बॉस्टनमधे फ्रेंच कुठे शिकावे

Submitted by रचु on 15 June, 2011 - 23:08

बॉस्टनमधे फ्रेंच कुठे शिकावे याबद्दल काही सांगता येईल का? मला फ्रेंच शिकायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोस्टन मुख्य शहरापासून तुम्ही किती लांब राहता यावर ते अवलंबून आहे.

तुम्हाला कुठल्या पातळीवर शिकायचे आहे यावरही अवलंबून आहे.

केंब्रिज जवळ असाल तर हार्वर्ड विद्यापीठात (Extension school) मधे फ्रेंच क्लासेस असतात.

बॉस्टन परिसरातल्या इतर विद्यापीठातही वेगवेगळ्या भाषेतले क्लासेस असतात.
बॉस्टनमधे बॉस्टन लँग्वेज स्कूल मधे क्लासेस असतात. Boston adult education, Cambridge Adult Education इथेही कधी कधी असे वर्ग भरतात.

ग्रेटर बॉस्टन परिसरात , कुठल्याही शहराच्या जवळ कम्युनिटी कॉलेज असते तिथे बर्‍याचदा वेगवेगळ्या भाषेचे क्लासेस असतात.

सगळ्यात स्वस्त (फुकट), तुमच्या स्थानिक सार्वजनिक वाचनालयात वेगवेगळ्या भाषा शिकण्याच्या कॅसेट, सीडी मिळतात. काही वाचनालयात फ्रेंच भाषिक लोक मधून मधून जमतात तिथे जाऊन सराव करता येतो.

मला स्वतःला फक्त या शेवटच्या पर्यायाचा अनुभव आहे. २००२ मधे पॅरीसला जाण्यापूर्वी अशा कॅसेट (हो तेंव्हा कॅसेट असायच्या) आणून थोडा सराव केला होता. आणि त्यावर काम भागले.

धन्यवाद अजय Happy
तुम्ही जो लायब्ररीचा पर्याय सांगितला आहे ना तसं मी थोडंफार शिकले आहे.
आता कम्युनिटी कॉलेजची माहीती काढते. Happy