कसं रमून जातं. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार योग्य रितीने झाला पाहिजे याकडे सगळे लक्ष ठेऊन असतात, हो की नाही? बाप्पांकरता हरतर्‍हेचा नैवेद्य केला जातो, छानपैकी ताट सजवून बाप्पाला जेवू घातलं जातं. गणपतीचे लाडके मोदक तर असतातच पण शिवाय घरोघरच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींनी गणेशाला तृप्त केलं जातं.

तुमच्या घरी यंदा कायकाय नैवेद्य बनवलात? बाप्पाकरता कोणता प्रसाद वाटला? आम्हालाही कळवा. तुमच्या पाककृती वाचून, त्यांची प्रकाशचित्रे पाहून बाप्पासारखेच आम्हीही तृप्त होऊ.

नैवेद्याच्या संकल्पाची सिद्धी !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, काय मस्त नैवद्य आहेत.
(बाप्पापण तोंपासु वगैरे अशी इथली लघुरुपे वापरीत असतील काय?)

मस्त !

काल एव्हढे मोदक खाऊनही स्क्रीनवरून आज हे डाऊनलोड करून घ्यायची सोय नाही ह्याचं अपार दु:ख होतंय Proud

Pages